'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं

'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं



Ajit Pawar PHD Statement : पीएचडी करणे म्हणजे पक्ष बदलण्यासारखं नाही, दहावी नापास अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात विद्यार्थ्यांनी राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.



Source link

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ


Adivasi Ashram School in Palghar : सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कड्याक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर  अंघोळ करावी लागतेय. आश्रम शाळेत बाथरुम नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदीवर जावे लागतेय. पालघर जिह्यातील एका आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. देश घडवणाऱ्या पिढीला आत्तापासून मोठा संघर्ष करावा लागत आहे. 

पालघर मधील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चाबके – तलावली या निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थांना अनेक अचणींचा सामना करावा लागतोय. येथे पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत स्नानगृहच नाही. यामुळे येथे राहणाऱ्या  विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून नदीत आंघोळीसाठी जावं लागत आहे. 

कडाक्याची थंडी आणि पाऊस याचा विचार न करता या आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी स्नानगृह नसल्याने आपला जीव धोक्यात टाकून नदीतील वाहत्या पाण्याचा प्रवाहात आंघोळी साठी जावं लागत आहे. कडाक्याच्या थंडीत देखील हे चिमुकले विद्यार्थी कोणत्याही सुरक्षा शिवाय नदीत अंघोळीसाठी जातात.  ह्या वेळेस त्यांच्या सोबत कोणताही शिक्षक जात नसल्याचेही या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी विकास प्रकल्पांच्या अनुदानित आणि विनाअनुदान आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग वर्षाला कोट्यावधी रुपये निधी खर्च करत . मात्र हा खर्च केला जाणारा निधी नेमका जातो कोणाच्या खिशात असा प्रश्न या सगळ्या प्रकारानंतर उभा राहिला आहे. आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्नानगृह आणि स्वच्छतागृह या सुविधा देणे बंधनकारक असताना देखील या आश्रम शाळेत ह्या प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसल्याचं येथील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बँकिंग कामकाजाच्या सहलीचे आयोजन

व्यंकटेश फाउंडेशन मार्फत जि.प प्रा.शाळा,बोधेगाव मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यासाठी आर्थिक साक्षरता अभियाना अंतर्गत बँकिंग कामकाजाच्या सहलीचे आयोजन करून प्रत्यक्ष बँकिंग कामकाज कसे चालते ,बँक मध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात , शाखा व्यवस्थापक ,कॅशिअर,क्लार्क ,यांचे काम कसं चालतं , भरणा स्लीप , विड्रॉ स्लीप, खाते उघडण्याचा फॉर्म, ATM, चेक बुक, तिजोरी, लॉकर हे सर्व प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली ,या वेळी मुलांनी त्यांच्या मनातील कुतुहालाचे अनेक प्रश्न विचारले व  विविध बाबींची माहिती घेतली.  व्यंकटेश मल्टीस्टेटच्या सर्व शाखेच्या माध्यमातून शाखेच्या परिसरातील इयत्ता ४ थी ते १०वीच्या विद्यार्थी असणाऱ्या शाळेमध्ये राबवणार आहे. जवळपास 130 शाळांमधील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी या बचत बँकेशी जोडले गेले आहेत.व्यंकटेश फाऊंडेशनच्या प्रवासाबाबत कृष्णा मसुरे यांनी सांगितले की, व्यंकटेश उद्योग समूहाने व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही जपण्याचे ठरवून व्यंकटेश फाऊंडेशनची मुहूर्तमेढ 2015 रोवली. केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे. 





Source link

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..


What Is Maharashtra Sadan Scam And It’s Chhagan Bhujbal Connection : अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याविरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दाखल केलेली याचिका सक्तवसुली संचलनालयाने मागे घेतली आहे. ईडीने यासंदर्भात हायकोर्टाकडे याचिका मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार विनंती मान्य करण्यात आल्याने छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले. अचानक झालेल्या शपथविधीमध्ये छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांपैकी एक आहेत. आता भुजबळांना दिलासा मिळाल्याने  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण चर्चेत आलं आहे. पण सक्तवसुली संचालनालयाने 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय पाहूयात…

नातेवाईकांना मिळवून दिला नफा

2005 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. छगन भुजबळ यांनी आपल्या कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिल्याचा आरोप केला गेला. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला. 11 जून 2015 साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमपीएल) त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांच्यासहीत एकूण 52 जणांच्या नावाचाही समावेश होता. चमणकर एंटरप्रायजेस या कंपनीला भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. चमणकर यांना हा कंत्राट मिळण्यासाठी भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, या कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतले होते. सक्तवसुली संचलानालयाने केलेल्या आरोपांनुसार छगन भुजबळ आणि त्यांचे कुटूंबीयांनी पूर्व कल्पना असूनही हा आर्थिक गैरव्यवहार केला होता.

अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने भुजबळांकडून घोटाळ्याचा आरोप

2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी ईडीनंही कारवाई केली होती. एसीबीच्यावतीनं मुंबई सत्र न्यायालयात लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आयपीसी कलम 409 आणि बोगस कागदपत्रे तयार करण्याच्या गुन्ह्यासाठी कलम 471 (अ) नुसार आरोप ठेवण्यात आले. हा व्यवहार झाला त्यावेळी छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री होते. याप्रकरणातील अन्य संबंधितांवरही समान आरोप ठेवण्यात आले होते. निविदा न मागवता चमणकर एंटरप्रायजेसला कंत्राट देण्यात आले. तत्कालीन बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना या चमणकर एंटरप्रायजेसकडून मोठा आर्थिक फायदा झाला असा आरोप झाला होता. दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने भुजबळ यांनी मोठा घोटाळा केल्याचा दावा सुद्धा तपास यंत्रणांनी केलेला.

फिजिबिलिटी रिपोर्ट दिशाभूल करणारा

संबंधित बांधकामाच्या वेळेस तयार केलेला सुस्थापन अहवाल म्हणजेच फिजिबिलिटी रिपोर्ट हा दिशाभूल करणारा होता, असा आरोप करण्यात आला. भुजबळ व अन्य आरोपींनी संगनमताने हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करुन खासगी कंपनीला जमीन विकासाचे काम दिल्याचा दावा केला गेला. आर्थिक स्थितीबाबत बोगस कादगपत्रे तयार केल्याने सरकारी मालमत्तेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक लोकसेवक या नात्याने आरोपींनी या सरकारी मालमत्तेच्या हितासाठी एक विश्‍वस्त म्हणून काम करायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, असा आरोप करण्यात आला होता. 

13.5 कोटी रुपयांची लाच

वेगवेगळ्या कंपन्यांकडून छगन भुजबळ यांनी 13.5 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याविरोधात 20 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये एकूण 60 साक्षीदार होते. सक्तवसुली संचलनालयाने याच आरोपपत्राच्या आधार घेत छगन भुजबळ यांना अटक करण्याची कारवाई केली होती.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर कारवाई

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली . छगन भुजबळ यांच्याविरोधात कारवाई सुरु झाली. मार्च 2016 साली भुजबळ यांची 10 तासांपेक्षा जास्तवेळ चौकशी करण्यात आली होती, यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन वर्ष म्हणजेच 2016 ते 2018 तुरुंगात होते. 

आधी जामीन नंतर परदेशात फिरण्याची परवानगी आणि आता दिलासा

छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांना विशेष कोर्टाने परदेशात जाण्याची परवानगीही दिली. या निर्णयाला ईडीने हायकोर्टात आव्हान दिलेलं. या प्रकरणी याचवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी झाली. आता ईडीने या प्रकरणामध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याविरोधातील याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे. हायकोर्टाने ही याचिका मान्य केल्याने भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





Source link

शिंदे गटाच्या माजी आमदाराचे शेजाऱ्यासह भांडण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटाच्या माजी आमदाराचे शेजाऱ्यासह भांडण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल



 शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर अडचणीत आलेत. शेजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर जाला असून व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 



Source link

विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update


Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. पण, देशात सक्रिय असणारा पश्चिमी झंतावात आणि तत्सम वातावरणीय बदलांमुळं अवकाळीचं सावट आता कमी झालं असून, राज्यात हिवाळा त्याची पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होम्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. 

फक्त विदर्भच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढणार असून, किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरीही सकाळ आणि दुपारच्या वेळी असणाऱ्या उकाड्यापासून मात्र शहरातील नागरिकांना अद्याप पाठ सोडवता येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं. 

 

थंडीचा कडाका वाढणार 

सध्या आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीवपाशी समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचावर चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगांची दाटी पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये पहाटेच्या वेळी तापमान मोठ्या फरकानं कमी झालेलं असेल. तर, कोकण भागामध्येही पहाटे आणि रात्री उशिरानं तापमानात घट होणार असली तरीही दिवसा तापमानात फारशी घट नोंदवली जाणार नाही. येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून राज्यातील गिरीस्थानांवर सुरेख हवामान पाहता येणार आहे. 

सध्या हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी झाल्यामुळं दमटपणा कमी झाला आहे. परिणामी हवेतील कोरडेपणा वाढून वाढत्या तापमानातही पहाटेच्या वेळी थंडीची जाणीव होत आहे. देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये कमालीची थंडी आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पण, महाराष्ट्राकडे हे वारे खेचण्यासाठी पुरेसं दाबक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळं हे वारे पुढे येताना कमकुवत होत आहेत. ज्यामुळं राज्यात थंडीला इतका विलंब लागत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीचं हे बदललेलं समीकरण साधारण डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असंच राहू शकतं. 

दरम्यान, तुम्ही जर देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये हिवाळ्याचा अनुभव घेण्यासाठी अर्थात हिवाळी सहलीसाठी जाणार असाल तर तिथं थंडीचा बंदोबस्त करूनच जा. कारण, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीर (Kashmir), उत्तराखंडच्या (Uttarakhand) मैदानी क्षेत्रात थंडीचा कडाका वाढला असून, या राज्यांमध्ये पर्वतील भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. 





Source link

The lost burrower resurfaces

The lost burrower resurfaces


It had not been seen for 85 years, but scientists have tracked it down.

It had been immortalised by Steve McQueen (as Captain Virgil Hilts) in The Great Escape. The American Hilts, noted for his innumerable escape attempts, describes to a group of English (co-) prisoners how to tunnel through the earth—Swim through the soil by grabbing the soil in front of you and pushing it behind you, over your body. Simple.

Like a mole!

The De Winton Golden mole, a shy, shiny, tiny, blind creature had not been seen since it was last spotted in 1936 on the North-western coast of South Africa, and presumed extinct. But a group of conservationists and geneticists from the Endangered Wildlife Trust (EWT) and University of Pretoria, nosed around in a dune habitat on the South African coast, between Port Nolloth and Alexander Bay.

In a press release of November 28, the EWT declared that the De Winton golden mole is “no longer lost”. The creature is 11th of the world’s ‘most wanted lost species’ to be rediscovered, since the ‘Search for Lost Species’ project was launched in 2017. The (re-)discovery of the golden mole was not by dumb luck; Nor painstaking footwork. Deep science came into play as scientists had to examine ‘environmental DNA’ from soil—DNA from skin cells, hairs and bodily excretions that animals shed. Since the expedition in 2021, EWT has identified four additional De Winton’s golden mole populations. “They are working to protect the moles and learn more about the species,” the release says.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp