by Hansraj Agrawal | Sep 8, 2023 | Trending News
Sudhir Mungantiwar On Waghnakh : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला जाणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी वाघनखांसाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 8, 2023 | Trending News
निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Malegaon Police) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पावरलूमच्या तराशण यंत्रात ओढणी अडकून सादिया इसाक अहमद या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नाशिकच्या मालेगावातील बडा कब्रस्थान भागात समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात ही महिला तराशण मशीनवर काम करीत असताना रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यंत्रमागासाठी धागा भरण्याच्या तराशण यंत्रामध्ये ओढणी अडकून झालेल्या दुर्घटनेत सादिया इसाक अहमद या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत सादिया इसाक अहमद यांचा स्वतःच्या यंत्रमाग कारखाना आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेण्याच्या सुमारास त्या तराशण मशीनवर काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
वर्षभरात घडतात 8 ते 10 घटना
यंत्रमाग हा मालेगावचा प्रमुख व्यवसाय असून, अनेक गोरगरीब महिला तराशण भरण्याच्या कामासाठी जातात. ताराशण पट्ट्यात ओढणी व किंवा साडी अडकून महिला गंभीर जखमी होतात. अनेकदा बळी देखील जातो. वर्षभरात अशा 8 ते 10 दुर्घटना होऊन कुटुंब उघड्यावर येत आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी काम करणाऱ्यांकडून कारखानदारांनी ऑटो कट व सेन्सर असलेल्या मशीन खरेदी करण्याची मागणी होत आहे.
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीच्या चिमुकल्याचा मृत्यू
पावसाने शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा नामदास या सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात घडली. मेंढपाळ असलेले नामदास कुटुंबीयाचा तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात वास्तव्य होते. मेंढ्या आवरत असताना केदा बराच वेळ दिसून न आल्याने त्याची शोधाशोध केली असता शेतामध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आढळून आला. तात्काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला होता. एकुलत्या एक चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 7, 2023 | Trending News
Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे…काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की सुरूच ठेवायचं याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.
त्यानंतर वंशावळीत कुणबीचा उल्लेख असेल त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं. या जीआरची प्रत माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी मनोज जरांगे यांना सोपवली. जीआरची प्रत देऊन जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.
उपोषणावर ठाम
पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार चर्चा करण्यासाठी जरांगे शिष्टमंडळ पाठवणार आहेत. मात्र सुधारणेबाबत जरांगे ठाम आहेत. त्यामुळे सरकार सुधारणा करणार का याकडे लक्ष आहे
दुसरीकडे सरकारने काढलेल्या जीआरमधून मनोज जरांगे यांनी दोन शब्द बदलण्याची मागणी केलीय. वंशावळीत कुणबी नोंद असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतलाय. वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. अध्यादेशातले ‘वंशावळ असल्यास’ हे शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. सुधारणा केलेला अध्यादेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं अशी मागणी त्यांनी केली.
तर इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी आज पुन्हा एकदा दिली. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करण्याचं काम सुरू आहे… त्यामुळं मराठा आरक्षण द्यावं, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करू, असंही त्यांनी सांगितलं…
जरांगेच्या तब्येतीची माहिती
मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ लागला आहे असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. त्यांच्या रक्तातली नायट्रोजन लेव्हल वाढलीय असं डॉक्टर म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 7, 2023 | Trending News
Mumbai Darshan Bus: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशभरातून मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईची सफर घडवणारी बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबर महिन्यापासून बंद होत आहे. म्हणजेच, ओपन डेक बसमधून होणारे मुंबई दर्शन 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळं पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
मुंबई दर्शनासाठी सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचे आयुर्मान संपल्यामुळं या जुन्या बस आता हद्दपार होणार होणार आहेत. त्यामुळं 5 ऑक्टोबर 2023पासून पूर्णपणे मुंबई दर्शन सेवा बंद होणार आहे. याआधी पहिली ओपन डेक बस 16 सप्टेंबर रोजी सेवेतून बाहेर करण्यात आली होती. त्यानंतर उरलेल्या दोन बस 25 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी हद्दपार करण्यात येणार आहेत.
मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने 26 जानेवारी 1997 रोजी नॉन एसी ओपन डेक बस सुरू केली होती. या बसमध्ये अप्पर डेक व लोअर डेक असे दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र, आता या तीनही बस सेवेतून हद्दपार होणार आहेत.
दरम्यान, बेस्टकडून भाडेतत्वावर 50 एसी डबल डेकर पर्यटन बस सेवेत आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. मात्र, या बसेससाठी अधिक किंमत मोजावी लागणार असल्याने त्याची निविदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळं आता बेस्टच्या माध्यमातून पर्याटकांना घडणारे मुंबई दर्शनही बंद होणार आहे.
सध्या सेवेत असणाऱ्या ओपन डेक बसचा आनंद साधारण 20 हजार प्रवासी दर महिन्याला घेत होते. या बसच्या अप्पर डेकसाठी प्रतिप्रवासी 150 रुपये आणि लोअर डेकसाठी 75 रुपये शुल्क आहे. क्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एन.सी.पी.ए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापिठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिझव्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे ओपन डेक बसमधून पर्यटकांना दाखवण्यात येतात.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 6, 2023 | Trending News
मुंबईशहर आणि उपनगरासाठी 7 सप्टेंबरला सरकारी कार्यालयांना दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेय.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 5, 2023 | Trending News
Manoj jarange patil, Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले जालन्यातले मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.
तुम्हाला यावेळी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू, असं मंत्री संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले. त्यावर जरांगे यांनी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरू द्या, असे उच्चार काढले. मी असाच मेलेला बरा. नाहीच मिळालं आरक्षण तर मी उपोषण करताना मेलेला बरा. कारण आज मी समाजाला शब्द दिलाय, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यावेळी नाही झालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल, असं मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय. जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
आणखी वाचा – मराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या
दरम्यान, जालनानंतर आता अहमदनगर कोपर्डी गावात सकल मराठा समाजानं उपोषण सुरू केलंय. कोपर्डीतील भैरवनाथ मंदिरात उपोषणाला सुरुवात झालीय. .मराठा समाजाला आरक्षण मिळावं. कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी. कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केलीय.
Source link