धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं
धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे.
Source link
धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे.
Source link
Mumbai Crime News : मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
मुंबईत युनानी औषधाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी क्राईम ब्रँच युनियन 3 कडे वारंवार येत होत्या. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 ने स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
ज्यामध्ये आरोपीने तक्रारदाराला ‘ट्रेमर’ नावाच्या आजाराने ग्रासल्याचा आरोप केला आहे. ज्यात दोन्ही हात थरथर कापतात. आरोपींना तक्रारदाराच्या घरी येऊन उपचार करावे लागणार आहेत. ज्यामध्ये आरोपीच्या पित्तामध्ये पुरलेली नस दुरुस्त करावी लागणार आहे. यासाठी पित्तामध्ये छिद्र करून त्यावर धातूच्या नळीद्वारे उपचार केले जातील.
यासाठी तक्रारदाराकडून 14 लाख 50 हजार रुपये रोख घेऊन आरोपी फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने चारही आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 3 ला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 ने नाशिकमध्ये सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.
आरोपींनी महाराष्ट्रातील मनोर, पालघर, भिवंडी, ठाणे, नाशिक मालेगाव या शहरात फसवणूक केली आहे. जे घरोघरी फिरून उपचाराच्या नावाखाली फसवणूक करायचे.
मोहम्मद शेरू शेख मकसूद खान उर्फ डॉ. आर. पटेल (49), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (39), मोहम्मद आसिफ मोहम्मद निसार (27) आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद शरीफ (44) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत.
त्यांच्याकडून युनानी उपचारासाठी वापरलेली उपकरणे, नऊ मोबाईल, सिम, कार आणि तक्रारदाराकडून फसवणूक केलेले १४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. क्राइम ब्रँच युनिट 3 आरोपींकडून तपास करत आहे की त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे.
मुंबईत एका बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता. मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात त्यानं क्लिनिक थाटलं होतं. रुग्णांकडून तो भरमसाठ फी आकारत होता.
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा हा कथित फोटो आहे. या एका फोटो मुळे महाराष्ट्र पेटलेला आहे. अशातच माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा करत संजय राऊत यांनी बावनकुळे यांना इशारा दिला आहे. त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. त्या फोटोत महाराष्ट्रातील नेता दिसतोय. मी कोणाचं नाव घेतलं नाही.जो व्यक्ती आहे त्यांनी ते सांगावं की तो मी नव्हेच म्हणून. किंवा पक्षाच्या लोकांनी सांगावं तसं. तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले हे माहिती होते. मकाऊ मध्ये मात्र एक माणूस साडेतीन कोटी उडवतो म्हणजे खरेच अच्छे दिन आलेत. रेस्ट्राँरंटला जातत आणि साडे तीन कोटी उडवतात. साडे तीन कोटींचे तीन टप्प्यात कॉइन विकत घेतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजन घालू इच्छित नाही. महाराष्ट्रात काय सुरू आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. पण ते म्हणतात कुटुंबासोबत गेले होते. शेजारी बसलेले चायनीज फॅमिली आहे का? माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि व्हिडीओ देखील आहेत. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल. तुमच्याकडे भारतात ईडी सीबीआय असतील, आमच्याकडे मकाऊ मध्ये ईडी सीबीआय आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
साडे तीन कोटी डॉलर्समध्ये व्यवहार झाले. नाना पटोले यांच्याशी सहमत आहे. टोळधाड बंद करा नाहीतर तुम्हाला दुकान बंद करावं लागेल. तीन तासात साडे तीन कोटी खर्च केलेत. कुटुंब खोलीत आहेत. आपण खाली आहात. कुटुंबाच्या गोष्टी करू नका. मी वैयक्तिक टीका करत नाही. फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम होता तिथे, फुटबॉलपटू सोबत आहे तर काय? मोदी पितात तेच ते प्यायले. मोदींचा जो ब्रँड आहे तोच ब्रँड आहे. मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच ते प्यायले असा खुलासा संजय राऊत यांनी अदित्य ठाकरे यांच्या फोटोवर केला.
…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… असं संजय राऊतांनी फोटो ट्विट करत म्हटलंय. राऊतांनी पुढे ट्विटमध्ये म्हटलंय…. मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण साडे तीन कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? दरम्यान हा फोटो खरा असेल तर त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
संजय राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. आपण मकाऊमध्ये ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तिथला हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय.
तर संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर… असं म्हणत बावनकुळेंचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो भाजपनं ट्विट केलेत.
संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलीय. संजय राऊतांकडे आपले 25 लाख रूपये आहेत. आता त्यांनी त्या पैशातून स्वत:वर चांगले उपचार करवून घ्यावेत असंही कंबोज यांनी म्हंटलंय.
चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Source link
World Cup 2023 Final IND vs AUS : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. आता हा खेळ राहिलेला नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Source link
ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारीच आरोपी निघाला आहे.
Source link