सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात



थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ ‘या’ दोन शहरात झाली आहेत. 
 



Source link

नाना खडकवासल्यातून निवडणूक लढणार? प्रश्न ऐकताच शरद पवार म्हणाले, 'नाना पाटेकर आणि माझे…'

नाना खडकवासल्यातून निवडणूक लढणार? प्रश्न ऐकताच शरद पवार म्हणाले, 'नाना पाटेकर आणि माझे…'



Sharad Pawar On Nana Patekar Election Khadakwasala: आगामी वर्षामध्ये देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.



Source link

'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप…'; राऊतांची कठोर शब्दांत टीका

'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप…'; राऊतांची कठोर शब्दांत टीका


Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामवरुन राज्याबरोबरच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आज उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाने थेट प्रभू रामाला किडनॅप केल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अयोध्येतील हा कार्यक्रम भाजपाचा असल्याचं सांगत या कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं म्हटलं आहे. 

संपूर्ण देशाचा कार्यक्रम नसून…

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राऊत यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर वर टीका केली आहे. अयोध्येतील हा बहुचर्चित कार्यक्रम संपूर्ण देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा असल्याचं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. उत्तर प्रदेशाबरोबरच केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी एका पद्धतीने प्रभू श्रीरामाला किडनॅपच केलं आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना…

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. “भाजपा पार्टी कोण आलीय रामलल्लाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देणारी. देव स्वत: भक्तांना बोलावतो. भक्त हे देवाच्या दरबारात स्वत: जात असतात. भाजपाने आपला उत्सव आणि प्रचार रॅली तिथे करणार आहे. त्यात पावित्र्य कुठे आहे? भाजपचा हा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊ. भाजपाच्या या कार्यक्रमाला जाण्यात आम्हाला रस नाही. राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना रामाच्या विचाराशी नाते आहे. हा कार्यक्रम म्हणजे चुनावी जुमला आहे. त्यांना करायचे ते करू द्या,” असं राऊत म्हणाले.

कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही

“हे निमंत्रण म्हणजे नेमकं काय आहे? हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जाऊ रामलल्लांच्या दर्शनाला,” अशा शब्दांमध्ये राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. 

कशातही भाजपाचं योगदान नाही

भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधताना राऊत यांनी या पक्षाचं कशातच योगदान नाही अशा टोला लगावला. “देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचेही योगदान नाही ते भारताच्या संसदेचे उद्घाटन करतात, अयोध्येच्या संघर्षात ज्यांचे योगदान नाही ते आज सगळ्यात पुढे आहेत. हेच राजकारण आहे. भाजपला वाटत असेल की ते पवित्र काम करत आहे, तर ते तसं काहीही नाहीये. या देशाचे संस्कार आणि संस्कृती त्याला मान्यता देत नाही”,असे राऊत यांनी म्हटलं आहे. 





Source link

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई


Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. केडीएमसी प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याची चौकशी देखील करण्यात येत आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड या मोहने ,अंबिवली, टिटवाळा प्रभाग क्षेत्र “अ”परिसरात पाहणी करत होत्या. याच वेळी धर्मेंद्र सोनवणे हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी दुचाकीवरून आयुक्तांच्या कारचा पाठलाग करत होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला थांबवले. तसेच त्याच्या चौकशीचे आदेश दिले.

यानंतर प्रशासनाने त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र त्याने त्याचे समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.आयुक्त जाखड यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला असून त्या पाहणी दरम्यान कुठे कुठे जातात याची माहिती हा कर्मचारी देत त्रयस्थ व्यक्तीला देत असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, आता ऑन ड्युटी असतांना इतर ठिकाणी आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा इशारा या माध्यमातून देण्यात आलाय.

पोलीस बंदोबस्त करत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलची केली आमदार दंगेकारांनी चौकशी 

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर आज शिक्षकांचा मोर्चा होता. आणि या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलला ड्युटी लावण्यात आली. हातात लहान बाळ घेऊन ही महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. मुलगा रडत असताना पाहून आमदार रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी या महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. विचारपूस केली असता महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत आहेत. लहान बाळ असतानाही बंदोबस्ताच्या ड्युट्या लावत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना फोन लावून याबाबत विचारणा केली. विचारणा केली असताना हा प्रकार चुकीचा झाला आहे. याबाबत पोलिस आयुक्तांना आपण भेटणार असून पाटील यांना टाकीत देण्याचा सूचना देणार आहोत. सावित्रीच्या लेकीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर गृहमंत्री काय करतायेत असा प्रश्न आमदार धंगेकारांनी उपस्थित केला. वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नाही.लहान मुलाला घेऊन मला ड्युटी करावी लागते माझ्यासारख्या अनेक महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचं महिला कॉन्स्टेबल यांनी सांगितलं. 

 





Source link

'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर…'; ठाकरेंचे फटकारे

'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर…'; ठाकरेंचे फटकारे



Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp