Parliament security breach : संसदेमधील धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधील दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. संसदेच्या अधिवेशनात करून रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते.मात्र या तरुणांनी या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कसून चौकशी केली जात आहे.
या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू असताना पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तात्काळ शहरातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानात चौकशी सुरू करण्यात आलेय. संसदेत ज्या रंगीत धुरांच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते, त्याच क्षमतेच्या धुराच्या नळकांड्या या कल्याण मधील विक्रेत्यांकडे आहेत का? याची पोलिसांनी दुकानात जाऊन चौकशी सुरू केली. मात्र, कल्याण मधील या फटाके विक्रेत्यांकडे अशाप्रकारे तितक्या क्षमतेच्या धुराच्या नळकांड्या नसल्याचं दुकानदारांनी पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी दुकानातील धुराच्या नळकांड्याचे काही नमुने आपल्या ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केलाय. पोलिसांच्या या सगळ्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, संसदेतल्या घुसखेरीमागे सर्वात मोठं कारण बेरोजगारी आणि महागाई असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
13 डिसेंबर रोजी संसदेच्या अधिवेशनात सहा तरुण घुसले होते. संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. मास्टरमाईंड ललित झा सोबत महेश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलीय. संसदेत घुसखोरीचा कट
रचण्यात ललितसोबत महेशचा हात असल्याचं समोर आलंय. महेश हा आरोपी नीलम कौरच्या संपर्कात होता. मूळचा राजस्थानचा असलेला महेश मजुरी करायचा. गेल्या कित्येक दिवसांपासून तो भगतसिंह फॅनक्लब पेजच्या माध्यमातून नीलमशी संपर्कात होता. घटनेत सहभागी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दीड वर्षांपासून रचत होते कट
घुसखोरी करणारे हे सर्वजण एकमेकांना ऑनलाईन ओळखत होते.. सर्वचजण भगतसिंग फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षांआधी सर्वजण म्हैसूरमध्ये एकमेकांना भेटले होते. तिथेच त्यांनी कट रचायला सुरुवात केली. तर काही महिन्यांआधीच चौघांची पुन्हा भेट झाली आणि या दुस-या भेटीत संसदेत घुसखोरी करण्याच्या प्लॅनला अंतिम स्वरुप देण्यात आलं.. प्राथमिक चौकशीत चार आरोपींची नावं समोर आली आहे.. लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी मनोरंजन खासदाराच्या पासवर व्हिजिटर गॅलरीत बसले होते. तर नीलम आणि अमोल शिंदे बाहेर थांबले होते. लातूरच्या अमोल शिंदेंने स्मोक कँडल्स आणल्या होत्या. दिल्लीला जाण्याआधी हे सर्व विकी शर्माच्या घरी गुरुग्राममध्ये थांबले होते.
Devendra Fadnavis On Sandeep Kshirsagar : बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळीच्या घटनेची (Beed arson incident) एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडताना केली होती. मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बीडमध्ये हिंसक जमावाने बहुतेक सर्व राजकीय पक्षांना लक्ष्य केलं. अशा घटनाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे, अन्यथा राज्यात कायदा-सुव्यवस्था कधीच राहणार नाही. एकूण 278 आरोपींना अटक झाली. त्यातील 30 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलीय. माजलगाव घटनेतील 40 आरोपी फरार असून बीड घटनेतील 61 गुन्हेगार फरार आहेत. या आरोपींची कसून चौकशी होते आहे. मोबाईल लोकेशन, एकमेकांना पाठविलेले एसएमएस आदी सर्व पाहिले जात आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एक बाब अतिशय स्पष्ट की, ज्यांच्याविरोधात पुरावे सापडले, त्यांनाच अटक करण्यात आली आहे. माजलगावमध्ये सुमारे 5000 चा जमाव होता तर बीडमध्ये 1500 चा. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता का, हेही पोलिस तपासत आहेत. फरार आरोपींना अटक झाली की मास्टरमाईंडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. याप्रकरणी SIT चौकशीची मागणी झाली. पण पोलिस प्रमुखांशी चर्चा केली, तेव्हा तपास योग्य गतीने पुढे गेला असल्याने त्याबाबत त्यांनी तशी गरज नसल्याचे सांगितले. पण सभागृहातील सदस्यांची इच्छा असेल तर 2 दिवसात एसआयटी गठीत करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं आहे.
बीडमध्ये हिंसक जमावाने बहुतेक सर्व राजकीय पक्षांना लक्ष्य केले. अशा घटनाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे, अन्यथा राज्यात कायदा-सुव्यवस्था कधीच राहणार नाही. एकूण 278 आरोपींना अटक. त्यातील 30 सराईत गुन्हेगार. माजलगाव घटनेतील 40 आरोपी फरार असून बीड घटनेतील 61 गुन्हेगार… pic.twitter.com/QvzUcNznbp
दरम्यान, या घटनेत पक्ष, जात, धर्म काहीही न पाहता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यात मागे हटण्याची गरज नाही. कुणाची चूक नसेल आणि अटक झाली असेल, तर त्याला मी स्वतः बाहेर काढण्यासाठी मदत करेन, असंही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना म्हटलं आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका राज्य कर्मचारी संघटनेने घेतली होती. पण अखेर संप मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी संध्याकाळी मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली होती. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं होतं. या आवाहनला अखेर यश आलं आहे.
राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केलं होतं.
यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, राज्यातील राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात बैठक घेण्यात घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेच.
संघटनांच्या मागणी नुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, 31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे 26 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच 80 वर्षावरील निवृत्तीवेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे, सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविणे, निवृत्तीवेतन,अंशराशीकरण पुनर्रस्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवाप्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जुनी पेन्शन योजना लागु करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवडयात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीने सुचविलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन, आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनास सादर करतील. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल.
जालन्यातील दिग्गज नेते राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर राजेश टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय संवाद आहे?
राजेश टोपे – माझ्यात आणि त्यांच्यात एवढंच झालं की, आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. त्यांना म्हटलं की तुम्ही यावेळेस सोडावं. ते नाही म्हणाले.
बबनराव लोणीकर – भैय्यासाहेब राजकारण मोठं नसतं. त्या उपाध्यक्षपदात काही नाही. आम्हालाही माहिती आहे. आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर बोललात.
बबनराव लोणीकर यांनी ‘झी24 तास’शी बोलताना ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत की, “मी ऑडिओ क्लिप पाहिली किंवा ऐकलेली नाही. जर अशी काही ऑडिओ क्लिप असेल तर ती खरी नाही. आम्ही तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून चर्चा केली होती, काही निर्णय घेतले होते. त्यावेळी काही वाद झाले होते. पण ही ऑडिओ क्लिप खरी नाही”.
gadchiroli crime news : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील गुंडापुरीतल्या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. देवपूजारी असलेल्या बापाला जादूटोण्याच्या संशयावरून सख्खे मुलं आणि नातेवाईकांनी ठार केले आहे. गडचिरोली पोलीसांनी नऊ आरोपींना जेरबंद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत 6 डिसेंबर तिहेरी हत्याकांड झाले होते. देवु कुमोटी 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी 55 वर्षे आणि 10 वर्षाची मुलगी या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या करण्यात आली होती. मृतकाचा मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासात धक्कादायक खुलासा
खळबळजनक हत्याकांडात पाच तपास पथके गठीत करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादुटोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो असा संशय गुंडापुरी व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता. ज्यात पोलिसांना तथ्य आढळले नाही. मात्र या संशयाने ग्रामस्थ संतप्त होते. सोबतच कुटुंबीय त्रस्त होते. त्यातून कट रचून मयताच्या दोन्ही मुलांनी व नातेवाईकांनी ही हत्या केली.
आजोळी आलेली नात या सर्वांची साक्षीदार असल्याने तिलाही संपविण्यात आले. लोकांचे मृत्यू आणि आजारपणास पुजारी देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले रमेश कुमोटी, विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजु आत्राम (येमला), नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली यांनी थंड डोक्याने हे कृत्य केले आहे.
चुलत्याची हत्या करुन मुंडकं घेऊन बाईकवर फिरला
जमिनीच्या वादातून सावत्र पुतण्यानं वृद्ध चुलत्याचा खून केल्याची घटना शेवरे गावात घडली.. धक्कादायक बाब म्हणजे शंकर जाधव या चुलत्याचा खून केल्यानंतर आरोपी शिवाजी जाधव मोटारसायकलवरून त्यांचं मुंडकं घेऊन फिरत होता.. माळी नगर परिसरात आल्यानंतर त्यानं मुंडकं आणि मोटारसायकल तिथंच टाकली. त्यानंतर तो अकलूज पोलिसांना शरण गेला… जमिनीचा तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याचा निर्घृण खून करण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत, हे कटू वास्तव यानिमित्तानं पुन्हा समोर आलंय