9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक
9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असणार आहे, यामुळे आता शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे.
Source link
9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असणार आहे, यामुळे आता शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे.
Source link
Ashok Chavan Resign : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांच्या भाजपात जाण्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
“काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. आता आमच्यापुढे पेच आहे की पंतप्रधान मोदी देशाला काय तोंड दाखवतील? कारगिल युद्धाच्या शहिदांच्या भूखंडांवर अशोक चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. भाजपने याविरोधात आंदोलन केले होते. आज त्या शहिदांच्या अपमानाचे काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन अपमान धुवून काढला का? सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजप जगातल्या राजकारणात नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा बदलायला हवी. त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. भाजप काँग्रेससोबत अशा प्रकारे युती करत आहे. भाजप देशाचे राजकारण ज्या पद्धतीने नासवत आहे. अशाप्रकारे 400 पार उडी मारता येईल असे भाजपला वाटत असेल तर ते 200 पारही जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी वारंवार आदर्श घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले. त्याच्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतःच्या क्लिप भाजप कार्यालयात पाहाव्यात. मोदी काय बोलले होते तेही ऐकावं आणि मग शांतपणे विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा. आदर्श घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे लोक. नरेंद्र मोदींना भविष्यात देशामध्ये तोंड लपवून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्यांनी मोदींनी भाजपमध्ये आणून पवित्र केले हे दुर्दैव आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपा पक्ष फोडण्याचे काम करत आहे – विजय वडेट्टीवार
“अशोक चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करू शकतील. मात्र, मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. पण, ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदारराजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग केलं. त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. दबावतंत्र ही भाजपची रणनीती आहे, मात्र अफवांना बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असंही प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं.
भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. अशोक चव्हाण हे भारदस्त नेता होते. पण, हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
आमच्या राजीनाम्या बाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे. हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे. माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे कोणत्याही संस्था नाही त्यामुळे ईडीची भीती ते दाखवू शकत नाहीत. पण, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत त्यानुसार मला भाजपचे विचार पटत नाहीत असं स्पष्ट मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहे. काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे. भाजप केवळ आम्ही अन्स्टेबल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नेत्यांवरती प्रेशर आणून भाजपकडून सायकॉलॉजिकल गेम खेळला जात आहे. काँग्रेस हा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही. आम्हाला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप. त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच 15 वर्षं फोन करणारे आता मात्र फोन करुन विचारपूस करत आहेत. पण विचारपूस केली तरी भावूक होऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात युवा मिशन 2024 महामेळाव्यात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचं विधान केलं.
या महामेळाव्यात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार बोलून दाखवला. तरुण पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यास सांगितलं. पण अजित पवारांनी आपल्या भाषणातून सर्वांचे कान टोचले. जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा असा सल्ला अजित पवारांनी दिला. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु असं आवाहन त्यांनी केलं.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2004 ला आली. मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याच्या खोलात मी जात नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ तेव्हा होते, मला त्यावेळी अपेक्षाही नव्हती. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. पण जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु. संघटना नाही तिथपर्यंत पोहोचवू,” असं अजित पवार म्हणाले.
“आमच्या तरुणपणातील राजकारण वेगळं होतं. यापुढे त्यात अमूलाग्र बदल होत जातील. सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. आपण फार जागरुक राहण्याची गरज नाही. कारण नसताना कोणी बदनाम केलं तर तिथेच खंडन केलं पाहिजे. हा काय म्हणेल, कोणाचा निरोप येईल, अध्यक्ष कळवतील याची वाट पाहू नका. तरुणांनो राजकारणात काम करत असताना तत्परता उपजतच असली पाहिजे. एखादी घटना घडली तर त्या संदर्भातील प्रतिक्रियेसाठी निरोपाची वाट पाहू नका. पण असं करता त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही, भावना दुखावल्या जाणार नाहीत, कोणाला त्रास होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही, संविधानाचा आदर राखला जाईल याची काळजी घ्या,” असं
“भाजपासह का गेलो हे सारखं उकरुन काढायचं नाही. आपल्याला विकासावर, तरुण शक्तीवर लक्ष द्यायचं आहे. दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपला युवक कमी पडता कामा नये. विधानसभा निवडणुकीत एखाद्या तरुणात स्पार्के असेल, काम करण्याची चिकाटी असेल, तसंत जाती-धर्मांना आदर देत काम करत असेल त्यांचा विचार करु शकतो,” असं अजित पवार म्हणाले.
“आज 50-52 आमदार पाठिंबा देतात याचाच अर्थ त्यांच्या मनात खदखदत होतंय. त्यांचे विचार, भूमिका होती पण वरिष्ठ समजून घेत नव्हते. समजून घेत असल्याचं दाखवत होते, पण निर्णय घेत नव्हते. त्याकरिता नाईलाजास्तव हा निर्णय घेतला. पण त्यातून अवमान करण्याची, कमीपणा दाखवण्याची भूमिका नव्हती,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
“नरेंद्र मोदींना पर्याय नाही. तिसऱ्यांदा आपल्याला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे. 18 तास ते काम करतात. त्यांनी अनेक विमानतळं, राष्ट्रीय महामार्ग, पूल, बंदरं उभी केली आहेत. पाण्याचे प्रश्न सुटत आहेत, 2 कोटी लोकांना घऱं, 80 कोची जनतेला मोफत अन्धान्य देण्याचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. परकीय गुंतवणुसीाठी भक्कम स्थान निर्माण केलं आहे हे नाकारत येत नाही. त्याचा फायदा आपल्या देशाला, महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
Prashant Jagtap On Ajit Pawar : पुण्यात आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमासाठी (Pune News) पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे (Attack On Nikhil Wagle Car) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. विशेष म्हणजे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आता पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. तसेच आपला कोणताही कार्यकर्ता आपल्या नसल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची पोलखोल केलीये.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा, असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.
पाहा Video
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा ! pic.twitter.com/X5QHDa2tvs
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 10, 2024
भाजपसह महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला चालू केला, त्यावेळी साक्षीदार म्हणून मी तिथे उपस्थित होतो. आम्हालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मी 27 वर्षांपासून पुण्यात राजकीय कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. मी जबाबदारीने सांगू इच्छितो की, काल निखिल वागळे सरांचा मर्डरच करण्याचा या सर्व लोकांचा प्रयत्न होता, असा घणाघाती आरोप यांनी प्रशांत जगताप केला आहे.
जवळपास 100 एक विटा त्या लोकांकडे होत्या, सातत्याने गाडीत विटा मारल्या जात होत्या. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर कालचा हा भयानक प्रकार घडला नसता. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही ,परंतु या महायुती सरकारचे किती ऐकले पाहिजे हे पोलिसांनी ठरवावे. अजित दादांना गुंडगिरी पसंत नव्हती, पण कालचा हल्ला दादांच्या पक्षातील वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनीच केला याबाबत मी कोर्टात साक्षी द्यायला देखील तयार आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
वागळे हल्ल्यातील 10 आरोपींची नावे
दीपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, राघवेंद्र मानकर, स्वप्नील नाईक, प्रतिक देसरडा, दुष्यंत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर, राहुल पायगुडे.