सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार

सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार


Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या ‘अनुभवे आले’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी करत पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

मला सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान मिळालं, असे विधान शरद पवारांनी केलंय. आत्तापर्यंत 2 आत्मचरित्रे प्रकाशित झाली. काम करत असताना येणारे अनुभव त्यात आहेत. असे अनुभव येत राहिले तर पुढची आवृत्ती येवू शकते, असे ते म्हणाले.

मी कॉलेज मध्ये शिकत असताना नेता नावाचं साप्ताहिक काढलं. त्याचा दुसरा अंक निघू शकला नाही. बाळासाहेब यांच्यासोबत एक मासिक काढलं. पण त्याचा दुसरा अंक निघाला नाही, असेही ते म्हणाले.  मला व्यवहार कमी कळतो. मी अध्यात्मिकतेचा विचार कधी करत नाही, असेही पुढे ते म्हणाले. 

नानाजी देशमुख यांनी मध्यप्रदेशमध्ये खूप चांगलं काम उभे केलं. त्यांचे माझे विचार भिन्न होते. पण त्यांचं काम आदर्श घेण्यासारखं होतं. अशा अनेक लोकांचा संबंध आला. संकटाच्या काळात आपलं कर्तव्य काय हे जाणणारे लोक महाराष्ट्रात आहेत. सरकारचे पाठबळ असो वा नसो ते आणि त्यांच्या संस्था काम करत असतात. प्रशासनावर किंवा राज्यकर्त्यांवर सामाजिक संस्थांचा दवाब किंवा प्रभाव असत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

शरद पवार हे कुटुंब प्रमुख आहेत. मी आजारी पडलो तर सर्वात आधी धावून येणारे पवार साहेब आहेत, असे प्रताप पवार यावेळी म्हणाले. पवारांची प्रत्येक घटकावर घारी सारखी नजर असते. आमच्या आईने घालून दिलेल्या संस्कारामुळे ही विण घट्ट असल्याचे प्रताप पवार यावेळी म्हणाले. 





Source link

खिशाला फोडणी! टोमॅटोनंतर लसणाचे दर वाढले, एक किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

खिशाला फोडणी! टोमॅटोनंतर लसणाचे दर वाढले, एक किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे


Garlic Price Hike News in Marathi : प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ सहजतेने सापडतो. मुळात लसणाचा हा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण लसणाचे हेच महत्त्व कालांतराने कमी होताना दिसत आहे. कारण कांद्यानंतर लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातून लसणाचे फोडणी गायब झाली आहे. परिणामी शेतरकऱ्यांना लसून हसवतोय तर कांदा रडवतोय अशी अवस्था झाली आहे.   

गेल्या कितेक महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत असताना दिसून येत आहे. उत्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ सुरु आहे. आता लसणाची किंमत 80 ते 100 रुपये किलो असून लसून घाऊक बाजारात 200 ते 350 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाची किंमत 400 रुपयांच्या घरात गेला आहे. नेहमी 80 ते 100 रु. प्रतिकिलो असणारा लसणाचा भाव हा 100 रुपये किलोंपासून वाढत आता 400 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 

लसनाचे दर का वाढले?

यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. लसूण पिकासाठी पाणी जास्त प्रमाणात लागते. मात्र यंदा पाण्याची कमतरता असून लसूण पिकण्याचा कालावधी चार महिन्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लसून लागवडीकडे शेतकरी कमी वळले होते. यावेळी लागवडीसाठी लसणाचे बेण्याचे दर जास्त होते. परिणामी शेतकऱ्यांनी लसून लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नवीन लसूण बाजारात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो. बाजारात लसणाची आवक नसल्याने किरकोळ बाजारात हायब्रीड लसणाचा भाव 200 ते 300 रुपये किलो, तर गावरान लसणाचा दर 400 रुपये किलोवर पोहोचला आहे.

चव वाढवणारा लसूण हा भाजीतून गायब झाल्यामुळे भाजी बेचव झाली आहे. लसणाच्या दरात वाढ झाल्याने खारीक, खोबरा, काजू, बदाम किंवा सुका मेवा यांच्या दराची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे लसूण खाण्याऐवजी सुकामेवाच खावा की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मध्यंतरीच्या काळात कांद्याने सर्वसामान्यांना आसमान दाखवले होते. आता त्यापेक्षा अधिक परिस्थिती लसणाची झाली आहे. जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात वापरल्या जाणाऱ्या लसणाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट टाईट झाले आहे. 

दर कपातीसाठी आणखी चार महिने

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून घाऊक बाजारात लसूण उपलब्ध आहे. यावर्षी पीक यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच हा नवीन लसून बाजारात पाहायला मिळत आहे, मात्र लसणाचे दर कमी होण्यास आणखी तीन ते चार महिने लागतील, असे व्यापारी सांगत आहेत.





Source link

मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय

मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय


Kharghar Liquor Free Zone: मुंबई लगतच्या या एका शहरात दारूविक्री बंद आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नवी मुंबईतील खारघर शहर हे असं एकमेव शहर आहे इथे शंभर टक्के दारुविक्री बंद आहे. गावकऱ्यांनी संघर्ष करत व लढा देत इथे दारुबंदी करुन दाखवली आहे. आज खारघर शहरात लोकवस्ती व आधुनिक सुविधा वाढत आहेत. खरघर एक अत्याधुनिक शहर म्हणून नावारुपाला येत आहे. तरीही या शहरात एकही वाइनशॉप किंवा बार दिसणार नाही. यामागे गावकऱ्यांच्या संघर्षाची कथा आहे. 

खारघरमध्ये एकही वाइन शॉप किंवा बार नाहीये. इतकंच काय तर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येही दारू मिळत नाही. हे सर्व शक्य झाले ते गावकऱ्यांच्या लढ्यामुळं. सुरुवातीला खारघरमध्ये दोन बार होते मात्र, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बंद झाले. त्यामुळं आता खारघरमध्ये शंभरटक्के दारुविक्री बंद आहे. 

2002 च्या आधी खारघरमध्ये ग्रामपंचायत होती. त्यावेळी या ग्रामपंचायतीत व परिसरातील इतर गावे ओवे, कोपरा, बेलपाडा, मुर्बी या गावात दारूची दुकाने नव्हती. हळहळू लोकवस्ती वाढू लागली. त्यानंतर खारघर ग्रामपंचायतीने 2005 साली संपूर्ण खारघर गाव आणि कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारित केला होता. या ठरावाच्या आधारे आजही शहरात दारूबंदी आहे. 

2016 साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यापूर्वी पनवेलमध्ये नगरपरिषदच होती. त्यानंतर 29 ग्रामपंचायतीचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. यात खारघर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. अनेकदा खारघरमध्ये दारुविक्रीचा परवाना देत दारुची दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांनी त्याविरोधात लढा देत ही दुकानेही बंद केली. 

दरम्यान, अनेकदा खारघरमध्ये दारुविक्री सुरू करण्यात यावी म्हणून प्रयत्न केले गेले. दारुबंदीसाठी येथे मतदान प्रक्रिया राबवली जाते. महापालिकेला खारघरमध्ये दारुबंदी करायची झाल्यास त्या प्रभागात उभी बाटली आणि आडवी बाटली अशा पद्धतीने हे मतदान प्रक्रिया राबवली जाते. 50 टक्क्यांपेक्षा मते आडवी बाटलीच्या बाजूने असेल तर दारुमुक्त म्हणून घोषित केले जाते. 

गेल्या काही वर्षात खारघरची लोकसंख्या व अधुनिकीकरण झालं आहे. खारघर एक शहर म्हणून नावारुपाला आलं आहे. असे असतानाही या शहरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी दारुबंदीचा हा लढा यशस्वी करुन दाखवला आहे. 





Source link

बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात? काँग्रेस पक्षाची साथ सोडणार

बाबा सिद्धीकी अजित पवार यांच्या संपर्कात? काँग्रेस पक्षाची साथ सोडणार



मुंबईत मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.  झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती  सूत्रांकडून मिळाली आहे.



Source link

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय


Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी यांचे समीकरण तर तुम्हाला माहीती असेलच. ट्रेन दोन ते तीन मिनिटे उशीरा असली तरी वेळेचे पूर्ण गणित चुकते. गेल्या काही दिवसांपासून बदलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एक नंबर प्लॅटफॉर्मवर नियोजित जागेपेक्षा पुढे थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंदच करण्यात आला आहे. नव्या होणाऱ्या पुलासाठी फलाट क्रमांक एक प्रवासासाठी बंद करणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं रेल्वे प्रवासी मात्र संतप्त झाले आहेत. (Mumbai Local Train)

बदलापूरच्या प्रवाशांसाठी रेल्वेने होम प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र,  या होम प्लॅटफॉर्मचे कामही संथ गतीने सुरू आहे. एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद केल्यामुळं आता मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल गाठण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

बदलापुर रेल्वे स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेने मुंबईच्या दिशेने असलेल्या टोकाकडून ते अगदी कर्जतच्या दिशेकडील शेवटच्या टोकापर्यंत बारा मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे काम हाती घेतलं आहे. पुलावर अत्याधुनिक सोयी सुविधाही करण्यात येणार आहे. 

पुल उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पिलरसाठी फलाट क्रमांक एक व दोनवरील जागा अपुरी पडत आहे. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने एक नंबर फलाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पुढील आठवड्यातच त्या ठिकाणी पोलादी कुंपण घालण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यामुळं येत्या सात दिवसांत रेल्वे प्लॅटफॉर्म बंद होणार आहे. 

लोकल पकडण्यासाठी एकाच फलाटावरती खूप गर्दी होते. त्यामुळं होम प्लॅटफॉर्म झाल्यामुळं ही गर्दी विभागली जाईल, अशी आशा बदलापुरकरांना होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळं बदलापूरकर संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वे विभाग मुंबई कार्यालयातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं आता प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मवरुनच लोकल पकडावी लागणारी आहे. पण अर्धवट अवस्थेत असलेली कामे आणि प्लॅटफॉर्मची अपुरी जागा यामुळं प्रवाशांची मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत तर  प्रवाशांची गर्दी खूप असते. अशावेळी गर्दीमुळं काही अनुचित प्रकार घडू नये, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 





Source link

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा



महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे.  15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp