Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस


Maharashtra Rain : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात ही परतीच्या पावसाने होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 48 तास मुसळधार पाऊस बरसणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असल्यामुळे याचा परिणाम पुण्यावर देखील होणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता तेथे वर्तवण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जोर धरला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोर धरला आहे. 

मुंबईतला पाऊस 

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुपार आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो, असे हवामान तज्ज्ञांनी सूचित केले आहे. मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असं चित्रही शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि ते आजही दिसेल. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

परतीचा पाऊस 

भारतात नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच मान्सूनच्या पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

रेड अलर्ट 

कोकण किनारपट्टीला मात्र हवमान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय. महाराष्ट्राच्या उत्तर, मध्य, पश्चिम मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर भागाल यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे.





Source link

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला


Mumbai Central – Ahmedabad Passenger Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले. थोडक्यात मोठा अपघात टळला आहे.  प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद पेसेंजर ट्रेनचा थोडक्यात अपघात टळला आहे. नेहमीप्रमाणे ही गाडी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात थांबली होती. गाडी पुन्हा पुढील स्थानकात जाण्यास सुटली असता अचानक गाडीचे इंजिन डब्ब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेले. 

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा आरडा ओरडा

स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाच्या लक्षात येऊन त्याने तत्काळ इंजिन थांबविले. दरम्यान अर्धा ते पाऊण तासांनी इंजिन पुन्हा डब्ब्याना जोडून वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, गाडी वेगात असताना असा प्रकार घडला असता तर भीषण अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकली असती.

पनवेल वसई रेल्वे मार्गावर  मालगाडी घसरली

पनवेल वसई रेल्वे मार्गावर शनिवारी दुपारी मालगाडी घसरली. वसईकडे निघालेल्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. यामुळं पनवेल वसई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 





Source link

Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा

Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा



Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे. 



Source link

गौतमी पाटील मोठ्या अडचणीत; अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गौतमी पाटील मोठ्या अडचणीत; अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


Gautami Patil :  ‘सबसे कातील गौतमी पाटील’ रोजच चर्चेत असते. गणोशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम पार पडले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी असते. अहमदनगर गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं आयोजकांना चांगलंच महागात पडलंय. कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या मंडळासह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल झाला आहे. 

गौतमीसह आणखी कुणावर दाखल झाला गुन्हा?

नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र,  तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटीलसह तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात याच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गौतमीसह कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. 

का झाला गुन्हा दाखल?

पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील हा कार्यक्रम घेण्यात आला.  तोफखाना पोलीसांनी आता कारवाई केली आहे.   रस्त्यात अडथळा निर्माण होईल असे कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डी जे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवी कलम  188, 283, 341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2, 15 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 चे कलम  3, 4, 5, 6, मु.पो.का.क 37 (1) (3)/ 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेच्या प्रांगणात  गौतमी पाटीला कार्यक्रमला परवानगी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

दिंडोरीत शाळेच्या प्रांगणात झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची शिक्षणाधिका-यांनी गंभीर दखल घेतलीय. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिका-यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला होता. शाळेच्या प्रांगणात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं आयोजकांवर टीका झाली होती. झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर शिक्षणविभागाला खडबडून जाग आलीय. 

 





Source link

स्टेशन सोडून विरार लोकल 4 डबे पुढे थांबली, प्रवासी उतरले थेट रेल्वे ट्रॅकवर; नालासोपारा येथील विचित्र घटना

स्टेशन सोडून विरार लोकल 4 डबे पुढे थांबली, प्रवासी उतरले थेट रेल्वे ट्रॅकवर; नालासोपारा येथील विचित्र घटना



नालासोपारा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. एसी लोकल स्टेशन सोडून चार डबे पुढे थांबवली यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहना करावा लागला. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp