Sanjay Raut : संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले? ठाण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Sanjay Raut : संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले? ठाण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवा वाद निर्णाम झाला आहे. थेट शिंदेवर त्यांनी आरोप केले आहेत. या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रँच कडून संजय राऊतांची पोलीस चौकशी करण्यात आली. 


Updated: Feb 22, 2023, 11:33 PM IST





Source link

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस नोंदवणार जबाब

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस नोंदवणार जबाब


Sanjay Raut : ठाकरे गटाचे  (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला होता.  राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित हा गौप्यस्फोट केला होता.  


Updated: Feb 22, 2023, 10:31 AM IST

Increased security of Sanjay Raut





Source link

Crime News: माँ… या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी

Crime News: माँ… या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी


योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : CID… छोट्या पदड्यावरील सर्वात मोठी लोकप्रिय सिरीयल. या मालिकेतील पात्र, अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने गुन्हेगारी घटनांची उकल करतात.  CID पेक्षा भारी स्टोरी नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडली आहे.  माँ… या एका अक्षारावरुन पोलिसांनी खुन प्रकरणातील आरोपी शोधून काढला आहे. मोबाईलच्या वादातून ही हत्या झाली आहे. 

मोबाईलच्या घेण्याच्या वादातून नाशिक जिल्ह्यात तरुणाचे शीर कापून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 11 फेब्रुवारीला गोदावरी नदीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता.

या मृतदेहाला शीर नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र, मृतदेहाच्या हातावर हितेश आणि माँ असे गोंदवले होते. या आधारे पोलिसांनी तपास केला असता शरद वसंत शिंदे आणि आलिम शेख या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी केली असता मोबाईल घेण्यावरून वाद झाला होता. या रागातून खून करण्यात आल्याचे संशयीत आरोपी यांनी सांगितले. 

नेमकं काय घडलं?

खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत असून या ठिकाणी त्यांनी मागील महिन्यात पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हा पासून हितेश हा शरद आणि अलीम सोबत काम करत होता. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून किरकोळ करणाहून वाद झाला. 

यात हितेश याने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली होती. यातून संतापलेल्या अलीम याने हितेश याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. यात हितेश याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे, घटनास्थळी आले आणि त्यांनी हा प्रकार पाहता आपल्या हातून बटाईतसाठी घेतलेली जमीन जाईल, गावात बदनामी होईल या चिंतेने त्यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेश याचे शीर वेगळे करत धड गोदावरी नदीत टाकून दिल्याचे संशयितांनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. मृत व्यक्तीचे शीर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

 





Source link

Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?

Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?


Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)  संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Political News)

याआधी ठाकरे गटाने शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली होती. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde ) मात्र, आता शिवसेना पक्ष शिंदेंच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांनी दावा केला आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारणी कशी पाहिजे ? त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्या सारखी शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारणी असावी यासाठी ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे.

Thackeray Vs Shinde LIVE Updates : ठाकरे विरुद्ध शिंदे सेना वाद, सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

अधिवेशनात व्हिप लागू करुन शिंदे गट ठाकरे गटाची कोंडी करण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गटाच्या एका आमदाराला हा व्हिप लागू होणार नाही, त्या आमदार आहेत अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या ऋतुजा लटके. शिंदे आणि ठाकरे गटात फूट पडल्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होते. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. तेव्हा ऋतुजा लटके यांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात काल आव्हान दिलं. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.  अर्ज मेन्शन न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने ठाकरे गटाला सुनावले. त्यानुसार आज सकाळी साडे दहा वाजता ठाकरे गट आपली केस दाखल करणार आहे. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.





Source link

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि… जोडप्यासोबत घडली भयानक घटना

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि… जोडप्यासोबत घडली भयानक घटना


योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : संशयाचे भुत भावकिच्या डोक्यात शिरलं आणि भयानक प्रकार घडला. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर (Nashik crime) तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील एका मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले. भुताळा व भुताळीन समजुन त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Superstition Eradication Committee) याबाबत पाठपुरावा करत आहे.

पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरात मधील मोहपाडा येथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते ह्या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र- तंत्र,जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोप अंधश्रद्धेतून भाऊबंदकीतील काही जणांनी केला. त्यातून चिडून भावकिच्या लोकांनी भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना जबर मारहाण केली. त्यामुळे भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली आणि भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर दुखापत झाल्याचे समजते.

कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊतमाळे यांनी जखमी अवस्थेत या वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस स्टेशनला आणले. अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली. 

हरसुल पोलिसांमध्ये तेलवडे ह्या वृद्ध दांपत्याला जबरमारहाण केल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्याच भाऊबंदीतील काही जणांच्या विरोधात दाखल झाला. मात्र इतर कलमांसह जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे आवश्यक होते. ते मात्र हरसुल पोलिसांनी लावले नसल्याचे आढळले.सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दांपत्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून, ग्रामीण पोलीस अधीक्षकां समोर आणले.

जबर मारहाण झालेले वृद्ध दांपत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील सात आठ वर्षांपासून गावातील काही लोक व भावकीतील काही लोक हे आई-वडिलांना भूताळा- भुताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून मा. जिल्हाधिकारी नाशिक ,पोलीस अधीक्षक, नाशिक( ग्रामीण) व हरसुल पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून रवि तेलवडे यांनी तक्रार दिलेली आहे. तसेच लेखीस्वरूपात तक्रारी केल्या आहेत. जर ह्या लोकांवर वेळीच कायदेशीर कारवाई झाली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दांपत्य व त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी व्यक्त केली.

कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून ,दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असे विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांना देण्यात आलेले आहे. या विनंती पत्रावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

” एखाद्याला भूताळा -भूताळीण,डाकीण ठरवून , अंधश्रद्धा युक्त अवैज्ञानिक ,अशास्त्रीय गोष्टींबाबत जबाबदार धरले जाते. त्यातून जबर मारहाण करणे किंवा प्रसंगी जीव घेण्यासारखे प्रसंग उद्भवतात. भुताळी डाकिन ठरवलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब यांना

अशावेळी जगणे मुश्किल होते. ते गाव सोडून दुसरीकडे निघून जातात . जर हे कुटुंब गावात राहिले तरी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्याचे इतर लोक टाळतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने अशा घटना घडतात. त्यासाठी अशा अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करण्याबरोबरच जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. टी.आर.गोराणे यांनी व्यक्त केले. 

 





Source link

Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…

Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…


Pramod Mahajan on Shivsena: पण ही गोष्ट आहे ती तब्बल 20 वर्षांपुर्वीची. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजनांना (Rajdeep Sardesai and Pramod Mahajan) एक प्रश्न विचारला होता. 


Updated: Feb 18, 2023, 01:12 PM IST





Source link

YouTube
Instagram
WhatsApp