by Hansraj Agrawal | Oct 5, 2023 | Trending News
Maharashtra Rain : तिथं देशातून (Monsoon) मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असताना इथं महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांमध्ये पाऊस परतीची वाट धरताना दिसणार आहे. पण, तत्पूर्वी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बळीराजासाठी ही चांगली बातमी असून, राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रांमध्येसुद्धा पाणीपातळी समाधानकारक असल्यामुळं यंत्रणांवरील ताणही कमी होताना दिसणार आहे.
‘या’ भागांसाठी 24 तास पावसाचे
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईत तुलनेनं हवामान दमट राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक तीव्र जाणवणार आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मात्र अंशत: ढगाळ वातावरण दिसेल.
देशातील मान्सून परतीच्या वाटेवर
सध्या दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूननं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार आहे.
IMD च्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. तर उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणांवर पावसाची रिमझिम असू शकते. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवलं जाऊ शकतं. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुळं हवामानाचं एकंदर रुपडं पालटणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 4, 2023 | Trending News
अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 3, 2023 | Trending News
Special Report on Land Jihad : जिहादपाठोपाठ आता लँड जिहादनं डोकं वर काढलंय, महाराष्ट्राला लँड जिहादचा विळखा पडलाय आणि त्याची सुरुवात झालीय मालेगावपासून. असं आम्ही म्हणत नाहीयोत तर हे आरोप केले आहेत ते सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. मात्र, अचानक लँड जिहादचा विषय समोर का आला, लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ह? नितेश राणेंनी केलेले आरोप सर्व काही धक्कादाय आहे.
नितेश राणेंचे आरोप काय?
लव्ह जिहाद पाठोपाठ आता लँड जिहादने डोकं वर काढलंय असा गंभीर आरोप भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलाय. या प्रकरणात प्रशासनातले काही अधिकारी आहेत असा त्यांनी दावा केलाय. मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, बांगलादेशींची वस्ती वसवण्याचे प्रकार काही अधिकारी करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. मालेगावात तुकडेबंदी कायदा धुडकावत जमिनीची खरेदी-विक्री सुरु आहे. बांग्लादेशी-रोहिंग्यांची वस्ती बसवण्याचं काम अधिकारी करतात असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केले आहेत.
मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण
मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण करण्यात आलं होतं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हिडीओ दाखवत हा प्रकार उघड केला होता.. मुंबादेवी डोंगरावरच्या मजारीच्या अतिक्रमणाचा मुद्दाही मनसेनं समोर आणला होता. त्यानंतर लँड जिहादचे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, याची चर्चा सुरु झाली होती.
लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ?
इतर धर्मियांच्या जमिनी बळकवण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक मालकीच्या जमिनी बळकवण्याचा प्लॅन आहे. परधर्मियांच्या जमिनीवर धार्मिक विधी, प्रार्थना करत कब्जा करायचा अशा प्रकारे जमिनी बळकावल्या जातात.
माहिम दर्गा येथील अतिक्रमणाचा मुद्दा समोर येताच शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कारवाई केली होती. आता मालेगावप्रकरणाचा मुद्दा खुद्द भाजप आमदार नितेश राणेंनी मांडलाय.. त्यामुळे या लँड जिहाद आरोपांप्रकरणी सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 3, 2023 | Trending News
Nagpur News Today: लहान मुलांना लागलेला मोबाइलचा नाद इतका भयंकर वाढला आहे की मोबाइल न मिळाल्यामुळं एका मुलाने आत्महत्या केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 2, 2023 | Trending News
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. अलीकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊन, येथील अडीअडचणी समजावून घेणारे, मुख्यमंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली. त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयां मध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.’ आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते. काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 2, 2023 | Trending News
मुलीने काही महिन्यांपूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामला अकाऊंट सुरु केलं होतं. मुलीने यानंतर आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती.
Source link