by Hansraj Agrawal | Mar 4, 2023 | Trending News
संदीप देशपांडेंवर हल्ला करणा-या दोघांना भांडूपमधून अटक… हल्लेखोरांत ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष… तर ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
Updated: Mar 4, 2023, 11:45 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Mar 4, 2023 | Trending News
HSC Exam Paper Leak : 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बुलडाणा येथे गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला. या प्रकरणी ‘झी 24 तास’ने वृत्त समोर आणले. यानंतर आता कारवाईला वेग आलाय. गणित पेपरफुटीप्रकणी परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.
Updated: Mar 4, 2023, 11:21 AM IST
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2023 | Trending News
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं 4 ते 6 मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
Updated: Mar 3, 2023, 10:09 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2023 | Trending News
Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे. होळीच्या (Holi 2023) आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाती शक्यता आहे.
मार्च मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मागील काही वर्षात तापमाना होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरते. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
या राज्यात पावसाची शक्यता
दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर असेल?
यंदा संपूर्ण देशात थंडीची लाट होती त्याहून जास्त तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. परिणामी यंदा उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर पोहोचलेले दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य-पूर्व भारतामध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंशांची वाढ अपेक्षित आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 2, 2023 | Trending News
Nagaland Election Result: नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलं यश मिळालं आहे. नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सात जागा जिंकल्या असून प्रमुख विरोधीपक्ष ठरला आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुस-या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.
Updated: Mar 2, 2023, 06:57 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Mar 1, 2023 | Trending News
Venus and Jupiter Meet : खगोल अभ्यासकांसाठी चंद्र (Moon) हे ज्ञानाचे भंडार आहे. याच चंद्राच्या साक्षीनेच आकाशात एक महत्वपूर्ण खगोलीय घटना घडली आहे. अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग घडून आला आहे.
Updated: Mar 1, 2023, 11:00 PM IST
Source link