सुरक्षित मातृत्वासाठी 600 संस्था होणार ‘सुमन संस्था’, तानाजी सावंत यांची मोठी घोषणा!

सुरक्षित मातृत्वासाठी 600 संस्था होणार ‘सुमन संस्था’, तानाजी सावंत यांची मोठी घोषणा!


Maharastra Suman Sanstha : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची  सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्त रूपात आणण्यात येत आहे.  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसुतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

 या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.





Source link

कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून RTO कार्यालयात घुसून एजंटंचा कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला

कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून RTO कार्यालयात घुसून एजंटंचा कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला


कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यातील श्रीरामपूर आरटीओ (RTO) कार्यालयात एजंटंची दादागीरी पुन्हा एकदा समोर आली आहे. काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Ahmednagar Police) याप्रकरणी मुख्य आरोपीस ताब्यात घेतलं पुढील तपास सुरु केला आहे.

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला असून दिवसेंदिवस त्यांची दादागीरी समोर येताना दिसतेय. वाहनावरील बोजा कमी करून ट्रान्स्फर करून दे अशी मागणी करत आरटीओ कर्मचाऱ्यावर जमावाने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. गुरुवारी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याच्यासह 15 जणांनी कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना मारहाण करत चॉपरने जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. सुनिल शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353,332, 186,34, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध कायदा 3(1), (R)(S) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरटीओ कार्यालयाला एजंटाचा विळखा पडला असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनतर देखील हा गंभीर प्रकार समोर आल्याने आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय परिसरात असणाऱ्या एजंटसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

“श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याने आणि त्याच्या भावाने बनावट कागदपत्रे तयार करुन कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना जबरदस्तीने सही करुन देण्यास सांगितले. शेवरे यांनी नकार दिल्यानंतर दोन्ही भावांनी दमदाटी केली आणि मारहाण केली. त्यामध्ये प्राणघातक शस्त्राचा देखील वापर केला आहे. हुजेबवर यापूर्वी देखील तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत,” अशी माहिती श्रीरामपुरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली.





Source link

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार



Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



Source link

पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार

पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार


Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेकडून पुन्हा एकदा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांसाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरीतील एसव्ही रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून हा ब्लॉग घेण्यात आला आहे. 

अंधेरी स्टेशन परिसरातील गोखले पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. पुलाच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेला ब्लॉक घेण्याची विनंती केली होती. रेल्वेने ही विनंती मान्य करुन पुलाच्या कामासाठी 20 दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. गोखले पुलाचा एक महत्त्वाच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक हा रात्रकालीन असून रोज तीन चे चार तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. रेल्वेकडून काहीच दिवसांत ब्लॉक शेड्युल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुलाचा उत्तरेकडील गर्डर उभारण्यात आल्यानंतर आता दक्षिणेकडील गर्डर उभारण्यात येणार आहे. 

गोखले पुलासाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने पुढील आठवड्यापासून लोकल प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी रेल्वेकडून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

1975 मध्ये गोखले पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. 90 कोटी रुपये खर्चून आता पुलाची पुर्नबांधणी केली जात आहे. पालिकेने नोव्हेंबर 2023मध्ये पुल खुला करण्याची योजना केली होती. मात्र काही कारणास्तव काम पूर्ण होण्यास विलंब झाला. आता फेब्रुवारी 2024 मध्ये पुल वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्याचे प्रयत्न महापालिकेचे आहेत. 

पुण्यात शनिवारी-रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. याचबराेबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.





Source link

निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना



इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा नदीच्या जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची दुर्घटना घडलीय. येथे युद्ध पाचळीवर बचावकार्य सुरु आहे. 



Source link

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार


Maharashtra Weather : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या किनारपट्टी भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रापर्यंत या वाऱ्यांचे परिणाम दिसणार असून, पुढील दोन दिवस म्हणजेच पुढच्या 48 तासांसाठी कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोव्यातही पावसाच्या सरी बरसणार आहेत. शुक्रवारी वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. मात्र पावसाचं प्रमाण फारसं नसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

श्रीलंकेपासून बांग्लाच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या कोमोरीन पट्ट्यापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार धाला आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावतण तयार होत असून, त्यामुळं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह सातारा आणि सोलापूरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

23 नोव्हेंबरला रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता असून,  दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे

राज्यातील एकंदर हवामानाची स्थिती पाहता थंडीचं प्रमाण मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे इथं अपवाद ठरत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही. देशाच्या उत्तर पश्चिमेकडेसुद्धा हिवाळ्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. पश्चिमी झंझावात सक्री असून, त्यात अल निनोच्या प्रभावाची भर पडल्यामुळं आता थंडी थेट डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवासीस जोर धरताना दिसणार आहे. 

सध्याच्या घडीला देशाच्या उत्तरेकडे दिल्ली आणि नजीकच्या भागामध्ये तापमानाच घट होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्वतीय क्षेत्रांमध्ये बोचरी थंडी हल्लीच जोर धरताना दिसू लागली आहे. तर, याच राज्यांमधील मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची रिमझिम पाहायला मिळणार असल्यामुळं हवेतील गारवा आणखी वाढणार आहे. हिवाळी सहलीच्या निमित्तानं तुम्ही यापैकी कोणत्याही राज्याला भेट देण्यासाठी जाऊ इच्छिता, तर आधी हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp