कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा


Narayan Rane on Maratha Reservation :  मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज-जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय.

कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय. ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणेंनी जरांगेंना दिला आहे.

मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा सकल मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार

प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा निर्धार सकल मराठा क्रांती मोर्चानं केलाय. आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. मनोज जरांगे-पाटलांचे वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलाय. 

मराठा आंदोलनामुळे आमच्या पक्षाला कोणताही धोका नाही

मराठा आंदोलनामुळे आमच्या पक्षाला कोणताही धोका नाही. मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीनं घालवलं अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची इच्छा आहे असंही बावनकुळेंनी म्हंटलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकारची धावाधाव सुरू असल्याचं बोललं जातंय. 

सुनील कवळेंच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक 

सुनील कवळेंच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक झालेत. सरकारमुळेच बळी जातायत, असा आरोप जरांगेंनी केलाय. तर आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसेल तर परिणाम तीव्र होतील असा इशारा विनोद पाटलांनी सरकारला दिलाय.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या घरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भेट दिली आणि कुटुंबाचे सात्वन केलं..सुनील कावळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता संभाजीनगरमधल्या मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ  पवार काका-पुतण्यांनाही बसणार

मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका-पुतण्यांनाही बसणार आहे. मराठा समाजानं राजकीय नेत्यांना गावागावात प्रवेशबंदी केलीय.. त्याचा फटका शरद पवार आणि अजित पवार यांनाही बसणाराय… येत्या 23 ऑक्टोबरला बबनदादा शिंदेंच्या पिंपळनेर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार सोलापुरात येणार आहेत. तर त्याचदिवशी माढामध्ये शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतक-यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवार असोत नाहीतर इतर, एकाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.. तर अजित पवार चले जावच्या घोषणा सकल मराठा समाजानं दिल्या आहेत.





Source link

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं


gadchiroli crime news : क्राईम पेट्रोल या शो मध्ये गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना कथित स्वरुपात पहायला मिळतात. मात्र, क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. गडचिरोली येथे 20 दिवसात 5 जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. 2 महिलांनी पूर्ण कुटुंब सपंवल आहे. पोलिसांनी या दोघी महिलांना अटक केली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे कोडे उलगडले आहे. अन्नपाण्यात विष मिसळून पाच जणांची हत्या करण्यत आली आहे. सून आणि मामीचे हे दुष्कृत्य आहे. 20 दिवस विषप्रयोग सुरु होता. यांचा हत्येचा प्लान पाहून पोलिसही हडबडले आहेत. या दोघींना अटक करण्यात आली आहे. 

आधी पती- पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत लागोपाठ पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आलाय. अन्नपाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपविल्याचे समोर आले.  सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले.  

शंकर तिरुजी कुंभारे (५२),  विजया शंकर कुंभारे,  त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) आणि मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत.  सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५)  आणि रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडलं नमेकं?

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे  यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने  पती शंकर तिरूजी कुंभारे  यांनी त्यांना चंद्रपूरला नेले.त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही  उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी आली होती.  प्रकृती   खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती.  चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक  मृत्यूची नोंद झाली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. 

संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती बीएस्सी ऍग्री सेकंड टॉपर आहे. ती व रोशन हे पोस्ट खात्यात सोबत काम करत. तेथेच त्यांचे सूत जुळले. डिसेंबर २०२२ मध्ये त्या दाेघांनी विवाह केला. ते एकाच जातीचे आहेत, पण प्राध्यापक वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट तिने रचला. रोशनची मामी रोजा रामटेके महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग होता. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट अतिशय थंड डोक्याने आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

संघमित्रा कुंभारे हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले.  २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

सध्या या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व   रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस तपास करत आहेत.

 





Source link

सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?

सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?


Maratha OBC Reservation : जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त ७ दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, कायदेतज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेवूया. 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं राज्य सरकार वारंवार सांगतंय. त्यात मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा शिल्लक आहे. अजूनही आरक्षणासाठी सरकारकडून नेमक्या काय हालचाली सुरु आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. 

कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं दूरच राहिलं मात्र 7 दिवसात मराठा आरक्षण देणारं कसं, घटनेत बदल करणार का, फॉर्म्युला काय असेल, अंमलबजावणी कशी करणार या प्रश्नांची उत्तरंही मिळालेली नाहीत. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणते निकष आवश्यक असतात हे पुढे पाहणार आहोत मात्र त्याआधी जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रावरुन सरकारला इशारा दिला आहे. तर जरांगे-पाटील म्हणतात त्याप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, 52 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, असं मराठा समाजातील विधीतज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोल्हापुरात वकील परिषद होतेय त्यात मराठा आरक्षणावर खल होत आहे. 

एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते

समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे लागते. समाजाची आर्थिक, सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण होतं. मागासलेपणाचा अहवाल विधिमंडळात मंजूर करुन घ्यावा लागतो. मागासवर्ग आयोग संबंधित जातीचा सर्व स्तरावर अभ्यास करतो. मराठा समाज मागासलेला असल्याचा अहवाल गायकवाड आयोगानं दिला आहे.  मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणा-या विनोद पाटलांनीही मराठा आरक्षणासाठी फॉर्म्युला दिला आहे. 

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात आधीच क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. जरांगे सांगतात त्यापद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं अनेक कायदेतज्ज्ञांनाही वाटतं. 
मराठा आरक्षणाचा कायदेशीर पेच कायम आहे. मात्र सरकारकडून आरक्षण देण्यासंबंधी नेमकी कोणती प्रक्रिया, हालचाल सुरु आहे.. याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अवघ्या सात दिवसात राज्य सरकार जरांगे पाटलांना दिलेला शब्द पूर्ण कसा करणार, आरक्षण कसं देणार अशी चर्चा सुरु झाली आहे. 

 





Source link

तरुणीला बळजबरी शेतात नेले अन्…; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य

तरुणीला बळजबरी शेतात नेले अन्…; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य


पुढील
बातमी

शेतातील विहिरीच्या पाण्यावरुन वाद; काकाने पुतण्याला कायमचे संपवले





Source link

महाराष्ट्रात पुन्हा महाभूकंप? आणखी एका राजकीय बंडाच्या चर्चा, पुन्हा मोठा धमाका?

महाराष्ट्रात पुन्हा महाभूकंप? आणखी एका राजकीय बंडाच्या चर्चा, पुन्हा मोठा धमाका?



राज्याच्या राजकारणाला भूकंप तसा नवीन नाही. एकनाथ शिंदे, अजित पवारांचं बंड महाराष्ट्रानं पाहिलंय. आता पुन्हा एकदा राज्यात भूकंप होऊन उलथापालथ होणार अशा चर्चांना उधाण आल आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp