by Hansraj Agrawal | Mar 1, 2023 | Trending News
Maharashtra Budget Session 2023: शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले असले तरी ठाकरे गट एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) वक्तव्य प्रकरणात काँग्रेस (Congress),राष्ट्रवादीने (NCP) ठाकरे गटाची साथ सोडल्याचे चित्र पहायला मिळाले. संजय राऊत यांच्या हक्कभंगाच्या कारवाईवरुन महाविकासआघाडीत (mahavikasaghadi) मतभेद पहायला मिळाले.
सजंय राऊत नेमकं काय म्हणाले?
विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केले. संसदेतील गटनेतेपद काढलं तरी हरकत नाही, शिंदे गट चोरमंडळ, विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार गदारोळ झाल्यावर राऊत यांनी यू टर्न घेतला.
संजय राऊतांच्या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र नाराजी
संजय राऊतांच्या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत याची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिली. तर, अजित पवारांनीही शाहनिशा करून कारवाई करावी असं म्हटलंय. काँग्रेसनेही राऊतांच्या विधानावर असहमती दर्शवली.
संजय राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अलिप्त का?
संजय राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अलिप्त का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, एकीकडे संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी सभागृहात आक्रमक झाले होते. तर, दुसरीकडे मविआचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मात्र शांतच बसले होते. उलट अजित पवार आणि नाना पटोलेंनी राऊतांच्या हक्कभंगाचं समर्थनच केलं. त्यामुळेही ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊतांनी यांनी ठाकरे गट एकाकी पड़ल्याचं फेटाळून लावले आहे.
संजय राऊत यांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी हक्कभंग सूचना मांडली. सभागृहाची भावना ऐकून अध्यक्षांनी हक्कभंगावर 2 दिवसांत सखोल चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार असल्याचं म्हटलंय. तर, अटकेचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
संजय राऊतांना तातडीनं अटक करा – शिंदे गटाची मागणी
संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन शिंदे गट चांगलाच आक्रमक झालेला पहायला मिळाला. संजय राऊतांना तातडीनं अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी केली. चोर आम्ही की संजय राऊत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राऊतांच्या वक्तव्यावरुन गोंधळ झाल्यानंतर दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 28, 2023 | Trending News
भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी वर्षभरापूर्वी या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता अटकेची कारवाई झाली आहे.
Updated: Feb 28, 2023, 10:15 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 28, 2023 | Trending News
Crime News: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा चोरी झाली असून . औंध परिसरातील स्नेहविहार सोसायटीत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला आहे. दरोडेखोरांनी सोनं चांदीचे भांडे, रोख रक्कम, पासपोर्ट, अमेरिकन डॉलर असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे.
Updated: Feb 28, 2023, 02:01 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 27, 2023 | Trending News
शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांसाठी हा महामार्ग धोकादायक ठरत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Updated: Feb 28, 2023, 12:00 AM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 27, 2023 | Trending News
Gautami Patil Video : सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात चर्चेत असलेल्या डान्सर गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक खासगी व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमी पाटील एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत होती. त्यावेळी चोरून तिचा व्हिडीओ काढण्यात आला. यानंतर तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गौतमीच्या समर्थनात प्रतिक्रिया देत याविषयी रोष व्यक्त केला आहे. दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसांत (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ शूट करुन काहींनी तो फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या सर्व प्रकारानंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा : ‘बाईच बाईची…’, Gautami Patil च्या व्हायरल न्यूड व्हिडीओचे सोशल मीडियावर पडसाद
दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सायबर पोलिसांना (Cyber Police) याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा, अशाही सूचना दिली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 26, 2023 | Trending News
मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.
Updated: Feb 26, 2023, 09:09 PM IST
Source link