शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती


आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना शहराध्यक्षाच्या हत्येने खळबळ उडाली होती. शिवा वझरकर नावाच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक केली आहे. शिवा वझरकरच्या हत्यनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवा वझरकरच्या समर्थकांनी या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. शिवा वझरकरची गुरुवारी संध्याकाळी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयाजवळ शिवा वझरकरचा मृतदेह आढळला होता. मृतक वझरकर आणि तीन आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरु होती. त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

गुरुवारी संध्याकाळी शिवा वझरकर याला तिन्ही आरोपींनी भेटायला बोलावलं आणि त्याची हत्या केली. चाकूने पोटात सपासप वार करत आरोपींनी शिवाची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. त्यानतंर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, शिवा वझरकर समर्थकांनी हत्येनंतर याभागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून व्यक्त संताप केला.

पोलिसांनी हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या तीन कार्यकर्त्याना अटक केली. पोलिसांनी रात्रीच कारवाई करत तिघांना जेरबंद केलं. रामनगर पोलीस आता या हत्या प्रकरणातील दुवे उकलत आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

‘काल रात्री साडेआठच्या दरम्यान शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. शिवा वझरकर आणि कुमरे यांच्यात भांडण झालं होतं. हिमांशू कुमरे याने चाकूने भोकसून शिवा वझरकरची हत्या केली. त्यामध्ये इतर साथीदारांनी सहभाग घेतला,’ अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली.





Source link

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री



मल्लखांब पितामह अशी ओळख असणा-या उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेय. 



Source link

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'


लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. तर काही सर्वेक्षण करणाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे समोर आलं आहे. 

राज्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी या वेळेत पूर्ण करायचं आहे. सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महसूल विभागासह महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरातील सर्वेक्षणासाठी 816 कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहेत. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले मोठ्या प्रमाणात प्रगणक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशिक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे समोर आलं आहे.

त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली आहे. नगर शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रगनक असलेला कर्मचारी आपल्याला सर्वेक्षण करतात येत नसल्याचं सांगत असून आपण इलेक्ट्रॉनिक मदतनीस असल्याचे सांगत आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षणाबाबत सुरू असलेला सावळा गोंधळ या व्हायरल व्हिडिओ मुळे समोर आला आहे.

याबाबत विचारले असता कर्मचाऱ्याने ‘मला यातलं काही कळत नाही. मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून काम पाहतो. मोबाईल हाताळता येत नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला यातलं कळत नाही. त्यांनी हे माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचं बघा, जोडीदार घ्या आणि कसेही काम पूर्ण करा असे सांगितलं,’ असं म्हटलं आहे.

मराठा आरक्षण सर्व्हेच्या APPमध्ये असंख्य अडचणी

वाशिम शहरात मराठा कुटुंबाचा सर्व्हे काल पासून सुरू झाला मात्र अॅपमध्ये असंख्य अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. त्यामुळं सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत सर्व्हे पूर्ण होणे अशक्य असल्याचं सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सर्व्हे सुरू झाल्यानंतर त्यामध्ये वाशिम शहराचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाशिम शहरात दुसऱ्या दिवशी सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेत 182 प्रश्न असून आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रश्न विचारून माहिती भरली जात आहे.

सर्वेक्षणासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात नागरिकांचा आक्षेप.

कोल्हापुरात सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत मराठा समाजातील नागरिक आक्षेप घेतला जात आहे. माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे त्यातील प्रश्नांवर आक्षेप नोंदवला आहे. शासन असे प्रश्न विचारून आमची मराठा समाजाची अब्रू काढत आहे. मराठा नेतेच आता मतासाठी भिकारी झाले आहे, विजय साळुंखे यांनी म्हटलं आहे.





Source link

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक


पुढील
बातमी

कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर





Source link

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल


पुढील
बातमी

सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर ‘बुलडोझर’! मुंबईत योगी स्टाइल कारवाई





Source link

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य


Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.  नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा का दिला याचा खुलासा केला आहे. तसेच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला (maharashtra politics). 

शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा

नाशिकमध्येही  शूर्पनखेला श्रीरामांनी इथेच  ठार  केले  होते.  जेव्हा  त्यांना 14  हजार  राक्षस मारायला  आले  होते तेव्हा  त्यांचा  वध  इथेच  करण्यात  आला. अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि पंचवटी ही पराक्रमभूमी आहे. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे,  शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिर बनविण्यासाठी, 370 कलम काढण्यासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येकवेळी भाजपला पाठिंबा दिला. ईडी, सीबीआय, आयटी हे तुमचे घरगडी आहेत. आमच्या निर्दोष शिवसैनिकांच्या घरावर धाडी घालतायत. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. हे सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर खुर्ची सोडून द्या, आम्ही सक्षम आहोत.

दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं? 

महाराष्ट्र्र संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. देश के लिए ‘मन की बात’ आणि गुजरात के लिए ‘धन की बात’! ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा. पंतप्रधान मोदी देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. हे हिंदुत्व नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय?  संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. 

ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघाले

मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय? ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघालायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp