by Hansraj Agrawal | Sep 28, 2023 | Trending News
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजताच सुरू झाली आहे. राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. याचदरम्यान एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 27, 2023 | Trending News
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत महिलेला सांगण्यात आलं. लेखी द्या असं या महिलेने सांगितल्यानंतर या महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली आणि हुज्जत घातली.. या महिलेनं घडलेला प्रकार फेसबुकवर व्हिडीओद्वारे शेअर केलाय आता यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आदित्य ठाकरे
चीड आणणारी घटना…
पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार?
आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या…
तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
नाना पटोले
मुंबई मध्ये आता मराठी माणसाला च जागा नाही ?? आज मुलुंड मुंबई येथे एका मराठी भगिनी बाबतीत झालेला प्रकार हा अतिशय संतापजनक आहे. Maharashtrian Not Allowed अशी मुजोरी काही मंडळी येथे मुंबई मध्ये करत आहेत हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत हे बघितले पाहिजे,केंद्रातील भाजपा सरकार मुंबई मराठी माणसापासून परिणामी महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहे. राज्यातील येड्याचे सरकार हे दिल्लीश्वरा समोर झुकलेले आहे. मराठी स्वाभिमान जागृत ठेवून राज्य सरकारने या घटनेची चौकशी करावी आणि अश्या घटना परत घडू नये याची काळजी घ्यावी.
अशोक चव्हाण
ही घटना अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठी माणसालाच Maharashtrians are not allowed म्हणून मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
अशा पद्धतीने हे अजिबात चालणार नाही. कुणाची मक्तेदारी चालू देणार नाही आणि सहनही करणार नाही. माहिती घेतली जाईल या घटनेची. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेवू. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचा कदापि धाडस होणार नाही अशी भूमिका घेवू. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार
मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत? भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण मागील आठवड्यात एका भाजप खासदाराच्या भाषेतून बघितला. हा द्वेष आता मराठी माणसाकडे यायला लागला का ? जात- पात,धर्म,भाषेला पकडून जो द्वेष पसरवण्यात येत आहे तो थांबला पाहिजे. महायुती सरकारने कोणत्याही वोट बँकेची चिंता न करता सबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 27, 2023 | Trending News
Sangli Husband Sucide: दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 26, 2023 | Trending News
तृतीयपंथीयांसाठी एम एम आर डी ए ;म्हाडाच्या घरांमध्ये काही घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार अश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 26, 2023 | Trending News
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस तुळजापूर-सोलापूर महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी विभागनिहाय यंत्रणेकडून शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारीचा आढावा घेतला. तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. या काळात देशभरातून आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची मोठी गर्दी असते. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी चालत तुळजाभवानी मंदिरात येतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. त्यामुळे आता या महामार्गावरुन बुधवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
“नवरात्र महोत्सवाची प्रशासन पातळीवर संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेच्या काळात नारळ, तेल, प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे व बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून तिन्ही पुजारी मंडळांकडून पुजार्यांची यादी मागविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत हंगामी व्यापार्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस या मार्गावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
कर्नाटक व इतर राज्यातील बसगाड्यांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी येणार्या पोलीस व इतर कर्मचार्यांसाठी धर्मशाळा व शहरातील काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था असणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे, इतर राज्यातील भाविकांना समजण्यासाठी त्या-त्या भाषेत स्पीकर वरून माहिती सांगण्यात येईल, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 25, 2023 | Trending News
पुढील
बातमी
निर्दयी बापाने चार मुलींपैकी एकीला संपवलं, कारण हादरवणारं… डोंबिवलीतली धक्कादायक घटना
Source link