गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!



Gautami Patil father Passed away : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Ravindra Patil) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.
 



Source link

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?


Who Is Manoj Jarange: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एका घटनेनं ढवळून निघालं आहे. ही घटना म्हणजे जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर केलेला लाठी चार्ज. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी हा लाठी चार्ज झाला तिथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक आंदोलन करत होते. लाठी चार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यासारखे नेते मागील 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे यांना भेटू आले आहेत. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्व आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे आहेत तरी कोण?

मराठा आंदोलनासाठी जमीन विकली

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.

मागील एका दशकाहून अधिक काळापासून संघर्ष

पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली. मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

काही काळ काँग्रेसमध्ये काम केलं

मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगेच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप झाले.

मोर्चे, आंदोलने, चळवळ

मराठा आरक्षणासाठी मनोज यांनी आतापर्यंत 30 ते 40 आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहागडपासून मंत्रालयावर 60 किमीपर्यंत मोठा मोर्चाही त्यांनी नेला होता. या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची राज्यभर चर्चा झालेली.  त्यांनी अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण का गरजेचं आहे याबद्दल माहिती देऊन मराठ्यांना एकत्र केले. अनेकदा त्यांनी आपली निवेदने आणि मागण्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठेही झिजवले आहेत. ते अनेकदा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावरही गेले.  मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या सांगण्यानुसार, या माणसाचं आजपर्यंतच निम्मं आयुष्य हे मोर्चे, आंदोलने, चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यात गेलं.





Source link

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम


Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. तर मागण्यांसाठी एक महिन्यांचा वेळ देण्याची विनंती गिरीश महाजनांकडून करण्यात आली. तेव्हा जालन्यातलं उपोषण सुरुच राहणार असल्याचं समजते.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलीय. मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत औरंगाबाद विभागीय आयुक्त तसंच जालना, नांदेड, लाहूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होतील. 

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे  प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची बैठक

जालनातल्या आंदोलनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आल आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे  प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. महसूल मंत्री राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांच्या दालनात ही बैठक आयोजीत करण्यात आलीय..प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता येण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधलाय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती फडणवीसांनी जरांगेंना दिलीय. पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला पाहिजे होते.. सरकार पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत नसल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलंय.. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय. मराठा आंदोलकांची लवकरच सरकारसोबत बैठकही होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू

जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. तसंच सभा, मिरवणुका आणि मोर्चावरही बंदी असेल. अप्पर जिल्हाधिका-यांनी हे आदेश लागू केलेत. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश काढण्यात आलेत. 4 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. पोलीस अधिक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका आणि मोर्चाला हे आदेश लागू नसतील.





Source link

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट



Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.



Source link

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी


Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला. 

कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी

जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल करत शरद पवारांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला असा आरोपही पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्याने पुढाकार घ्यावा. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता तोडगा काढावा, राष्ट्रवादीचं सहकार्य राहिल अशीही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी जाहीर केलीय ़

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलीय. जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हंटलंय. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय. 

मराठा समाज बांधवांची मुंबईत आंदोलनाची हाक 

जालन्यातील लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दादरमधल्या हुतात्मा कोतवाल उद्यान इथं सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणारंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये विभागवार आंदोलन केली जाणार आहेत. 

जालन्यातील आंदोलनात 64 जण जखमी 

जालन्यातील आंदोलनात आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत. यात 57 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. या 57 पैकी 19 महिला कर्माचारी आहे. 20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. तर या आंदोलनात आतापर्यंत 7 नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला. त्याचं रूपांतर दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये झालं. 





Source link

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, ‘सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी…’

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, ‘सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी…’


Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो,” असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारचं चुकलं हे निश्चित

“या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याच आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित,” असं राज यांनी म्हटलं आहे. 

प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?

पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, “इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं,” असंही राज यांनी म्हटलं आहे. 

मराठी मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत

“मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत,” असं म्हणत राज ठाकरेंनी आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

सरकार पाडण्याची खुमखुमी मिटली 

“काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती,  ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे,” असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की…

“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत,  तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील,” असा विश्वास राज ठाकरेंनी मराठा सामाजातील आंदोलकांना दिला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp