'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम'? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम'? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

महाराष्ट्र हादरला! पत्नीची हत्या करुन पतीने दाखल केली पोलीस तक्रार; JCB मुळे उलगडलं गूढ

महाराष्ट्र हादरला! पत्नीची हत्या करुन पतीने दाखल केली पोलीस तक्रार; JCB मुळे उलगडलं गूढ


Crime News JCB Connection Revealed Suspense: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नवरा बायकोत होणाऱ्या नेहमीच्या वादामुळे नवऱ्याने चार दिवसांपूर्वी बायकोची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्याचं उघड झालं. पत्नीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात बायको हरवली असल्याची तक्रार देखील या व्यक्तीने दाखल केली होती. हिंगणघाट पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र हादरवून टाकणारा खुलासा झाला. पतीनेच पत्नीची हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे.

नेमका कुठे घडला हा प्रकार?

हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात 20 दिवसापूर्वी रहायला आलेल्या सुभाष लक्ष्मन वैद्य याने 19 ऑगस्ट रोजी बायको हरविली असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून शोध सुरू केला. सर्वत्र तपास करीत असताना पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना वैद्य योग्य उत्तरे देत नसल्याने पोलिसांना संशय आला. तर मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांनी नवऱ्यावर संशय घेतला असल्याने पोलिसांनी तपास केला.

त्या खड्ड्याबद्दल पोलिसांनी संशय

काही दिवसांपूर्वी सुभाषने घराजवळ जेसीबीच्या साहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नेमका इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला? आणि खड्डा बुजला कसा? याची चौकशी सुरू केली. ज्या जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करण्यात आला. त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आले. जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचे सांगितले. पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे सांगितले.

आरोपी फरार

पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉडच्या माध्यमातून खड्ड्याच्या आजूबाजूला शोध घेण्यात आला. खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये प्रेत आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले असून आरोपी सुभाष मात्र पसार झाला आहे.

FAQ

हिंगणघाट येथील हत्या प्रकरणात काय घडले?
उत्तर: हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात सुभाष लक्ष्मन वैद्य याने आपल्या पत्नी माधुरीची धारदार शस्त्राने हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरला. यानंतर त्याने पत्नी हरवल्याची खोटी तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस तपासात हत्या आणि मृतदेह पुरल्याचा खुलासा झाला.

ही घटना नेमकी कुठे घडली?
उत्तर: ही घटना हिंगणघाट शहरातील इंदिरा वार्ड परिसरात घडली, जिथे सुभाष लक्ष्मन वैद्य आणि त्याची पत्नी माधुरी 20 दिवसांपूर्वी राहायला आले होते.

सुभाषने पत्नीच्या हत्येनंतर काय केले?
उत्तर: सुभाषने पत्नी माधुरीची हत्या करून तिचा मृतदेह घराजवळ खोदलेल्या खड्ड्यात पुरला. त्यानंतर त्याने 19 ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली.

पोलिसांना सुभाषवर संशय कसा आला?
उत्तर: पोलिसांनी तक्रारीनंतर तपास सुरू केला, पण सुभाषने विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत. तसेच, माधुरीच्या नातेवाईकांनी सुभाषवर संशय व्यक्त केला, ज्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.





Source link

अरे काय बिबट्या होणार तू? कुत्र्याने चक्क फरफटत नेलं! गावकरी तोंडात बोटं घालून पाहत राहिले; VIDEO तुफान व्हायरल

अरे काय बिबट्या होणार तू? कुत्र्याने चक्क फरफटत नेलं! गावकरी तोंडात बोटं घालून पाहत राहिले; VIDEO तुफान व्हायरल


Viral Video: जर एखादा बिबट्या आणि कुत्रा एकमेकांच्या समोर आले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? नक्कीच तुमचं उत्तर बिबट्या असेल. पण जर तुम्हाला एखाद्याने कुत्रा जिंकेल असं सांगितलं तर नक्कीच त्याला वेड्यात काढाल. पण नाशिकमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला चक्क फरफटत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका भटक्या कुत्र्यामध्ये आणि बिबट्यामध्ये सामना झाला. यावेळी कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला 300 मीटर ओढत नेलं. नाशिकमधील निफाडमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

प्रत्यक्षदर्शींच्या दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडली जेव्हा बिबट्या परिसरात घुसला होत. कुत्र्याने आक्रमक प्रतिहल्ला केला, बिबट्याला पकडलं आणि बराच अंतरापर्यंत ओढत नेलं.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कुत्र्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याला तोंड न देता बिबट्याने अखेर स्वतःची सुटका करून घेतली आणि पळून गेला. विशेष म्हणजे संघर्ष करणारा कुत्रा यातून वाचला आहे. परिसरातील कोणत्याही नागरिकाला दुखापत झालेली नाही. 

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी झाल्यानंतर बिबट्या जवळच्या शेतात पळून गेला होता. वन अधिकाऱ्यांनी अद्याप बिबट्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. परंतु घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि पाळीव प्राणी सुरक्षित नसल्याचं नमूद केलं आहे. 

नाशिकमधील ही घटना तेव्हा घडली आहे, जेव्हा देशात भटक्या कुत्र्यांसंदर्भात चर्चा रंगली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमध्ये लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडण्यास मनाई करणाऱ्या आपल्या पूर्वीच्या निर्देशात सुधारणा केली आणि या निर्बंधाला “खूप कठोर” म्हटलं आहे. 





Source link

मोठी बातमी! सरकारी नोकरदारांच्या पगारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; 5 दिवस आधीच…

मोठी बातमी! सरकारी नोकरदारांच्या पगारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; 5 दिवस आधीच…


सर्वत्र गणेशोत्सावाची लगबग सुरु असतानाच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी 27 ऑगस्टला देशात गणेशाचे आगमन होणार आहे. महिन्याचा शेवट असल्याने अनेक लोकांना गणरायाच्या स्वागत करताना आर्थिक अडचण येऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेत राज्य सरकाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवसाआधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

राज्य सरकारकडून शासनकडून सरकारी कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबरला पगार देण्यात येतो. आता या निर्णयानुसार त्यांना येत्या मंगळवारी  26 ऑगस्ट पगार देण्यात येणार आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयामुळे, गणेशोत्सव काळात कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मानला जातोय. आता गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची मोठ्या थाट्यामाट्यात होणार आहे. 

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी 

आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव  काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले. 

कोकणवासायींना टोलमाफी!

२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर  या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.





Source link

I Love You ऐकताच अजित पवार वळले अन् केलं असं काही; व्हिडीओ तुफान व्हायरल

I Love You ऐकताच अजित पवार वळले अन् केलं असं काही; व्हिडीओ तुफान व्हायरल


Ajit Pawar Wardha Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी वर्धा दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी व ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, पाणी व्यवस्थापन, जिल्हा वार्षिक योजना, सेवा ग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या वर्धा दौऱ्यात एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 

अजित पवार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले असते. जेवणानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असता एका कार्यकर्त्याने ‘दादा आय लव्ह यू’ म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देत ”आय लव्ह यु टू” असे प्रत्युत्तर दिलं. यानंतर एकच हशा पिकला. सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर हे सर्व घडलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुनेत्रा पवारांबद्दलच्या विधानाची चर्चा

अजित पवारांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्नी सुनेत्रा पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने अजित पवारांना, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या,” असं सांगत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच, “मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?” असं खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं. 

आधी हात जोडले मग कपाळाला लावले अन्…

तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी अगदी पत्रकारांसमोर हात जोडत, “काय खरंच ना…” असं म्हटलं. नंतर कपाळाला हात लावत, “तुमचा अधिकार आहे. मात्र काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार वर्ध्यात आला आहे. आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विचारता येईल ते दिलं सोडून कुठं अजित पवार काय म्हणेल, कुठं ब्रेकिंग न्यूज देता येईल. मग अजित पवार काय म्हणाला दाखवतील. मग तुमचं काय म्हणणं म्हणत समोरच्यांचं दाखवतील. काय चाललंय?” असा सवाल अजित पवारांनी विचारत नाराजी व्यक्त केली.

अजित पवारांनी यावेळी वर्ध्यात आम्ही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश अजित पवारांनी बैठकीत दिले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर असल्याचंही स्पष्ट केलं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp