महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा

महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा


मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे.  बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील अक्षय वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी शहीद झाला आहे. अक्षयच्या दु:खद निधनामुळे  पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात तहृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच अक्षय यांचा मृत्यू झाला. अक्षय याच्यावर सोमवारी 23 ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या  जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय “अग्निवीर”म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये ते कर्तव्यावर होते जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अवस्थामुळेच त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री त्यांचा हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला आज सायंकाळी इंडिको विमानाने अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात येईल सोमवारी सकाळी पार्थिव छत्रपती संभाजीनगर वरून पिंपळगाव सराई येथे आणण्यात येईल तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा 

गेल्या वर्षी त्यांची अग्निवीर मध्ये भरती झाली अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अक्षय यांना एक लहान बहिण अक्षय यांचे आई वडील शेती करतात अक्षय यांची मृत्यूची वार्ता  कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे…

मूळ गावी होणार अंत्य संस्कार 

दिवंगत अक्षय गवते यांचे पार्थिव विमानाने चंदीगड, दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे. उद्या २३ ऑक्टोबरला सकाळ पर्यंत पार्थिव गावी आणले जाण्याची शक्यता असल्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक विष्णू उबरहंडे यांनी सांगितले.. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, निवासी उपजिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार तसेच पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे उबरहंडे यांनी माहिती दिली.





Source link

VIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं

VIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं



Pune Crime : पुण्यात पीएमटी बसचालकाने दारुच्या नशेच प्रवाशांनी भरलेली बस उलटी चालवत वाहनांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link

बिअर विका, महसूल वाढवा; लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारची समिती

बिअर विका, महसूल वाढवा; लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारची समिती


Maharashtra Excise Department : लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनं आयएएस अधिका-यांच्या अध्यक्षतेत समिती नेमलीय. बिअरवरील उत्पादन शुल्क कसे कमी करता येईल, लोकांना बिअरकडे कसे आकृष्ट करता येईल, यावर समिती काम करणार आहे. मात्र अचानक बिअर विक्री वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे.

राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर समिती स्थापण्यात आलीये. बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रीत घट झाली.अशा अडचणी बिअर उद्योगाच्या प्रतिनिधींनी शासनाकडे मांडल्या आहेत.उत्पादन शुल्क कमी केलेल्या राज्यांमध्ये बिअरच्या विक्रीत वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन शासनाने समिती स्थापन केली आहे. बिअरवरील उत्पादन शुल्क कसे कमी करता येईल, लोकांना बिअरकडे कसे आकृष्ट करता येईल, यावर समिती काम करणार आहे. राज्य सरकारचे नवे मद्य धोरण आखलंय

बिअरसाठी सरकारी समिती का?

बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आलीय, त्यामुळे विक्रीत घट झाली आहे.  देशी-विदेशी दारूमध्ये मद्यार्काचे प्रमाण बिअरपेक्षा अधिक असते. तसंच बिअरची किंमत अधिक असल्याने ग्राहक देशी-विदेशी मद्याला पसंती देत आहेत. त्यामुळे बिअरची विक्री घटली आहे, अशा अडचणी बिअर उद्योगाच्या प्रतिनिधींनी शासनाकडे मांडल्या आहेत. उत्पादन शुल्क कमी केलेल्या राज्यांमध्ये बिअरच्या विक्रीत वाढ झाली आहे.  हे लक्षात घेऊन शासनाने समिती स्थापन केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मद्य विक्रीतून 2023-24 आर्थिक वर्षासाठी 25 हजार 200 कोटींच्या महसूल वाढीचं उद्दिष्ट 

राज्य सरकारनं यंदाच्या 2023-24 आर्थिक वर्षासाठी 25 हजार 200 कोटींच्या महसूल वाढीचं उद्दिष्ट ठेवलंय. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मद्य धोरणात अंशत: बदल करण्याचं ठरवल्याचं मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलंय. त्यासाठीच प्रत्येक विभागावर काम करण्यात येतंय.. राज्य सरकारच्या मद्य धोरणावर विरोधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इतर राज्यांतील बिअर विक्री धोरणाचाही आढावा शासनाला देण्यात येणार आहे. त्यासाठी समितीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.आता विरोधक याबाबत काय भूमिका घेतात हेच पहायचं.

राज्यात दारूचे दर वाढणार

तर, दुसरीकडे राज्यात दारूचे दर वाढणार आहेत. बार, रेस्टॉरंट, क्लबमधील दारू महागणारंय. कारण राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये 5 टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर बारचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. दारू महागल्यानं व्यवसायावर परिणाम होईल अशी भीती बारचालकांनी व्यक्त केलीय.   





Source link

Gaganyaan Test Vehicle TV-D1 launch successful

Gaganyaan Test Vehicle TV-D1 launch successful


After an initial minor glitch, the Gaganyaan Test Vehicle (TV-D1) – a test platform to validate the Crew Escape System (CES) abort demonstration – was launched successfully from Satish Dhawan Space Centre SHAR, Sriharikota on Saturday.

The original plan was to launch at 8 am but it was delayed by 45 minutes due to bad weather conditions. When the launch was planned at 8.45, the Automatic Launch Sequence (ALS) observed an anomaly and put on hold the launch 5 seconds before the lift off.

However, when the lift off finally happened at 10 am, it was a text book launch up to the Crew Escape System (CES) splashing down on the Bay of Bengal about 10 km from Sriharikota.

The unmanned flight test for the Gaganyaan mission from the lift off to the splash down lasted 531.8 seconds. After the lift off from the first launch pad of Satish Dhawan Space Centre, SHAR, Sriharikota, the CES with Crew Module (CM) was separated from the test vehicle at an altitude of 16.7 km.

After the successful launch, ISRO Chairman S Somanath said from the mission control room, “I am very happy to announce the successful accomplishment of the TV-D1 mission. The purpose of the mission was to demonstrate CES for the Gaganyaan programme through a test vehicle demonstration in which the vehicle has gone up to Mach No, which is speed of sound, slightly above that, and initiated an abort system for the CES. It took the CES and CM away from the vehicle. The subsequent operation of the CM and CES and the parachute openings and touch down in the sea at the required velocity has been very well accomplished..”

On the reasons as to the launch was put on hold, Somanath said initially the launch was supposed to be at 8 am but due to weather-related issues, the launch was reschduled at 8.45 am. But, after going through the nominal lift-off process, there was a hold issued by the Ground computer, which is called the Automatic Launch Sequence computer that detected a non-conformance for the engine to allow the engine the thrusting to further go. This was due to a monitoring anamoly in the system, he said.

“We could identify the anamoly very fast and correct it. To make the stage ready, it took some time to refill the gases. Once that was completed, the ALS checked the entire health of the vehicle and finally, the mission computer and ground check out computer authorised the launch to take off,” he said.

“I am happy that our team could understand that in case of an anamoly how to rectify it and come back fast. This is a big training for the entire team to prepare for the Ganganyaan programme,” he said.

Somanath said the mission was unique with two inertial systems – one in the vehicle and the other in the CM and both were operated successfully. Two ALS were also running to make the two computational systems work synchronously.

Mission Director S Shivakumar said it was a bouquet of three experiments put together. The test vehicle; the CES and CM – we have perfectly demonsrtated in the first attempt. The initial glitch was not a problem. All the systems performed well.

R Hutton, Mission Executive for Crew Module Realisation and Mission Director of Gaganyaan said today’s launch was a major milestone in the Gaganyaan mission. In this programme, the most important is the safety of the crew, which has been desmonstrated in today’s mission where we simulated an abort and where the CES carries away to a safe place.

The Gaganyaan vehicle, though fully robust, but cannot take everything to chance. If any malfunction happens, there has to be a system in the launch vehicle take the crew module safely and land. This is what was demonstrated today in the first mission of the test vehicle.

P Sunil, CES, said it was a perfect lift off and CES functioned as it was planned. The CM has come down in precision, he said.

According to the director of Human Space Flight Centre M Mohan, this has been the first opportunity for the Gaganyaan Mission to commence its journey.





Source link

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ



केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
 



Source link

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे बॅनर चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे बॅनर चर्चेत


Maharashtra Politics :  राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि राज्याचं राजकारण बदललं.आता मात्र आगामी निवडणुकीमध्ये बारामतीत दोन्ही गटात कुटुंबामध्येच लढत होणार असल्याच्या चर्चा रंगतायत. त्याला कारण ठरलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेल्या शुभेच्छा. बारामतीच्या भावी खासदार या अर्थाच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसनिमित्त वारजे पुलाखाली लावण्यात आला. 

वारजे हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याची चर्चाही यानिमित्तानं सुरु झाली.असं असताना बुधवारी संध्याकाळी लागलेला फ्लेक्स गुरुवारी सकाळी मात्र गायब झालेला पाहायला मिळाला. या होर्डिंग्जवर सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांचा फोटो होता. तसंच सोबत संसदेचा फोटोही होर्डिंग्जवर लावण्यात आला होता.मात्र यामुळे सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसणार?

लोकसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्याच जागा येऊ शकतात. त्यामुळे पदरी पडलेल्या जागा जिंकून आपली शक्ती वाढवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनंच लोकसभेसाठी नवीन चेह-यांना अजित पवार संधी देऊ शकतात. विशेषत: राज्यात लोकप्रिय असणा-या नावांना लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते. 
यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात.  बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करत असल्याची माहिती आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात अभिनेते अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सहकार मंत्री वळसे पाटलांना संधी मिळू शकते.  साता-यात शरद पवार यांचे खास-विश्वासू अशी ओळख असणा-या श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून पसंती मिळू शकते.. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात विधानपरिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजतंय तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसमध्ये असेलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकही झाल्या असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही राज्यातील चारपैकी 3 खासदार अजूनही शरद पवारांसबोतच आहेत. सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे लोकसभेतील ताकद वाढवण्यासाठी स्मार्ट खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधीच घोषणा करुन प्रचारात आघाडी घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp