by Hansraj Agrawal | Jan 31, 2024 | Trending News
Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना संपवून दाखवावं असं ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
“मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं आमचं म्हणणं होतं. पण झुंडशाहीपुढे नमतं घेण्यात येत आहे. मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्राचे लाखो दाखले देण्याचं काम सुरु आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त यांचं आरक्षण धोक्यात येत असताना आमच्यापुढे पर्याय नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत. लोकशाहीने जे काही अधिकार दिले आहेत ती आयुधं वापरणार आहोत,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगेंना जाहीर आव्हान दिलं. तसंच भारतात त्यांच्याइतका मोठा ज्ञानी नाही असा टोलाही लगावला. “मनोज जरांगे यांच्याइतका ज्ञानी भारतात दुसरं कोणी नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते. त्यांना लाखात, कोटीत फरक कळत नाही. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावं. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“ते मराठा जातीसाठी लढत आहेत, मी तर संपूर्ण समाजासाठी लढत आहे. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. मंत्रिमंडळ बैठकीत मी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते. त्या अजेंड्यावर हा विषय नव्हता,” अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2024 | Trending News
रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2024 | Trending News
Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत निर्घृणपणे पत्नीने हत्येचा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 29, 2024 | Trending News
Maratha Reservation : मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या सगसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अधिसुचनेसंदर्भात कोणी न्यायालयात गेले तर आमचं म्हणणं पहिलं ऐकूण घ्यावं यासाठी वकील राजसाहेब पाटील यांचं मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने कुणबी समाजासाठी काढलेल्या अधिसुचनेसंदर्भात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत.
कुणबी दाखल्यासंदर्भातल्या नव्या जीआरमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. भुजबळ जे आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यात बदल केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं. भाजप सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
सगसोयरे अध्याधेश मराठा समाजाची शुद्ध फसवणूक – एकनाथ खडसे
सरकारी अध्यादेश हा मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याची प्रतिक्रिया, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिली. रक्ताच्या नात्याचा सबंध असल्याशिवाय दाखला न देण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या सूचना आहेत. कायद्यात तशी तरतूद आहे. तसंच सगेसोयरेची व्याख्या स्पष्ट नमूद केलेली नसल्यानं, प्रमाणपत्र मिळणं अवघड असल्याचं खडसे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा इशारा
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय.. कायद्यानुसार हे आरक्षण टिकणारं नाही असंही ते म्हणालेत. रक्ताचं नातं असलेलेच सगेसोयरे या श्रेणीमध्ये येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
‘सगेसोरये’ म्हणजे नेमकं काय?
मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातेवाईक विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावं अशी भूमिका जरांगे यांनी मांडली होती. मराठा समाजातील महिलांच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील सासरच्या आधारावर कुणबी दाखला मिळवा. मातृसत्ताक पद्धत म्हणत असाल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 29, 2024 | Trending News
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha Election 2024 mahavikas aghadi became the seat allocation formula in Marathwada Most seats)
Source link
by Hansraj Agrawal | Jan 28, 2024 | Trending News
Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.
काय म्हणाले रोहित पवार?
आपल्याला अडचण ठरू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी सरकारे पाडणे, केंद्रीय यंत्रणा अथवा इतर मार्गाचा अवलंब भाजपकडून केला जातोय, परंतु ज्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे, त्यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणार्थ कुठल्याही दबावाला बळी न पडता भाजपसोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे, असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
आज बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून बिहारची स्वाभिमानी जनता तेजस्वी यांच्यासोबत भक्कमपणे उभी राहील आणि तेजस्वी उद्या नक्कीच बिहारचा भरोसादायक चेहरा म्हणून पुढे येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. 243 जागांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 79 आमदार आहेत. त्यांना काँग्रेसचे 19 आमदार आणि 16 कम्युनिस्ट पक्षांचाही पाठिंबा आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव 2022 मध्ये एकत्र आले होते. तब्बल 17 महिने त्यांचं राजकीय समीकरण टिकलं.
दरम्यान, वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करून, व्यापाऱ्यांना धमकावून मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांना सुरतमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडलं पण शेवटी पदरात काय पडलं? मुंबई हे नैसर्गिक व्यापार केंद्र आहे. जागतिक व्यापाराला पूरक असं वातावरण मुंबईत आहे, त्यामुळे केवळ मोठमोठ्या बिल्डींग उभारून मुंबईचा व्यापार स्थलांतरीत करण्याचे मनसुबे देशाच्या हिताचे नाहीत. हे असले मनसुबे रचणाऱ्यांनी आणि त्यांना साथ देण्यासाठी मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्र धर्म विरोधी गद्दारांनी लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.
Source link