by Hansraj Agrawal | Jan 18, 2024 | Trending News
सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे. काळाराम मंदिराप्रमाणेच नाशिकमध्ये गोराराम मंदिरही (GoraRam Mandir) आहे. नाशिक शहरातील पंचवटीत (Nashik) असलेलं हे मंदिरही प्राचीन आहे. पण या मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे.
या मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचं सांगत तीन संशयित आरोपींनी मदतीचा बहाणा करून मंदिराच्या महंतांना चाळीस लाख रुपयांना गंडवल्याच प्रकार उघडकीस आला आहे.
अशी झाली ओळख
पंचवटीत असलेले काळाराम मंदिर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र याच ठिकाणी गोराराम मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर प्राचीन असून मंदिराची सध्या दुरावस्था झाली आहे. या मंदिराचा जीर्णोधार व्हावा अशी अपेक्षा इथं असलेले महंत राजारामदास गुरु श्री शालिग्रामदास वैष्णव (रा. गोरेराम मंदिर, पंचवटी) यांची आहे. मात्र जिर्णोद्धारसाठी पैसे कमी पडत होते. याच मंदिरात भारती युवराज शर्मा (रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, नाशिक) हा व्यक्ती रोज दर्शनासाठी येत होता. या दरम्यान त्याची महंत राजारामदास गुरु यांच्याशी ओळख झाली.
भारती शर्मा याने महंतांची राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले (दोघे रा. चौघुले निवास, अशोकनगर, सातपूर) यांची भेट करून दिली.
अशी झाली फसवणूक
संशयित आरोपींची ओळख झाल्यानंतर मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करणार असल्याचं तीनही संशयित आरोपींनी महंतांना सांगितलं. बिल्डर आपल्या ओळखीचे असून त्यांच्याकडून कमी खर्चात काम करून देण्याचे आश्वासन देऊन महंतांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळं कारण सांगून राजू चौघुले याने महंतांकडून 25 लाख रुपये घेतले. यानंतर खाजगी कामाकरिता त्यांची इनोव्हा कार सुद्धा घेऊन गेले. पुन्हा आर्थिक अडचण असल्याचे सांगून इनोव्हा कार गहाण ठेवली.
गुन्हा दाखल
राजू चौघुले यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याच लक्षात आल्यानंतर महंतांनी राजू चौघुले, भारती शर्मा आणि रोहन चौघुले या तिघांविरुद्ध विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2024 | Trending News
Navi Mumbai Local Train Video: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोबाइलवर बोलता बोलता एक मध्यम वयाचा व्यक्ती थेट रुळांवर उतरला. मात्र, त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने लोकल आली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रवासी अनेकदा जीवावर उदार होऊन लोकल रुळ ओलांडतात. रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा याबाबत घोषणा व प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही असे प्रकार सुरूच आहेत. तसंत हल्ली जगात असा एखादा व्यक्ती सापडेल जो मोबाईलचा वापर करत नसेल,बहुतांश नागरिक मोबाईलचा वापर करतात मात्र हाच मोबाईल अनेक घटनेत आपल्या जीवावर बेतला असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. 14 जानेवारी म्हणजेच चार दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना रेल्वे रुळांवर उतरते. तितक्यात समोरुन भरधाव ट्रेन येत होती. मात्र त्या व्यक्तीला ट्रेन येत असल्याचे समजलेच नाही. ट्रेन धडक देत पुढे निघून गेली. या घटनेत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव व ओळख अद्याप कळू शकलेली नाहीये. मात्र त्याला एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जायचे होते. मात्र समोरील मात्र समोरील पादचारी पुलाचा वापर करण्या ऐवजी त्याने मोबाईलवर बोलता बोलता उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रूळ पार करून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच ट्रॅकवर येणारी रेल्वे त्याला समजली नाही. हा व्यक्ती मोबाईलमध्ये इतका मग्न झाला होता की शेवटी एका हाताने बोलत असलेला मोबाईल कानाला असताना लोकलने त्याला चिरडले.
लोकलचा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले. या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांनी तात्काळ आरडाओरडा केली. व ही घटना रेल्वे अधिकारी गजेंद्र सिंग यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली मात्र तोपर्यंत त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2024 | Trending News
Sania Mirza Post: सानिया मिर्झाची इन्स्टा स्टोरी पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता पुन्हा रंगू लागल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2024 | Trending News
Maharastra Govt delegation in Davos : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील (CM Eknath Shinde) राज्याचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री दावोसला रवाना झालं. आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या (Magnetic Maharastra) अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर 25 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी श्री जैन यांची चर्चा झाली.
जिंदाल यांच्यासमवेत 41 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या
देशातील एक मोठा उद्योगसमूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी 41 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे 5000 नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार
महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.
महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता आणि सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2024 | Trending News
Karul Ghat Traffic: २२ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान करूळ घाट मार्ग बंद राहणार आहे. रस्ता नुतनीकरणासाठी घाट राहणार बंद
Source link
by Hansraj Agrawal | Jan 15, 2024 | Trending News
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरत नाही. मी दिलेल्या निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य, घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर काही असेल तर ते दाखवून द्यावं लागेल. त्यानंतर तो निर्णय रद्द होऊ शकतो,” असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा राहुल नार्वेकर पक्षात होते हे सांगताना त्यांचे फोटो, व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्यांकडून दाखवले जात आहेत. त्यावर ते म्हणाले की, “2018 मध्ये जे घटनेत बदल केले ती ग्राह्य धरावी की 1999 मध्ये निवडणूक आयोगाकडे दिली ती ग्राह्य धरावी हा प्रश्न आहे. माझे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यापेक्षा जर त्यांनी घटना दुरुस्ती केली असती तर हा प्रसंग आला नसता”.
पुढे ते म्हणाले की, “अरविंद सावंत 2018 चं पत्र दाखवत आहेत. ते माझ्याकडे सुनावणीदरम्यान रेकॉर्डवर होतं. त्या पत्रात संविधानाबाद्दल एकही शब्द नाही. ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल निवडणूक आयोगाला कळवले होते. संविधानात बदल केल्याचा कोणताही उल्लेख त्यात नाही”.
ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पत्रकार परिषद घेत असतील तर हा त्यांचा विषय आहे. पण त्याने काही तथ्य बदलणार नाही. मी दिलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवा, त्यानंतर पुढे बोलता येईल. पण निर्णयातील कोणतीही बाब चुकीची नाही असं सांगत फक्त टीका करणार असतील तर राज्यातील जनता सुज्ञ आहे”.
Source link