by Hansraj Agrawal | Feb 16, 2023 | Trending News
Pune Water Supply News in marathi : दिवसाची सुरुवात पाण्याचा बातमीने करुयात…आज आणि उद्या पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेकडून समान पाणी योजगेंतर्गत पाण्याचं ऑडिट करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. त्या कामांसाठी पुण्यात आज 16 फेब्रुवारी आणि उद्या 17 फेब्रुवारीला शहरात काही भागांमध्ये पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जाणून घ्या कुठल्या भागांचा यात समावेश आहे. (Pune Water Supply News off for 48 hours and In which areas will the water supply be shut off in marathi)
‘या’ भागात पाणीपुरवठा बंद
चतुश्रुंगी टाकी परिसर
बोपोडी
अनगळ पार्क
खडकी
सहारा हॉटेल
राजभवन
पंचवटी
औंध
खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी
अभिमानश्री सोसायटी
एसएनडीटी टाकी परिसर
शिवाजीनगर
भोसलेनगर
घोले रोड
सेनापती बापट रोड
हनुमाननगर
जनवाडी
वैदुवाडी
मॉडेल कॉलनी
वडारवाडी
रेव्हेन्यू कॉलनी
पोलीस लाइन
गोखलेनगर
भांडारकर रोड
परिसर पद्मावती टाकी परिसर
बिबवेवाडी
अप्पर व सुपर इंदिरानगर
संभाजीनगर
काशीनाथ पाटीलनगर
लोअर इंदिरानगर
चिंतामणीनगर
स्टेट बॅंकनगर लेक टाउन
गंगाधाम
बिबवेवाडी
कोंढवा रस्ता
विद्यासागर कॉलनी
सॅलिसबरी पार्क
महर्षीनगर
डायस प्लॉट
मार्केट यार्ड
धनकवडी
गुलाबनगर
चैतन्यनगर
तळजाई वसाहत परिसर
नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र
ससाणेनगर
काळे बोराटेनगर
हडपसर गावठाण
ग्लायडिंग सेंटर
फुरसुंगी
सय्यदनगर
सातववाडी
इंद्रप्रस्थ
मगरपट्टा
वानवडी
चंदननगर
खराडी
रामटेकडी
माळवाडी
भोसले गार्डन
15 नंबर आकाशवाणी
लक्ष्मी कॉलनी
महादेवनगर
मगरपट्टा परिसर
त्यामुळे महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 15, 2023 | Trending News
आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News).
Source link
by Hansraj Agrawal | Feb 14, 2023 | Trending News
असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली.
Updated: Feb 14, 2023, 11:02 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 14, 2023 | Trending News
Aadhaar cards found in Panchganga : प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर / पंचगंगा नदीत आढळलेल्या आधारकार्डांबाबत (Aadhaar cards) धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kolhapur) या आधार कार्डचा पेन्शन योजनेसाठी गैरवापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.. सापडलेल्या आधार कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कार्डची संख्या अधिक असल्यानं संशय बळावलाय. तलाठी कार्यालयाकडून सापडलेल्या सर्व आधार कार्डची तपासणी केली जाणार आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इचलकरंजीत पंचगंगा पात्रात पोतंभर आधारकार्ड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आधार कार्ड कुणाची याचा शोध पोलीस घेत आहेत. कोल्हापूरकरांनो तुमची आधारकार्ड सुरक्षित आहेत की नाही हे तपासा कारण पंचगंगा नदीपात्रात पोतंभरुन आधारकार्ड मिळालीयत. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रेशन कार्ड आढळून आली होती, त्यानंतर आता हजारो आधारकार्ड सापडल्यानं चिंता व्यक्त केलीय जात आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना एक पोतं तरंगताना दिसलं. हे पोतं बाहेर काढल्यावर हजारो आधारकार्ड त्यात सापडली.
पंचगंगेत पोतंभर आधारकार्ड
– शासकीय योजनांसाठी आधारकार्ड महत्वाचा दस्तावेज आहे
– पंचगंगा पात्रात सापडलेल्या आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचं वय साधारण 60 ते 65 आहे.
– पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजतंय
– आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजतंय.
– इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत.
– आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितलं. त्यामुळे हजारो बोगस आधार कार्ड छापली गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
सर्व आधार कार्ड बोगस आहेत का?
सापडलेली सर्वच्या सर्व आधार कार्ड ही बोगस आहेत की, कुणी जाणीवपूर्वक पंचगंगा नदी पात्रात टाकलीयत याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र त्यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोगस आधारकार्डांची छपाई सुरु आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 13, 2023 | Trending News
Shiv Sena Symbol Row on valentine day 2023: ‘व्हॅलेंटाईन डे (valentine day 2023) दिवशी शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी होत आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत (Maharashtra Political News) आहे.
शिंदे सरकारचं काय होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. कारण शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजे 14 फ्रेबुवारीला होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत.
तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदेंना घेरायचं, इतर 15 आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे. सुप्रीम कोर्टात उद्या सकाळी 10.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का? संजय राऊतांचा सवाल
केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आपण कायद्यानुसारच सरकार स्थापन केलं असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी हा सवाल केला.
धनुष्यबाण परत आणायचाच, पटोलेंचा निर्धार
आपल्याला धनुष्यबाण परत आणायचाय, धनुष्यबाण कसा आणायचा तो प्लॅन आम्ही करु असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. पिंपरी पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांच्यासाठी आज मविआची सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरेंसमोर नाना पटोलेंनी हे विधान केलंय.
उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं त्याचा बदला घ्यायचा – अजित पवार
मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला आपल्याला पोटनिवडणुकीत घ्यायचाय, असं अजित पवारांनी म्हटलं. आज चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी मविआचा मेळावा झाला. या मेळाव्याला नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 13, 2023 | Trending News
Crime News : रायगड पोलिसांनी आरोपी महिलेला आधी चर्चगेटमध्ये अटक केली आणि त्यानंतर पुन्हा अलिबाग गाठत तिच्या दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे
Updated: Feb 13, 2023, 11:57 AM IST
Source link