विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update


Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. पण, देशात सक्रिय असणारा पश्चिमी झंतावात आणि तत्सम वातावरणीय बदलांमुळं अवकाळीचं सावट आता कमी झालं असून, राज्यात हिवाळा त्याची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होम्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. 

फक्त विदर्भच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढणार असून, किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरीही सकाळ आणि दुपारच्या वेळी असणाऱ्या उकाड्यापासून मात्र शहरातील नागरिकांना अद्याप पाठ सोडवता येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं. 

 

थंडीचा कडाका वाढणार 

सध्या आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीवपाशी समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचावर चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगांची दाटी पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये पहाटेच्या वेळी तापमान मोठ्या फरकानं कमी झालेलं असेल. तर, कोकण भागामध्येही पहाटे आणि रात्री उशिरानं तापमानात घट होणार असली तरीही दिवसा तापमानात फारशी घट नोंदवली जाणार नाही. येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून राज्यातील गिरीस्थानांवर सुरेख हवामान पाहता येणार आहे. 

सध्या हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी झाल्यामुळं दमटपणा कमी झाला आहे. परिणामी हवेतील कोरडेपणा वाढून वाढत्या तापमानातही पहाटेच्या वेळी थंडीची जाणीव होत आहे. देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये कमालीची थंडी आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पण, महाराष्ट्राकडे हे वारे खेचण्यासाठी पुरेसं दाबक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळं हे वारे पुढे येताना कमकुवत होत आहेत. ज्यामुळं राज्यात थंडीला इतका विलंब लागत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीचं हे बदललेलं समीकरण साधारण डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असंच राहू शकतं. 

दरम्यान, तुम्ही जर देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये हिवाळ्याचा अनुभव घेण्यासाठी अर्थात हिवाळी सहलीसाठी जाणार असाल तर तिथं थंडीचा बंदोबस्त करूनच जा. कारण, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीर (Kashmir), उत्तराखंडच्या (Uttarakhand) मैदानी क्षेत्रात थंडीचा कडाका वाढला असून, या राज्यांमध्ये पर्वतील भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. 





Source link

The lost burrower resurfaces

The lost burrower resurfaces


It had not been seen for 85 years, but scientists have tracked it down.

It had been immortalised by Steve McQueen (as Captain Virgil Hilts) in The Great Escape. The American Hilts, noted for his innumerable escape attempts, describes to a group of English (co-) prisoners how to tunnel through the earth—Swim through the soil by grabbing the soil in front of you and pushing it behind you, over your body. Simple.

Like a mole!

The De Winton Golden mole, a shy, shiny, tiny, blind creature had not been seen since it was last spotted in 1936 on the North-western coast of South Africa, and presumed extinct. But a group of conservationists and geneticists from the Endangered Wildlife Trust (EWT) and University of Pretoria, nosed around in a dune habitat on the South African coast, between Port Nolloth and Alexander Bay.

In a press release of November 28, the EWT declared that the De Winton golden mole is “no longer lost”. The creature is 11th of the world’s ‘most wanted lost species’ to be rediscovered, since the ‘Search for Lost Species’ project was launched in 2017. The (re-)discovery of the golden mole was not by dumb luck; Nor painstaking footwork. Deep science came into play as scientists had to examine ‘environmental DNA’ from soil—DNA from skin cells, hairs and bodily excretions that animals shed. Since the expedition in 2021, EWT has identified four additional De Winton’s golden mole populations. “They are working to protect the moles and learn more about the species,” the release says.





Source link

ना कोणती डिग्री, ना अनुभव; 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा बोगस डॉक्टर

ना कोणती डिग्री, ना अनुभव; 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा बोगस डॉक्टर


Palghar Crime News :  ना कोणती डिग्री, ना अनुभव तरी देखील तब्बल 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे.  पालघरच्या ग्रामीण भागात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे.  पदवी नसताना देखील हे डॉक्टर खुलेआम उपचार करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच उघडकीस आल आहे.

मोखाडा पंचायत समिती लगतच मागील 26 वर्षापासून सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर कारवाई करण्यात आलेया.  पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आनंदा मलिक अस या बोगस डॉक्टरच नाव असून तो मागील 26 वर्षापासून या ठिकाणी पदवी नसताना देखील खुलेआम नागरिकांवर उपचार करत होता.  त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णांच्या आरोग्याशी केला जाणारा खेळ उघडकीस आला असून यानंतर मोखाडा पोलीस ठाण्यात फसवणूक व वैद्यकीय व्यवहार अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जिल्हा परिषदेने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत .

मुंबईत बोगस डॉक्टरवर कारवाई

मुंबईतही अशाच प्रकारे एका बोगस डॉक्टरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता.  मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात त्यानं क्लिनिक थाटलं होतं. रुग्णांकडून तो भरमसाठ फी आकारत होता.  मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली होती. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. 

अनधिकृतपणे नर्सिंग होम थाटून गर्भवतींना पैशांचं आमिष दाखवून बाळांची विक्री

मुंबईत नवजात बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अशाच एकाच टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला होता. मुंबईच्या गोवंडी-शिवाजी नगर परिसरात अनधिकृतपणे नर्सिंग होम थाटून गर्भवतींना पैशांचं आमिष दाखवून बाळांची विक्री केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून एजंट गोरीबी उस्मान शेख, बोगस डॉक्टर सायराबानो शेखशबाना झाकिर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस आणि रिना नितीन चव्हाण यांना पोलिसांनी अटक केलीय.





Source link

'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा…'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा…'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा


कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा (Banana) समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आता भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करु असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे.

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोषण आहार योजनेनुसार, विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत. मात्र या निर्णयाला आता भाजपाच्या काही नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांसह सहसंयोजक किशोर महाराज दोंडगे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. आळंदीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाने दुर्दैवी निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर 2023 ला एक निर्णय काढला आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात प्रोटीन मिळावं म्हणून त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाची भावना चांगली असू शकते. आमचं स्पष्ट मत आहे, की प्रत्येकाच्या कुटुंबाचे नियम असतात. महाराष्ट्रात घरा-घरात वारकरी आहेत. अनेक अध्यात्मिक संप्रदाय आहेत. पहिली, दुसरीत शिकत असलेल्या मुलांनी अजाणतेपणी अंडी खाल्ली तर त्यांच्या कुटुंबातील शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा मोठा धोका सगळ्यांनाच सतावत आहे, असे आचार्य तुषार भोसले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतच एक पत्र दिलं आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अंड्याला पर्याय असू शकतात. देशी गाईचं दूध, तूप, सुका मेवा आहे. अंडी हा पर्याय नाही. आम्ही या निर्णयाविरोधात आहोत. मला आशा आहे, राज्यातील वारकरी संप्रदाय, साधू, संत आणि आध्यात्मिक क्षेत्राची भावना तिच आहे. या सर्वांच्या भावनांचा सन्मान करतील आणि हा निर्णय मागे घेतील, असेही तुषार भोसले म्हणाले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी देशी गाईचं दूध, सुकामेवा द्यावा देण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या 20 तारखेच्या आत हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करू, शाळांपर्यंत अंडी पोहोचू देणार नाही, असा इशारा किशोर महाराज दांडगे यांनी दिला.





Source link

संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचा 1075 ट्रेनवर परिणाम; प्रवाशांवर गुन्हे दाखल

संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचा 1075 ट्रेनवर परिणाम; प्रवाशांवर गुन्हे दाखल


Central Railway Alarm Chain Pulling :  मध्य रेल्वे कोणत्याही अनुचित संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या वर्षात मध्य रेल्वेने एकूण 793 व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले आहेत. तब्बल 2.72 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत मध्य रेल्वेवर, विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, एकूण 1075 ट्रेन उशीराने धावल्या, म्हणजे मुंबई विभागातील 344 मेल/एक्स्प्रेस गाड्या, भुसावळ विभागात 355 गाड्या, नागपूर विभागात 241 ट्रेन, पुणे विभागात 96 ट्रेन आणि सोलापूर विभागात 39 ट्रेन उशीराने धावल्या. अशा साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे 8.29 % वक्तशीरपणाचे नुकसान होते. 

केवळ नोव्हेंबर महिन्यात, मध्य रेल्वेवर, साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, एकूण 197 ट्रेन उशीराने धावल्या आणि रेल्वेचे वेळेपत्रकाचा सरासरी वक्तशीरपणा 10 मिनिटांनी कमी झाला.  मुंबई विभागात 73 मेल/एक्स्प्रेस, भुसावळ विभागात 53, नागपूर विभागात 34, पुणे विभागात 30 आणि सोलापूर विभागात 8 ट्रेन खोळंबल्या. 

मुंबई उपनगरात, संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज 12 उपनगरीय लोकलना उशीर होतो आणि वक्तशीरपणाचे  16.50% नुकसान होते. कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कसारा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस ही स्थानके आणि आंबिवली – टिटवाळा विभाग स्थानकांवर आणि विभागांवर साखळी खेचण्याच्या घटना वारंवार येतात. 

रेल्वेने प्रत्येक उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस  ट्रेनमध्ये संकटकालीन साखळी खेचण्याचा (Alarm Chain Pulling) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशिरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर चढ-उतार करणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी प्रवासी संकटकालीन साखळी खेचण्याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

ट्रेनमधील साखळी खेचण्याच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही तर पाठीमागून येणाऱ्या ट्रेनवरहीही मोठा परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय चलन प्रणालीमध्ये अशा घटनांमुळे मेल/एक्स्प्रेस व उपनगरीय रेल्वे उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी साखळी खेचण्याच्या गैरवापराने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

अनावश्यक आणि स्व सोईच्या गैर कारणांसाठी संकटकालीन साखळीचा अवलंब करू नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्‍यक परिस्थितीत साखळी खेचण्याच्या कार्याकडे जाणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय अपराध आहे.  ह्यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही ठोठावले जातील यामुळे याचा गैरवापर करु नये असे मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन आहे.

मुंबई विभागात, वारंवार साखळी खेचण्याच्या घटनांमुळे ‘या’ ट्रेन प्रभावित होतात

पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल (मार्गे – अलाहाबाद)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल (नागपूर मार्गे)
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनऊ पुष्पक एक्सप्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस





Source link

'कांड्या पेटवायच्या, त्यातून…'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

'कांड्या पेटवायच्या, त्यातून…'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार


Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केल्यानंतर फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. नवाब मलिक आजही अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले.

अजित पवार संतापले

नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट विरोध असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लहून कळवलं आहे. हे पत्र राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच या पत्राला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पूर्ण समर्थन होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवरुन (ट्वीटरवरुन) पोस्ट केलेल्या पत्राला शिंदेंचा पाठिंबा होता असं म्हणत दुसऱ्या दिवशी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ते चांगलेच संतापले.

शिंदेंची पत्रावर सही असल्याचं ऐकलं अन्…

अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस अजित पवार यांनी नवाब मलिक भूमिका स्पष्ट करतील त्यानंतरच आपण बोलू असं सांगितलं. अजित पवारांना प्रश्न विचारताना एका पत्रकाराने, “दादा ते फडणवीसांचं मत आहे तेच शिंदेचं मत आहे,” असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकाराला मध्येच थांबवत अजित पवारांनी, “ते तुम्हाला बोलले का?” असा प्रश्न विचारला. त्यावर पत्रकाराने, “त्यांना मडियाशी बोलायचं नाही,” असं उत्तर दिलं. “ते असं काही म्हटलेलं नसताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की…’ असं म्हणत अजित पवार प्रतिक्रिया देत होते तितक्यात एका पत्रकाने फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असल्याचं म्हटलं. हे विधान ऐकून अजित पवार अजूनच संतापले.

नक्की वाचा >> मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदेंनी कोणाची बाजू घेतली? म्हणाले, ‘पक्ष कसा चालवावा हा..’

कांड्या पेटवायच्या..

अजित पवारांनी थेट त्या पत्रकाराकडे मुख्यमंत्री शिंदेची स्वाक्षरी असलेल्या पत्राची मागणी केली. “बघू दाखव” असं अजित पवार पत्रकाराला म्हणाले. “हेच जे तुमचं चुकतं. काही वाटेल ते..” असं अजित पवार म्हणत असतानाच पत्रकाने ‘आहे सही’ असं पुन्हा म्हटलं. “आहे सही तर दाखव ना पुरावा. दाखव की. उगच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार म्हणून बोलायचं. काही महिती नाही कुठल्या तरी कांड्या पेटवायच्या, त्याच्यातून कोणाचं तरी ऐकायचं आणि सांगायचं की असं असं आहे. मला दाखव,” असं अजित पवार संतापून म्हणाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp