by Hansraj Agrawal | Sep 3, 2023 | Trending News
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 2, 2023 | Trending News
Jalana Maratha Reservation Protest: जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला.
कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी
जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल करत शरद पवारांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला असा आरोपही पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्याने पुढाकार घ्यावा. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता तोडगा काढावा, राष्ट्रवादीचं सहकार्य राहिल अशीही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी जाहीर केलीय ़
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलीय. जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हंटलंय. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय.
मराठा समाज बांधवांची मुंबईत आंदोलनाची हाक
जालन्यातील लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दादरमधल्या हुतात्मा कोतवाल उद्यान इथं सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणारंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये विभागवार आंदोलन केली जाणार आहेत.
जालन्यातील आंदोलनात 64 जण जखमी
जालन्यातील आंदोलनात आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत. यात 57 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. या 57 पैकी 19 महिला कर्माचारी आहे. 20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. तर या आंदोलनात आतापर्यंत 7 नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला. त्याचं रूपांतर दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये झालं.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 2, 2023 | Trending News
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो,” असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारचं चुकलं हे निश्चित
“या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याच आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित,” असं राज यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?
पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, “इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं,” असंही राज यांनी म्हटलं आहे.
मराठी मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत
“मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत,” असं म्हणत राज ठाकरेंनी आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सरकार पाडण्याची खुमखुमी मिटली
“काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे,” असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की…
“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील,” असा विश्वास राज ठाकरेंनी मराठा सामाजातील आंदोलकांना दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 1, 2023 | Trending News
Sambhajiraje On jalana voilence : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना जालनामध्ये (Jalana News) घडली आहे. आंदोलक आणि पोलिसात झालेल्या बाचाबाचीनंतर तणाव वाढला आणि पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. तर संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाला संभाजीराजे?
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला आणि शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री म्हणतात ‘शांतता राखा’
जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आणखी वाचा – जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवार म्हणतात ‘गृहमंत्र्यांची सूचना असावी’
जालन्यात एवढा राडा झाला तेव्हा गृहमंत्रालय झोपलं होतं का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. गरज पडल्यास शरद पवार जालन्याला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 1, 2023 | Trending News
Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अधिवेशनासंदर्भात चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलं
3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपलेले असतानाच ऐन गणेशोत्सवाच्या काळात बोलवण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून नवीन संसदभवनामधून कामकाज सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे. तर अन्य एका चर्चेनुसार जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन केलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिवाळी अधिवेशन नव्या संसदभवनामध्ये होणार हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या विशेष अधिवेशनाच्या कालावधीवर आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.
आव्हाड यांनी साधला निशाणा
आव्हाड यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ‘एक्स’वरुन (ट्विटवरुन) केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि त्याच वेळेला नेमकं लोकसभेचे अधिवेशन लागले आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आव्हाड यांनी, “आता सण-उत्सवसुद्धा साजरे करायचे नाहीत अशी भूमिकाच दिसतेय हिंदुत्ववादी पक्षांची. आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका म्हणजे नशीब,” असा टोला आव्हाड यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता लगावला आहे.
विरोधकांना धक्का देण्याच्या तयारीत सरकार?
‘अमृतकाळात होणाऱ्या या विशेष अधिवेशनामध्ये फलदायी चर्चेची अपेक्षा आहे,’ असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र सरकारकडून या अधिवेशनासंदर्भातील सविस्तर तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. गुरुवारी मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीचा पहिला दिवस असतानाच सायंकाळच्या सुमारास या विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्याने या अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत सरकार आहे की काय अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ संपवण्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 31, 2023 | Trending News
पराग ढोबळे, झी मीडिया
Nagpur News: नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने अंदाजे आठ ते दहा वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीला घरात डांबून तिच्याकडून घरातील कामे करुन घेत असतं. तसंच, तिला चटके देत शारीरिक त्रास देण्यात आल्याचा संतापजनक आणि चिड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. (Nagpur Crime News)
शेजारच्यांनी या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपासून दाम्पत्य चिमुकलीकडून घरकाम करून घेत होते. तसंच, तिला विनाकारण बेदम मारहाणही करण्यात आली होती. चिमुकलीच्या संपूर्ण शरीरावर चटके दिल्याच्या जखमा दिसत होत्या. मुलीला इतका अमानुषपणे त्रास दिलेल्या दाम्पत्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
शेजाऱ्यांनी उघडकीस आली घटना
काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याच्या कचाट्यातून सुटून खिडकीबाहेर आली होती. त्यावेळी तिथे असलेल्या शेजाऱ्यांना तिने तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. शेजाऱ्यांनी मुलीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लगेचच चाइल्ड लाइन संस्थेच्या माध्यमात तक्रार केली. त्यानंतर या सगळ्या घटनेचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन वर्षांपासून हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल अथर्व नगरी तीन मध्ये एक दाम्पत्य भाड्याने राहत होते. त्यांच्या घरात अंदाजे आठ ते दहा वर्ष वयाची ही चिमुकली साधारण दोन वर्षांपासून राहत होती. ती मुलगी कोण आहे व कुठून आणली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मुलीच या दाम्पत्याशी काय नात आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही.
बाथरुममध्ये ठेवले होतो कोंडून
मागील चार-पाच दिवसांपासून कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांनी चिमुकलीला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं. तिथून ती कशीबशी सुटून घराच्या खिडकीमधून बाहेर पडली. त्यानंतर तिने ही सगळी हकीगत शेजारच्या कुटुंबीयांना सांगितली. तिच्या शरीरावर प्रत्येक भागावर गरम तव्याच्या, सिगारेटच्या चटके दिल्याच्या खुणा पाहून शेजारच्यांचे मन हेलावून गेलं. पोलिसांनी या मुलीवर अत्याचार करणाऱ्या दांपत्याला शोधून कठोर कारवाईची मागणी केली.
Source link