by Hansraj Agrawal | Feb 12, 2023 | Trending News
राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. त्यामुळे राज्यभरातच कापूस कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी सोडवण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 12, 2023 | Trending News
Maharashtra Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ते लवकरच आपल्या पदाची शपथ घेतील. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पुन्हा एकदा भाजपने धक्कातंत्र वापरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे रमेश बैस यांची नियुक्ती आता होणार आहे.
रमेश बैस, यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर येथे झाला. रमेश बैस 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून ते 2019 पर्यंत रायपूरचे प्रतिनिधित्व करत राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. ते लोकसभेतील भाजपचे चीफ व्हिपही होते. 2019 मध्ये, भाजपने 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधारावर लोकसभेचे तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना जुलै 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
त्याआधी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या या बड्या नेत्याचे राजकीय पुनवर्सन करण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली होती. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत होती. मात्र, त्यांच्या ऐवजी रमेश बैस यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच याशिवाय डझनभर राज्यांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचाही राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थानचे मजबूत नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 11, 2023 | Trending News
मंत्रीपद मिळाल्यावर दारूची दुकानं उघडली आणि गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणूनन या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोप अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. अजित पवारांकडेच दारुचे कारखाने आहेत असा पलटवार संदीपान भूमरेंनी(Sandipan Bhumare) केला.
Updated: Feb 11, 2023, 06:46 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 10, 2023 | Trending News
Support For Girish Mahajan For CM Post: भारतीय जनता पार्टीमधून (BJP) राष्ट्रवादीमध्ये (NCP) गेलेल्या आणि विधानपरिषदेचे आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात (Maharashtra CM) मोठं विधान केलं आहे. जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंनी थेट त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ही तयारी दर्शवताना त्यांनी एक अट घातली आहे.
दोघांमध्ये वाद
खान्देशामधील राजकारणामध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद हा कायमच चर्चेचा विषय असतो. या दोघांमधील वाद आणि शाब्दिक टोलवा टोलवी ही कायमच प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेचा विषय असते. स्थानिक पातळीपासून ते अगदी राज्य पातळीवरही बोलताना हे दोन्ही नेते एकमेकांच्यू भूमिकांना विरोध करताना किंवा टोलवा टोलवी करताना दिसतात. मात्र आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी थेट गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री केलं तरी आपली हरकत नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे.
…तर महाजनांना पाठिंबा
प्रसारमाध्यमांशी खान्देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना आपण या भागाच्या विकासासाठी अगदी राजकीय विरोधकालाही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असं खडसे म्हणाले. “सुरेश दादा जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे तो कार्यक्षम दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले होते,” असं खडसे जुनी आठवण सांगताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना खडसेंनी, “सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला तर त्याचं स्थान वरचं असलं पाहिजे. या निकषात आता जर गिरीश महाजन बसत असतील तर काय अडचण आहे? मला कुठलीच अडचण नाही,” असं खडसे म्हणाले.
माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल
“या भागामधील प्रकल्प मंजूर करणारा मंत्री असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे. येथील प्रकल्प मंजूर करणारा कोणीही आज तयार असला तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मला विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, मंजूर केलेले प्रोजेक्ट आणून द्या. मला खानदेशमधील सिंचनासाठी मंजूर केलेला आणि इतके वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा पैसा द्या. हे आणून देणारा अगदी माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल मी त्याला पाठिंबा देईल,” असं खडसे म्हणाले.
खान्देश सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे
“हा भाग (खान्देश) सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे हे जे स्वप्न आम्ही पाहतोय. ज्याला मंजुरी मिळाली आहे ते पूर्ण करावं अशी माझी अपेक्षा आहे,” असं सांगतानाच खडसेंनी हे पूर्ण करण्यासंदर्भात पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही नेत्याला अगदी तो कट्टर विरोधक असला तरी आपण पाठिंबा देऊ असं स्पष्ट केलं.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 10, 2023 | Trending News
Nagpur News : गुरुवारी खेळता खेळता ही चिमुकली अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र शुक्रवारी जेव्हा मुलगी सापडली तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
Updated: Feb 10, 2023, 05:36 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 9, 2023 | Trending News
प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका, मंदिर आणि मशिदीच्या वादात आरतीला मनाई केल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट
Updated: Feb 9, 2023, 09:23 PM IST
Source link