by Hansraj Agrawal | Aug 5, 2023 | Trending News
Maharashtra rain updates : चार ते पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही अद्यापही पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. काही भागांमध्ये तर, पाऊस फक्त तोंडओळख करून देण्यासाठीच आला होता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. असा हा पाऊस पुढील चार दिवसांमध्ये विदर्भासह कोकण भागामध्ये मुसळधार बरसणार आहे. रागयग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकिकडे जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोकणातील बहुतांश भागांमध्येही पावसानं उघडीप दिली. पण, आता मात्र या भागावर पुन्हा एकदा काळ्या ढगांची चादर आल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोकणाला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती?
कोकणाल मुसळधारीचा अंदाज असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागालाही पाऊस ओलाचिंब करणार आहे. तर, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरावरही पावसाची कृपा राहणार असून, इथं दाट धुक्यांची चादर पाहायला मिळणार आहे. (Kolhapur, Satara) कोल्हापूर, साताऱ्यातही परिस्थिती काहीशी अशीच असेल.
(Mumbai, Navi Mumbai, Thane) नवी मुंबई, मुंबई, पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर भागात आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, अधुनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. तिथं बांगलादेशच्या किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. वाऱ्यांचा हा प्रवास पश्चिम- वायव्य दिशेनं पुढे येत असल्यामुळं पुढच्या आठवड्याची सुरुवातही राज्यात पावसानं होण्याची चिन्हं आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळांवर गर्दी
पावसाचे एकंदर तालरंग पाहता महाराष्ट्रावर त्याची कृपाच असल्याचं चिन्हं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता वर्षा पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुंबई- पुण्यापासून नजीक असणारे अनेक धबधबे, धरणं आणि तत्सं जलप्रवाहांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. माळशेज घाट, आंबोली घाट, वरंध घाटही याला अपवाद ठरत नाहीयेत. पण, पावसाळी दिवसांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता पाहता सध्या प्रशासनही दरड प्रवण क्षेत्रांबाबत सतर्क असून, नागरिकांनाही अशा भागांवर न जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. बऱेच घाटरस्ते, धबधबे आणि पावसाळी सहलींच्या ठिकाणी हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 4, 2023 | Trending News
CM Eknath Shinde: कोव्हीड काळात 300 रूपयांची बॅग 2 ते 3 हजारांना खरेदी करण्यात आली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पालिका आणि ठाकरे गटावर केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.
कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटलला काम दिली. डॉक्टर नव्हते तरी कामे घेतली गेली. मढ्याच्या टाळूच लोणी खायचे काम करण्यात आल्याची टिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मी सूड भावनानं काम करणार नाही पण वस्तुस्थिती धरून मात्र कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला गद्दार म्हणारे पत्र देतात आणि 50 कोटींची मदत मागतात. असे असले तरीही मी तात्काळ पैसे द्यायचे मान्य केले, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देणेघेणे नाही, त्यांना शिवसैनिंकाचे काही पडले नाही. त्यांना फक्त पैसा हवाय, अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
विरोधकांमध्ये गोंधळलेली परिस्थितीत दिसते. त्यांच्यात आत्मविश्वास कमी दिसतो. जयंतराव आपल्या सोबत हवे असे मी आधीच म्हटले होते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले असा आरोप करण्यात आला. त्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढली. अडीच वर्षात महाविकास आघाडी प्रकल्प थांबवले. हे सर्व प्रकल्प इगोमुळे प्रकल्प थांबविले. सगळीकडे आता प्रकल्प सुरू केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही फेसबूक आणि घरी बसून काम करणारे सरकार नाही. 24 तास काम करणारे आमचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दररोज सीएम बदलणार सरकार बदलणार असे बोलत होते. पृथ्वीराज आणि माझे जिल्ह्यातील चांगले संबंध आहेत तरीही सीएम बदलणार असे ते म्हणत राहीले. त्यानंतर आमचे सरकार अधिक मजबूत होत गेले असे मुख्यमंत्री म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 3, 2023 | Trending News
मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 3, 2023 | Trending News
विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील बांदोडकर (Bandodkar College) आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील (Joshi-Bedekar College) NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजलीय. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजलीय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोकं आणि पायावर उभं करण्यात आलं आहे. सीनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. विद्यार्थी थोडासा हलला तरी हा सीनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे.
या सीनिअर विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे की ज्युनिअर विद्यार्थी त्यांना घाबरुन तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कॉलेजमध्ये शिकायचं आहे, आमचं करियअर उद्धव्स्त होईल या भीतीने विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालकही समोर येऊन तक्रार करत नाहीत. बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्यांनीही शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रारर करावी असं आवाहन केलं आहे. पण यानंतरही विद्यार्थी स्वत:हून पुढे येण्यास धजावत नाहीएत. यावरुन या सीनिअर विद्यार्थ्यांची किती दहशत आहे हे पाहिला मिळतंय.
अशा शिक्षेमुळे विद्यार्थ्यानमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेक विद्यार्थी एनसीसी नकोच असं म्हणतात दिसतायत. एनसीसीचे युनिट हेड सीनियर विद्यार्थीच असतात. या सीनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सीनिअर विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलंय.
तसंच या प्रकारामुळे याने एनसीसीमार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये असेही सुचित्रा नाईक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 2, 2023 | Trending News
Nitin Desai Death : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याची चर्चा आता सुरू झाली.
नितीन चंद्रकांत देसाई या नावातच कलेचं भव्य दिव्य स्वप्न आणि रिकाम्या जागेला दिमाखदार करण्याची जादू होती. कलाकार म्हणून घडवलेली सर्वोच्च वास्तू एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी जगण्याचा शेवट केला. पहाटे चारच्या सुमाराला स्टुडिओमध्ये गळफास लावून नितीन देसाईंनी आत्महत्या केली.
भारतातला अव्वल कलादिग्दर्शक
भारतातला अव्वल कलादिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती. 1942 लव्ह स्टोरी सिनेमापासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली…लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक से बढकर एक चित्रपटांमधल्या भव्य दिव्य सेटचे बॉलिवूडमध्ये नवे बेंचमार्क सेट केले. काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं. प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कलादिग्दर्शनही चंद्रकांत देसाईच करायचे. त्याचबरोबर लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे.
नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत धक्कादायक माहिती समोर
नितीन देसाईंनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यावर आता चर्चा सुरू झालीय. यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन देसाई दिल्लीहून रात्री अडीचला एनडी स्टुडिओत पोहोचले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी काही व्हॉईस क्लिप रेकॉर्ड केल्याची चर्चा आहे. या व्हॉईस क्लिपमध्ये काही उद्योगपतींची नावं असल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यांनी उभारलेल्या एन डी स्टुडिओवरचं अडीचशे कोटींचं कर्ज न फेडल्यानं जप्तीची कारवाई होणार होती, अशीही चर्चा आहे. बॉलिवूडमधला एक गट एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हता, असा आरोप देसाईंच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
नितीन देसाई म्हणायचे अख्खं आकाश हा माझ्यासाठी कॅनव्हास आहे. आभाळाएवढ्या मोठ्या कॅनव्हासमधून जगण्यातली उत्तरंही नक्कीच सापडली असती. मात्र, स्वतःच उभारलेल्या भव्य दिव्य सेटमध्ये या अवलिया कलाकारानं घेतलेली धक्कादायक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली.
नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी होणार
नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 2, 2023 | Trending News
Action On Shidori: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो विषय आणता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते.
संभाजी भिडे प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. यामध्ये अमरावती पोलिसांकडून भिडेंना नोटीस पाठवली असल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत येथे गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच सावरकरांच्या अपमानाप्रकरणी कॉंग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ वर कारवाई होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
माध्यमात प्रसारीत झालेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचे व्हीडीओ व्हाईट सॅम्पल घेतले घेतले जातील, असे फडणवीस म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात तक्रार केली होती.
संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी पाठवलेली नोटीस संभाजी भिडे यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. भाषणाचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले. माध्यमांमध्ये फिरत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरील आहेत.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार दाखल केली आहे. ती अमरावती पोलिसांकडे वर्ग केली आहे. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.
संभाजी भिडे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या किल्ल्यांसोबत ते बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगले आहे. त्यांना महापुरुषांवर वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही. महापुरुषांवर कोणी वक्तव्य केले तर कारवाई होईल,” असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
सभागृहात कोणी असे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाई होईल. वीर सावरकरांवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Source link