पंतप्रधान मोदी यांचा महादौरा! शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांचा महादौरा! शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन



मुंबई ट्रान्स हार्बर अटल सागरी सेतूवर 10 किलोमीटर परिघातल्या ग्रामस्थांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. 



Source link

2024 ला मोदी पंतप्रधान न झाल्यास भरचौकात फाशी घेणार, शिंदेच्या आमदाराचं मोठं विधान

2024 ला मोदी पंतप्रधान न झाल्यास भरचौकात फाशी घेणार, शिंदेच्या आमदाराचं मोठं विधान



Santosh Bangar Controversy: बांगर यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करुन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असं नेमकं काय म्हणाले बांगर हे सविस्तर जाणून घेऊया. 



Source link

'हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना…', सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज

'हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना…', सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज


हा सत्याचा विजय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘झी 24 तास’शी संवाद साधताना दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर केली आहे. विधानसभा अध्यक्षांवर नेमका कोणता दबाव होता अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल सुनावताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी यावेळी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवलं आहे. 

एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “हा सत्याचा विजय आहे. या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे हे आज सिद्ध झालं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे”. 

पुढे ते म्हणाले की, “खरी शिवसेना, खरा धनुष्यबाण यापूर्वी निवडणूक आयोगाने आम्हाला दिला होता. तो निर्णय त्यांनी कायम ठेवला.  खऱी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिला आहे. कारण पक्षाकडे जास्त समर्थन आहे. त्यासह भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय सुनील प्रभू यांनी सादर केलेली कागदपत्रं खोटी असून, उद्धव ठाकरेंना सर्वाधिक समर्थन असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. राजकीय पक्ष एखाद्याची खासगी मालमत्ता असू शकत नाही. त्यामुळे प्रमुखांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याविरोधात आवाज उठवता येतो असं मत मांडण्यात आलं आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो”. 

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर करत म्हटलं की, “अध्यक्षांनी भरत गोगावले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे, ती अयोग्य आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बाजूने दिला असताना,  त्या अर्थाने आम्ही जो व्हिप दिला होता त्या हिशोबाने 14 आमदार अपात्र ठरायला हवे होते. कोणत्या दबावाखाली अपात्र केलं नाही ते अनपेक्षित आहे. या निकालाचा पूर्ण अभ्यास करुन, कायदेतज्ज्ञांची चर्चा करुन नेमकं कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र ठरवलं नाही हे समजून घेऊ. कारण आम्ही दिलेला व्हीप मिळाला नाही असं त्यांच्यातील कोणी सांगितलं नव्हतं”. 





Source link

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले


Pune News Today: दोघे एकाच रूमवर राहायचे. एक होता 37 वर्षाचा तर दुसरा 19 वर्षाचा. वयाने मोठा असणारा सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा. घरातली सर्व कामे त्यालाच सांगायचा. स्वयंपाक करायला लावायचा. भांडी घासायला लावायचा. रूम साफ करण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच टाकायचा आणि काही चुकलं की मारहाणही करायचा. या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला. हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा परिसरात. कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे

नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे, मुळ रा. छत्तीसगड) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मारहाण करत गळा चिरुन त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनेच खून केल्याची कबुली दिली.

मयत आणि आरोपी कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करतात. ज्या ठिकाणी त्याचे काम सुरू आहे त्याच परिसरातच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोघांचीही राहण्याची व्यवस्था एकाच खोलीत करण्यात आली होती. वयाने मोठा असणारा नसीम कमलला सारखा त्रास द्यायचा. घरातील सर्व कामे त्यालाच करायला लावायचा. इतकाच नाही तर दारू पिऊन मारहाण करायचा. सोमवारी रात्रीही नसीम याने ध्रुव त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर आरोपी ध्रुव हा देखील त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात येऊन तो पुन्हा रूमवर झोपी गेला. मात्र मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपी ध्रुव याला अटक केली

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, विशाल मेमाने, लवेश शिंदे, विकास मरगळे, शशांक खाडे, अभिजीत रत्नपारखी, राहुल वंजारी यांच्या पथकाने केली आहे.





Source link

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!


Maharastra Lok Sabha Election 2024 : एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shivsena Ineligible case) निकालावर सर्वांचं लक्ष असताना आता दिल्लीत मोठ्या हलचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election Seat Allocation) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सत्ता समिकरण (Maharastra Politics) कसं असेल? यावर चर्चेला उधाण आलं होतं. अनेक अंदाज देखील लावले जात होते. अशातच आता दिल्लीतून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? 

राष्ट्रवादी लोकसभेच्या 14 जागांवर लढणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने 14 जागेवर दावा केल्याची माहिती समोर आलीये. तर रायगड लोकसभा उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचं देखील समजतंय. त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही असताना मावळ जागेवरील हक्क सोडणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. तर रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची गुप्त बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची चर्चा झाल्याची माहिती मिळालीये. 

दरम्यान, लोकसभेच्या 23 जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. राज्यात 48 जागांची चाचपणी केल्यानंतरच आम्ही 23 जागांवर दावा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात अडचण नाही. मात्र, एक दोन जागांसंदर्भातला तिढा वरिष्ठ नेते सोडवतील. त्यामुळे जागावाटपासंदर्भात कोणतीही अडचण येणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यामध्ये बूथ कमिट्यांची स्थापना करण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्या. त्यामुळे आता बीडमध्ये शरद पवार कोणता गेम खेळणार? यावर सर्वांच्या नजरा आहेत.





Source link

Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद

Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद


Pune Corona: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 च्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेय. JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 250 वर पोहोचल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे यातील तब्बल 150 रुग्ण पुण्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासांत JN.1 च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात कोणत्या भागात किती रूग्णांची नोंद?

राज्यात JN.1 या सब व्हेरिएंट पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुण्यासह ठाण्यात देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले होते. राज्यात JN.1 चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक 59 रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 150 वर असून, राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के पुण्यात आहेत.

पुण्यासोबतच नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली 7, ठाणे 7, जळगाव 4, अहमदनगर 3, बीड 3, छत्रपती संभाजीनगर 2, कोल्हापूर 2, नांदेड 2, नाशिक 2, धाराशिव 2, अकोला 1, रत्नागिरी 1, सातारा 1, सिंधुदुर्ग 1 आणि यवतमाळ 1 अशी रुग्णसंख्या आहे.

गेल्या 24 तासांत 61 रूग्णांची नोंद

राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 61 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 70 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के असून, मृत्युदर 1.81 टक्के आहे. राज्यात मागील 24 तासांत 2 हजार 728 चाचण्या झाल्याच. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर 2.23 टक्के आहे. 

राज्यातील आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

पुणे महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरोना चाचण्यांची संख्या जास्त आहे. याच वेळी जेनेटिक सिक्वेंसिंगणासाठी सर्वाधिक नमुने पुण्यातून पाठवले जातायत. राज्यात JN.1 चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. JN.1 हा कोरोनाचा सब-व्हेरिएंट फारसा धोकादायक नसून तो सौम्य स्वरूपाचा आहे. 

देशातही वाढतायत कोरोनाचे रूग्ण

केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोविड संसर्गामुळे मृत्यू झाल्यांमध्ये केरळमधील दोन आणि कर्नाटक आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या 4 रूग्णांच्या मृत्यूंमुळे मृतांची संख्या 5,33,396 वर पोहोचलीये.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp