उष्मा धारण करणार रौद्र रुप; 'इथं' काळ्या ढगांपुढं सूर्यकिरणं घेणार माघार… पुढील 24 तासांत हवामानाचे तालरंग बदलणार

उष्मा धारण करणार रौद्र रुप; 'इथं' काळ्या ढगांपुढं सूर्यकिरणं घेणार माघार… पुढील 24 तासांत हवामानाचे तालरंग बदलणार


Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशातून माघार घेतली असली तरीही महाराष्ट्राच्या काही भागांमधून मात्र पावसानं अद्यापही काढता पाय घेतला नाही. भर दिवसा, अगदी सूर्यकिरणांना दूर लोटूनही हे पावसाचे ढग येऊन क्षणात सारंकाही ओलंचिंब करून जात आहेत. ज्यामुळं आता ही रिपरिप अनेकांनाच नकोशी झाली आहे. त्यातच आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्यानं पावसानं आतातरी थांबावं असंच गाऱ्हाणं जो- तो घालताना दिसत आहे. मात्र पाऊस कोणापुढंही नमतं घेण्यात तयार नसल्याचं एकंदर परिस्थिती आणि हवामान अंदाज पाहता लक्षात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या (Mumbai Weather) मुंबई शाखेनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पुढील 24 तासांसह पुढील चार दिवसांसाठीही राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता असून, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याच्या लातूर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली विरुन जात असतानाच राज्यात आता काही अंशी पावसाचा जोर ओसलण्यास सुरुवात झाल्यानं हे दिलासादायक वृत्त ठरत आहे. दरम्यान यामुळं तापमानात होणारे चढ – उतार मात्र टाळता येणार नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बदलणारी वाऱ्याची दिशा आणि एकंदर चित्र पाहता त्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचीसुद्धा हजेरी असेल. 

तापमानवाढ बेजार करणार; पण कुठं?

मान्सूननं एक्झिट घेऊनही हा पाऊस गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात कोसळला, आता त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही त्याची पूर्णत: माघार मात्र अद्यापही प्रतिक्षेत आहे. या विचित्र स्थितीमुळं पुढील काही दिवस तापमानात सातत्यानं चढ – उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये उकाडा वाढेल, दुपारच्या वेळी उष्मा अधिक भासेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे, प्रत्यक्षात तापमान सरासरीइतकं असलं तरीही वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली आहे असं कारण हवामान निरीक्षकांनी दिलं आहे.

FAQ

महाराष्ट्रात मान्सूनची माघार घेतली आहे का?
होय, मान्सूनने देशातून माघार घेतली आहे, परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस कोसळत होता आणि आता त्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.

पावसामुळे लोकांना काय त्रास होत आहे?
सततच्या रिपरिप पावसामुळे लोकांना नकोशी वाटत आहे. आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्याने लोक पावसाने आता थांबावे असे गाऱ्हाणे घालत आहेत. 

हवामान विभागाचा पावसाबाबतचा अंदाज काय आहे?
उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असू शकतो. पुढील 24 तास आणि चार दिवसांसाठी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे पावसाची शक्यता आहे.





Source link

GK : 16,000 एअरपोर्ट असलेला जगातील एकमेव देश; इथून जगाच्या कानाकोपऱ्यात जायला मिळते विमान

GK : 16,000 एअरपोर्ट असलेला जगातील एकमेव देश; इथून जगाच्या कानाकोपऱ्यात जायला मिळते विमान


Most Airports in World: विमान प्रवास हा जलद आणि सर्वात सुलभ प्रवासाचे माध्यम आहे. जवळपास सर्वच देशात विमानतळं आहेत. जगात एक असा एक देश आहे जिथे तुम्ही जवळजवळ प्रत्येक गावातून किंवा लहान शहरातून सहजपणे विमान विमान मिळते. या देशात 16,000 हून अधिक विमानतळ असलेला हा जगातील एकमेव देश आहे. 

Add Zee News as a Preferred Source

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे हवाई प्रवास केवळ मेट्रो शहरांपुरता मर्यादित नाही. या देशात 16,116 विमानतळ आहेत. येथून कुठेही विमानाने प्रवास करण्याची परवानगी मिळते. अमेरिकेचा भौगोलिक आकार आणि विविध लोकसंख्या पाहता, इतके विशाल नेटवर्क आवश्यक मानले जाते. CIA.gov च्या अहवालानुसार, ही विमानतळे व्यावसायिक, वैयक्तिक आणि लष्करी उद्देशांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे, अंदाजे 5,297 विमानतळांसह. ब्राझीलचा आकारही खूप मोठा आहे आणि अनेक भागात रस्त्याने पोहोचणे कठीण आहे. परिणामी, लहान हवाई पट्ट्या आणि स्थानिक विमानतळ लोकांना जोडण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे  यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2,257 विमानतळ आहेत. कमी लोकसंख्या असूनही, ऑस्ट्रेलियाचा भूभाग प्रचंड आहे. त्याच्या लहान शहरे आणि बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा आहे.  ऑस्ट्रेलियाचे स्थानिक विमानतळ केवळ देशांतर्गतच नव्हे तर पर्यटन क्षेत्रालाही मदत करते.

मेक्सिको 1,580 विमानतळांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तथापि, यापैकी फक्त काही विमानतळांवर नियमित व्यावसायिक उड्डाणे चालतात. तरीही, इतक्या मोठ्या संख्येने विमानतळांची उपस्थिती हे दर्शवते की देश त्याच्या विविध प्रदेशांना जोडण्यासाठी हवाई कनेक्टिव्हिटीला किती महत्त्व देतो. कॅनडामध्ये 1,459 विमानतळ आहेत, जे त्याच्या विस्तीर्ण आणि विरळ लोकसंख्येच्या प्रदेशासाठी महत्त्वाचे आहेत. दुर्गम आणि बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी, हवाई प्रवास हा वाहतुकीचा सर्वात विश्वासार्ह आणि जलद मार्ग आहे. हे नेटवर्क केवळ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील सुलभ करते.

1,218 विमानतळांसह फ्रान्स सहाव्या क्रमांकावर आहे. 1,057  विमानतळांसह युनायटेड किंग्डम सातव्या क्रमांकावर आहे. पॅरिसचे चार्ल्स डी गॉल विमानतळ आणि लंडनचे हीथ्रो यासारख्या प्रमुख केंद्रांमुळे ही दोन्ही विमानतळे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये समाविष्ट आहेत. या देशांमध्ये पर्यटन आणि व्यापार वाढवण्यात लहान प्रादेशिक विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

भारतात सध्या अंदाजे 487 विमानतळ आणि हवाई पट्टे आहेत. त्यापैकी अंदाजे 147 विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे चालवले जातात. ही संख्या पाश्चात्य देशांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. तथापि, गेल्या 11 वर्षांत ही संख्या सातत्याने वाढत आहे. 2014 मध्ये देशात फक्त 74 सक्रिय विमानतळ होते, परंतु आता ही संख्या 150 पेक्षा जास्त झाली आहे, जे भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या हवाई प्रवेश आणि प्रादेशिक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

FAQ

1 जगातील सर्वाधिक विमानतळ असलेला देश कोणता आहे?
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा जगातील सर्वाधिक विमानतळ असलेला देश आहे. येथे १६,११६ विमानतळ आहेत. 
अमेरिकेचा भौगोलिक आकार आणि विविध लोकसंख्या पाहता, इतके विशाल नेटवर्क आवश्यक आहे. अहवालानुसार, ही विमानतळे व्यावसायिक, वैयक्तिक आणि लष्करी उद्देशांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

2 दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता आणि किती विमानतळ आहेत?
ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे अंदाजे ५,२९७ विमानतळ आहेत. ब्राझीलचा आकार मोठा असल्याने आणि अनेक भागात रस्त्याने पोहोचणे कठीण असल्याने, लहान हवाई पट्ट्या आणि स्थानिक विमानतळ लोकांना जोडण्याचे महत्त्वाचे साधन आहेत.

3 तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता?ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे २,२५७ विमानतळ आहेत. 
कमी लोकसंख्या असूनही, ऑस्ट्रेलियाचा भूभाग प्रचंड आहे. लहान शहरे आणि बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा आहे. हे विमानतळ देशांतर्गत आणि पर्यटन क्षेत्रालाही मदत करतात.

 





Source link

Nanoparticle-coated fibres, the new step in water purification

Nanoparticle-coated fibres, the new step in water purification


Tests showed that they removed toxic metals from water
| Photo Credit:
iStockphoto

Microfibre-based filters are a good choice for household water purification because they remove germs and pollutants, last long, and hold large amounts of contaminants. Their versatility increases when coated with nanoparticles — enabling them to absorb heavy metals, dyes, or even serve as wound dressings, depending on the coating used. 

The conventional way of coating involves dipping fibres into a nanoparticle solution. This is slow, equipment-heavy, and leads to uneven coating, leaving parts of the fibre bare and lowering efficiency. 

Insights from study

Researchers at IIT Bombay, led by Prof. Venkat Gundabala and Prof. Rajdip Bandyopadhyaya, have now developed a microfluidic method to make uniformly nanoparticle-coated fibres in a single step. In this process, a polymer solution flows through a fine glass capillary while a nanoparticle dispersion surrounds it. As the solvent diffuses out, the polymer solidifies into fibres, while nanoparticles evenly coat their surface.

The team demonstrated this using magnesium oxide (MgO) nanoparticles, which bond strongly with the polymer, producing high-performance fibres. Tests showed that they effectively removed toxic metals like lead, cadmium, and arsenic from water.

These fibres can be packed into filter cartridges for household, portable, or modular units. Beyond water purification, nanoparticle-coated fibres can act as sensors, antibacterial dressings, food packaging, or even drug-delivery systems. Depending on the coating, they can also remove microplastics and organic pollutants from water. 

Published on October 6, 2025



Source link

'इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो', फडणवीसांच्या समर्थनार्थ जरांगेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी

'इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो', फडणवीसांच्या समर्थनार्थ जरांगेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी


Manoj Jarange Vs Devendra Fadnavis: मनोज जरांगे यांच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरबाजीने उत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर लावत जरांगे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. 

Add Zee News as a Preferred Source

मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत धडकणार आहेत. दरम्यान त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी मनोज जरांगेंविरोधात मोर्चा उघडलाय. भाजपनं जरांगेंविरोधात बॅनरबाजी केली आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आईसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्याच वक्तव्यावरून आता भाजपनं जरांगे पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत.

‘काही लोक फडणवीसांच्या कुटुंबाबत गलिच्छ बोलतात’

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील नाव न घेता मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच त्यांच्या कुटुंबासंदर्भात गलिच्छ वक्तव्य केली जातायत. त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचं बावनकुळे
यांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांबाबत बोलताना मनोज जरांगे यांची जीभ घसरली

मुंबईकडे कूच करण्याआधी बीडमध्ये जरांगे पाटलांनी इशारा सभा घेतली होती. दरम्यान यासभेत त्यांनी फडणवीसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी आताच्या आंदोलनात देखील फडणवीसांनाच टार्गेट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप नेते देखील जरांगे पाटलांविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे मुंबईत धडकण्याआधीच भाजपनं जरांगे पाटलांना बॅनरबाजीच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

FAQ

1. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपने बॅनरबाजीने कसे उत्तर दिले आहे?

भाजपने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत, ज्यामध्ये “इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही” असा मजकूर आहे. हे बॅनर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून लावण्यात आले आहेत.

2. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांबद्दल कोणते वादग्रस्त वक्तव्य केले?

बीड येथील एका सभेत मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, ज्यामुळे भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे यांनी नंतर हे वक्तव्य मागे घेतले आणि कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागितली, परंतु त्यांनी फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणात अडथळे आणल्याचा आरोप कायम ठेवला.

3. भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याला कसा प्रतिसाद दिला? 

 चंद्रशेखर बावनकुळे (महसूलमंत्री): त्यांनी जरांगे यांचे नाव न घेता फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर गलिच्छ वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे म्हटले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की फडणवीस यांनाच का नेहमी टार्गेट केले जाते?
 





Source link

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस; पाहा राज्यातील हवामान अंदाज

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस; पाहा राज्यातील हवामान अंदाज


Maharashtra Weather News : (Monsoon) मान्सून वाऱ्यांचा वेग तुलनेनं कमी झाला असला तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये सूर्यकिरणांना झाकोळणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळत असून, राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशी 30 ते 40 किमी वेगाचत्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेच्या सोबतीनं 27 ते 31 ऑगस्टदरम्यान मराठवाज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी असेल. याशिवाय वाऱ्याच्या याच वेगासह पावसाच्या तुरळक सरींची हजेरी उत्तर मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर पावसाच्या ढगांची दाटी होणार असून, त्यामुळं पाऊस बरसणार आहेच. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानतासुद्धा कमी होणार असल्यानं प्रवासादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून, उत्तर कोकणातील जिल्ह्यांनासुद्धा हा पाऊस झोडपताना दिसणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पारघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस डोक्यावर येईल तसा पावसाचा जोर तुलनेनं कमी होताना दिसणार आहे. 

राज्यात वाढलेल्या पावसामुळं कमाल आणि किमान तापमानाच बदल होताना दिसत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये पावसानं विश्रांती घेताच आर्द्रतेचं प्रमाण वाढत असून, त्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा भेडसावत आहेत. सध्या मोसमी पाऊस हा अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत असून येत्या काळात हे पर्जन्यमान कसं आणि किती प्रमाणात कमी होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, गणेशोत्सवादरम्यान मिळणारी पावसाची साथ हीच वस्तूस्थिती आहे हे खरं. 

FAQ

राज्यात सध्या मान्सूनची स्थिती काय आहे?
मान्सून वाऱ्यांचा वेग कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे?
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

पावसाचा कालावधी आणि तीव्रता कशी असेल?
27 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ताशी 30-40 किमी वेगाच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पडतील.





Source link

मनोज जरांगेंच्या मोर्चासंदर्भात महत्त्वाची बातमी, आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून…

मनोज जरांगेंच्या मोर्चासंदर्भात महत्त्वाची बातमी, आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून…


Maratha Reservation : मराठा बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षणासाठी आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

अशातच मनोज जरांगे पाटील हे सकाळी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने आंदोलकांसह रवाना झाले आहेत. अशातच आता जरांगे यांच्या आंदोलनाबाबत हाय कोर्टात वाद सुरु होता. 

मुंबई पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी

अशातच आता  मनोज जरागेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी, रविवारी आंदोलनाला परवानगी नसणार आहे. 

मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली असून यामध्ये 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. तसेच या आंदोलनाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

‘एका दिवसात आरक्षण द्या’

मात्र, पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत मात्र एक दिवसांचं परवानगी मान्य नसल्याचं मनोज जरांगे यावेली म्हणाले. तसेच एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आंदोलनाला एका दिवसासाठी परवानगी

– सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या नाहीत
–  आंदोलकासोबत 5 वाहनांना परवानगी
–  5 हजार आंदोलकांना परवानगी
– 7 हजार चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा
– मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही
– ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्याला मनाई
– आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ

FAQ

1. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कोणते आंदोलन जाहीर केले आहे?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गात 10% आरक्षण मिळावे यासाठी 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण आणि आंदोलन जाहीर केले आहे.

2. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे का?

होय, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसासाठी (29 ऑगस्ट 2025) सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी (30 आणि 31 ऑगस्ट) आंदोलनाला परवानगी नाही.

3. मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत? 

आंदोलनात फक्त 5,000 आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे.

आंदोलन शांततापूर्ण असावे आणि कोणत्याही प्रकारे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊ नये.

गणेशोत्सवाच्या काळात (27 ऑगस्टपासून सुरू) मुंबईतील वाहतूक आणि उत्सवात व्यत्यय येऊ नये याची काळजी घ्यावी.

आंदोलकांनी मुंबई पोलिसांनी नियुक्त केलेल्या मार्गाचे पालन करावे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp