by Hansraj Agrawal | Oct 26, 2023 | Trending News
Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 25, 2023 | Trending News
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत आम्हाला त्याला शोधावं लागेल, असं सूचक विधान जरागेंनी केलंय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मराठा आरक्षणासाठी शपथ घेतल्याबद्दल जरागेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय असं म्हणत चर्चांचा धुरळाही उडवून दिला. त्यामुळे जरांगे-पाटलांचा रोख नक्की कुणाकडे आहे याची चर्चा सुरु झालीय. काही तरी आत शिजतंय. नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. 40 दिवस घेतले नसते. विरोध करणारे कोणी तरी आत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आमच्या अशाच पिढ्या जाणार का शोधायला? त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तर ते पाळतात हे त्यांची ख्याती आहे. त्यांनी शपथ घेतली. त्याचं कौतुक आहे. आदर आहे. पण आमच्या लेकराबाळांचाही प्रश्न आहे. त्यामुळे थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंना सरकारने उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मात्र जरांगेंनी ती फेटाळून लावलीय. मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना फोन केला. उपोषण मागे घेण्याची विनंती महाजनांनी जरांगेंना केली. मात्र सरकारने दोन दिवसांत गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काहीच झालं नाही मग आरक्षणाचं कसं होणार असा सवाल जरांगेंनी महाजनांना केलाय. लेकरांच्या पोटाचा प्रश्न असल्याने आता हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.
आरक्षण घेऊनच या…
दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 24, 2023 | Trending News
Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबरला संपली असून 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन महत्त्वाचं मानलं जात आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपोषणावर ठाम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के आहेत. पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही माझ्या मराठा समाजावर अन्याय करणार आहात, किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे. हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आमच्या लेका-बाळांनी असं काय पाप केलं आहे की आमच्या हक्काचं आरक्षण असतानाही दिलं जात नाही. मराठा समाजाने आरक्षणाचे सर्व निकष पार केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे
मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि त्या शब्दाचा सन्मान करुन मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व पक्षांनी ठराव करुन आमच्याकडून शब्द घेतला होता की फक्त तीस दिवस द्या, आम्ही त्यांना चाळीस दिवस दिले. त्यामुळे माझ्या मराठा समाजाने याचा सन्मान केला. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, ही आमचा प्रामाणिक मागणी आहे. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजाची भावना आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दाला खरं ठरावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही, उद्यापासून लढायला आम्ही सज्ज झालोय. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असेल तर आम्ही त्यांचा सन्मान करतो पण आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून शपथ घेतलीय. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात दिली. मराठा आरक्षण द्यायला कटिबद्ध असल्याची घोषणा शिंदेंनी केली. तर गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला दिलंय. लोकसभेत आरक्षणाचा निर्णय का झाला नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय तसच मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं कौतुकही केलं.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 24, 2023 | Trending News
Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि माजी आमदार अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजा (Maratha) संपूर्ण ताकदीने धनगर समाजाच्या पाठिशी उभं असल्याचं सांगितलं. धनगर समाजाला घटनेत आरक्षण आहे, मग तुम्हाला आरक्षण मिळालं कसं नाही हे कळायला मार्ग असल्याचं सांगत मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला.
सर्वसामान्य धनगर बांधवांनी मनात आणलं तर आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच, इथं बसलेले सर्व धनगर प्रत्येक घरात गेले तर लाखो धनगर उभे राहतील आणि आरक्षण मिळेल असं जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी आम्हाला 40 दिवस दिले आणि धनगर समाजाला 50 दिवस दिले, यात काहीतरी गोंधळ आहे, पण मी छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. आज आम्ही दिलेल्या डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे, संध्यााकाळपर्यंत आशा आहे, पण आज दिवसभरात काहीच झालं नाही तर उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय.
आरक्षण द्यायचं नसेल तर गावात येऊ नका, पुढच्या 50 दिवसात सरकराचं डोकं ठिकाणावर येईल, असंही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरुन आता धनगर समाजही आक्रमक झालाय.. धनगर समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात म्हणजे एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आलीय. आरक्षणासाठी धनगर समाजाने याआधी आमरण उपोषणही केलं होतं. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे.
आज डेडलाईन संपणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
गावबंदीचा नेत्यांना फटका
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता.
काँगेस नेते अशोक चव्हाण यांनाही मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. अर्धापूर तालुक्यातल्या येळेगावात भाऊराव चव्हाण साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अशोक चव्हाणांकडून करण्यात आला. भाषण सुरू होताच त्यांना काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी घोषणा देणाऱ्या तरुणांनी केली. पोलीसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेत कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले.
शरद पवारांचा ताफा अडवला
पुण्यात मराठा समाजाने शरद पवारांचा ताफा अडवण्यात आला. अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गो बॅक अशा आशयाचे पोस्टर दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आदोलकांना बाजुला काढण्यात यश मिळवलं. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. राज्याच्या गावागावात मराठा समाजाने नेत्यांना बंदी घातलीय.काल शरद पवारांनी सोलापूर दौराही रद्द केला होत. मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा समाजाने केला होता. तर अजित पवारांनाही मराठा समाजाने काल काळे झेंडे दाखवले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 23, 2023 | Trending News
रस्त्यावर कुत्र्यांना जेवण टाकण्यावरुन वाद झाला. एका महिला पोलिसाने महिलेला मारहाण केली आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 23, 2023 | Trending News
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Source link