Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?

Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?


Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)  संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Political News)

याआधी ठाकरे गटाने शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली होती. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde ) मात्र, आता शिवसेना पक्ष शिंदेंच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांनी दावा केला आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारणी कशी पाहिजे ? त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्या सारखी शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारणी असावी यासाठी ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे.

Thackeray Vs Shinde LIVE Updates : ठाकरे विरुद्ध शिंदे सेना वाद, सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

अधिवेशनात व्हिप लागू करुन शिंदे गट ठाकरे गटाची कोंडी करण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गटाच्या एका आमदाराला हा व्हिप लागू होणार नाही, त्या आमदार आहेत अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या ऋतुजा लटके. शिंदे आणि ठाकरे गटात फूट पडल्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होते. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. तेव्हा ऋतुजा लटके यांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात काल आव्हान दिलं. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.  अर्ज मेन्शन न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने ठाकरे गटाला सुनावले. त्यानुसार आज सकाळी साडे दहा वाजता ठाकरे गट आपली केस दाखल करणार आहे. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.





Source link

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि… जोडप्यासोबत घडली भयानक घटना

Crime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि… जोडप्यासोबत घडली भयानक घटना


योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : संशयाचे भुत भावकिच्या डोक्यात शिरलं आणि भयानक प्रकार घडला. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर (Nashik crime) तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील एका मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले. भुताळा व भुताळीन समजुन त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Superstition Eradication Committee) याबाबत पाठपुरावा करत आहे.

पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरात मधील मोहपाडा येथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते ह्या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र- तंत्र,जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोप अंधश्रद्धेतून भाऊबंदकीतील काही जणांनी केला. त्यातून चिडून भावकिच्या लोकांनी भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना जबर मारहाण केली. त्यामुळे भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली आणि भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर दुखापत झाल्याचे समजते.

कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊतमाळे यांनी जखमी अवस्थेत या वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस स्टेशनला आणले. अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली. 

हरसुल पोलिसांमध्ये तेलवडे ह्या वृद्ध दांपत्याला जबरमारहाण केल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्याच भाऊबंदीतील काही जणांच्या विरोधात दाखल झाला. मात्र इतर कलमांसह जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे आवश्यक होते. ते मात्र हरसुल पोलिसांनी लावले नसल्याचे आढळले.सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दांपत्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून, ग्रामीण पोलीस अधीक्षकां समोर आणले.

जबर मारहाण झालेले वृद्ध दांपत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील सात आठ वर्षांपासून गावातील काही लोक व भावकीतील काही लोक हे आई-वडिलांना भूताळा- भुताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून मा. जिल्हाधिकारी नाशिक ,पोलीस अधीक्षक, नाशिक( ग्रामीण) व हरसुल पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून रवि तेलवडे यांनी तक्रार दिलेली आहे. तसेच लेखीस्वरूपात तक्रारी केल्या आहेत. जर ह्या लोकांवर वेळीच कायदेशीर कारवाई झाली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दांपत्य व त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी व्यक्त केली.

कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून ,दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असे विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांना देण्यात आलेले आहे. या विनंती पत्रावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

” एखाद्याला भूताळा -भूताळीण,डाकीण ठरवून , अंधश्रद्धा युक्त अवैज्ञानिक ,अशास्त्रीय गोष्टींबाबत जबाबदार धरले जाते. त्यातून जबर मारहाण करणे किंवा प्रसंगी जीव घेण्यासारखे प्रसंग उद्भवतात. भुताळी डाकिन ठरवलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब यांना

अशावेळी जगणे मुश्किल होते. ते गाव सोडून दुसरीकडे निघून जातात . जर हे कुटुंब गावात राहिले तरी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्याचे इतर लोक टाळतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने अशा घटना घडतात. त्यासाठी अशा अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करण्याबरोबरच जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. टी.आर.गोराणे यांनी व्यक्त केले. 

 





Source link

Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…

Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…


Pramod Mahajan on Shivsena: पण ही गोष्ट आहे ती तब्बल 20 वर्षांपुर्वीची. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजनांना (Rajdeep Sardesai and Pramod Mahajan) एक प्रश्न विचारला होता. 


Updated: Feb 18, 2023, 01:12 PM IST





Source link

EC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष

EC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष


EC Shiv Sena Result BJP Post: निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.


Updated: Feb 17, 2023, 10:51 PM IST





Source link

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?


Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group)  केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे. नबाम रेबिया प्रकरणात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं निकाल दिला होता. या निकालानुसार विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकत नाही. ( Maharashtra Political News) याबाबत पुनर्विचार करण्यासाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करावं अशी मागणी ठाकरे गटानं केलीय. तीन दिवसांच्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवण्यात आला असून आज याबाबत निर्णय येणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासोबत कृष्ण मुरारी, शाह, हिमा कोहली, नरसिम्हा हे जजेस निकाल देणार आहेत. ( Political News in Marathi ) 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 5 नाही तर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. यावर निकाल येणार आहे. गेले तीन दिवस 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. यावेळी नबाम रेबिया खटल्याचा (Nabam Rebia Verdict) संदर्भावर युक्तीवाद झाला.  

शिंदे गटाचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपले गेले तर संपूर्ण प्रक्रियेसाठीच 8 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये पाच न्यायाधीशांच्या बेंचने अरुणाचल प्रदेशामध्ये नबाम रेबिया प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला होता. या निकालानुसर अविश्वास ठरावाच्या दरम्यान सदनाच्या अध्यक्षांकडे कोणतेही अधिकार नसतात. याचधर्तीवर शिंदे गटाने केलेल्या दाव्यानुसार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आमदारांना अपात्र ठरवण्याचे किंवा त्यांना निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. 

 ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद

उद्धव ठाकरे गटाच्यावतीने वकिलांनी हा निर्णय फेरविचारासाठी मोठ्या खंडपीठाकडे पाठवावा, असा युक्तिवाद केला, तर शिंदे गटाचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र प्रकरणात निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने तसे करण्याची गरज नाही. येथे अपात्रतेचा सामना करणाऱ्या आमदारांना मतदानही करावे लागले नाही. उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तेच सरकार पडण्यास जबाबदार आहेत, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. तर  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडले, असे म्हटले. गुवाहटीत बसून महाराष्ट्र सरकारसंदर्भात निर्णय होऊ शकत नाही. तसेच आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो. असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात करत राजस्थानच्या केसचा दाखला दिला .





Source link

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी


Shiv Jayanti : पुण्यातील (Pune) जुन्नर येथील शिवनेरी (Shvineri Fort) किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्य सरकारतर्फेही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थिक राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. शिवनेरीकडे जाणाऱ्या तिन्ही टोल नाक्यावर (Toll Plaza) शिवजयतींनिमित्त वाहनांना सरकारने टोल न आकरण्याचा निर्णय घेतला आहे.

खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना शिवजयंतीच्या दिवशी टोलमाफी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात शिवभक्ती शिवनेरीवर जमणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शिवभक्तांसाठी हा निर्णय घेतला आहे.

जुन्नर परिसरातील वाहतुकीत बदल 

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.

गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp