ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ ‘ढाल-तलवार’ही कोर्टात?

ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ ‘ढाल-तलवार’ही कोर्टात?


सतीश मोहिते आणि विशाल करोळे, झी मीडिया : उद्धव ठाकरे (Uddhav Thakceray) गटापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) गटाच्या निवडणूक चिन्हावरूनही नवा वाद सुरू झालाय. शिंदे गटाच्या ढाल तलवार निशाणीला शीख समाजानं आक्षेप घेतलाय. काय आहेत त्याची कारणं, पाहूयात हा रिपोर्ट. (objection from sikh community to eknath shinde group shield symbol)
 
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा निवडणूक चिन्हाचा वाद संपता संपत नाहीय. ठाकरे गटाला दिलेल्या मशाल निशाणीविरोधात समता पार्टीन कोर्टात आव्हान दिलंय. तर शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार निशाणीवरूनही नवा वाद सुरू झालाय. नांदेडच्या शीख समाजानं ढाल तलवारीवर आक्षेप घेतलाय.

‘ढाल तलवारी’ला आक्षेप का?

‘त्रिशूळ’ हे धार्मिक चिन्ह असल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाला ते नाकारण्यात आलं. ‘ढाल तलवार’ हे शिखांच्या खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक असल्याचा दावा सचखंड गुरुद्वारा बोर्डानं केलाय.श्री गुरू गोबिंदसिंह यांनी खालसा धर्माची स्थापना केली, तेव्हा ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली. शिखांच्या पाचही तख्तांवर दररोज ढाल तलवारीची पूजा होते. त्यामुळं हे चिन्ह निवडणूक आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ नये, असा आक्षेप शिखांनी घेतलाय. एवढंच नव्हे तर ‘ढाल तलवार’ निशाणी रद्द झाली नाही तर कोर्टात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दरम्यान, शीख समुदायाचं ढाल तलवार नाही, तर खंडा आणि कृपाण हे धार्मिक चिन्ह असल्याचा दावा ठाण्यातील शीख समुदायानं केलाय.याबाबत कुणाचा आक्षेप असेल तर निवडणूक आयोग उत्तर देईल, अशी भूमिका शिंदे गटानं घेतलीय. केंद्रीय निवडणूक आयोग या वादात आता काय भूमिका घेतंय, याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. ठाकरे गटापाठोपाठ आता शिंदे गटालाही निवडणूक चिन्हासाठी कायदेशीर लढाई लढावी लागणार, एवढं मात्र निश्चित.





Source link

video: मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर अटक..CCTV फुटेजच्या आधारे लागला शोध

video: मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर अटक..CCTV फुटेजच्या आधारे लागला शोध


ही संपूर्ण घटना सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात 21 वर्षांची  मुलगी जखमी झालीये..


Updated: Oct 15, 2022, 01:41 PM IST





Source link

भारतीय स्टेट बँक उडवून टाकू, पाकिस्तानातून धमकीचा फोन

भारतीय स्टेट बँक उडवून टाकू, पाकिस्तानातून धमकीचा फोन


पुढील
बातमी

मुख्यमंत्र्यांची लॅव्हिश लाईफस्टाईल, राज्याचं राजकारण आणि सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर!





Source link

Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप

Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप


शाळांपासन नोकरदार वर्गालाही या दिवसांमध्ये सुट्ट्या मिळतात. त्यामुळं यादरम्यान असंख्य बेत आखले जातात. पण, यंदा बेत आखण्यापूर्वी पाहा ही बातमी 


Updated: Oct 14, 2022, 12:48 PM IST

IMD predicts medium to heavy rain fall in state on Diwali 2022





Source link

सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा

सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा


पराग ढोबळे झी, मीडिया, नागपुर : नागपूरात (Nagpur) फसवणुकीचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडिया Influencer म्हणून समाजात वावरत असणाऱ्या व्यक्तीनेच त्याचावर विश्वास ठेवल्याचा गैरफायदा घेत एका नामांकित होमिओपॅथी डॉक्टरला (Homeopathic Doctor) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. अजित पारसे (Ajit Parse) असं त्या सोशल मीडिया तज्ज्ञाचं नाव असून नागपूरच्या कोतवाली पोलिसांनी (Nagpur Kotwali Police Station) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कोण आहे अजित पारसे?
अजित पारसे हे सोशल मीडियावरच (Social Media) एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियातून होणारी फसवणूक कशी टाळता येईल यासाठी अजित पारसेने जनजागृतीचे अनेक कार्यक्रम घेतले. यातून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सार्वजनिक क्षेत्रात वावरत अनेक राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी ओळख असल्याचे फोटो दाखवत त्याने स्वत:चा दबदबा तयार केला. यातूनच 2019 मध्ये नागपुरमधील महाल परिसरात असणाऱ्या नामांकित डॉक्टरशी त्याची ओळख झाली. समाजातील मोठं व्यक्तीमत्व म्हणून डॉक्टरांनी त्याच्यावर विश्वास ठेवला

डॉक्टराला असं ओढलं जाळ्यात
अजित पारसे आणि त्या डॉक्टरची ओळख वाढली. त्या डॉक्टरने आपल्याला होमिओपॅथचं महाविद्यालय सुरु करायचं असल्याचं अजित पारसेजवल बोलून दाखवलं आणि इथेच डॉक्टर त्याच्या जाळ्यात फसला. अजित पारसेने आपले अनेक राजकीय मंडळींशी निकटचे संबंध असल्याचं डॉक्टला सांगितलं. होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्यासाठी एक कंपनी सुरु करण्याचा सल्ला अजित पारसेने त्या डॉक्टरला दिला.

डॉक्टर त्याच्या भूलथापांना बळी पडत गेला. कंपनी सुरु करण्यासाठी सुरुवातीला त्याने 25 लाख रुपये उकळले. त्यानंतर डॉक्टरची अनेक गुपीतं अजित पारसेला कळली. एका आर्थिक प्रकरणात डॉक्टर हमीदार होता. या प्रकरणात सीबीआयकडून अटक वॉरंट निघाल्याचं अजितने त्यांना सांगितलं. पण सीबीआयमध्ये आपली ओळख असून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे लागतील असं सांगत अजित पारसेने डॉक्टरकडून तब्बल दीड कोटी रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारण सांगत गेल्या दोन वर्षात त्याने डॉक्टरची तब्बल साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. 

फसवणूकीचा प्रकार डॉक्टरला कळला
अजित पारसे आपली फसवणूक करुन पैसे उकळत असल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी हिम्मत करत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं. यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत तपास सुरु केला. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण प्रकृती ठिक नसल्याने अजित पारसे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही.

झाडाझडीत मिळाल्या धक्कादायक साहित्य
चौकशीसाठी क्राइम ब्रांचच्या पथकानं अजित पारसे याच्या घरात झाडाझडती घेतली. यावेळी घरातून अनेक साहित्य जप्त केलय. यात कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर यासह स्टॅम्प पेपर, खोटे दस्ताऐवज, शासकीय कार्यालयाचे शिक्के, पोलीस विभागाचे शिक्के, लेटरहेड राजकीय नेते मंडळींशी असलेले फोटो तसंच नेतेमंडळीची लेटरहेड या गोष्टी सापडल्या. फोटोशॉपच्या साह्यानं फेक कागदपत्रे तयार केल्याचं समोर आलंय. तपासा दरम्यान पीएमओ कार्यालयात ओळख असल्याचं दाखवण्यासाठी डॉक्टरांना बनावट ई-मेल करून फसवणूक करत असल्याचंही तपासात समोर आलंय. 

हनी ट्रॅपचा पोलिसांनाही संशय….
अजित पारसे हा मोठ्या लोकांशी ओळख असल्याचं सांगत अनेकांना दिल्लीच्या आलिशान हॉटेलमध्ये नेत. तिथं त्याना हनी ट्रॅपमध्ये अडकवत खंडणी वसूल केल्याची शंका पोलिसांना आहे. कम्प्युटर लॅपटॉप मधून मिळालेल्या डेटा पाहता पोलिसांचा संशय बळावलाय. त्यामुळं त्याही दृष्टीने तपास सुरू केलाय. अशाच पद्धतीनं आणखी बऱ्याच लोकांची फसवणूक झाली असावी असा कयास लावला जात आहेय. 





Source link

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी; 1875 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी; 1875 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य


मुंबई : महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महतेच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. कर्जमाफी (loan waiver) आणि सरकारची उदासीनता यासह विविध कारणांमुळे जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 1800 हून अधिक शेतकऱ्यांनी (Farmer) आपले जीवन संपवले असल्याची माहिती समोर आलीय. या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू अमरावतीत (Amravati) झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) पडल्यानंतर जूनमध्ये आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या (CM Eknath Shinde) काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. (1875 deaths in 8 months farmers end his life in Maharashtra)

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 8 महिन्यांत 1875 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 2021 मध्ये या कालावधीत कर्जबाजारी (Loan) झालेल्या 1605 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असलेल्या कर्जमाफीसह (loan waiver) इतर योजना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे.

काय आहेत कारणे?

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी अनेक संस्था आणि सरकारी संस्था माहिती गोळा करत आहेत. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि तणाव, शासनाची उदासीनता, सिंचनाची योग्य व्यवस्था नसणे, कर्ज, अनुदानातील भ्रष्टाचार, हवामानाची परिस्थिती अशी अनेक प्रमुख कारणे असल्याचे आढळून आले आहे.

अमरावतीमध्ये 2022 मध्ये सर्वाधिक 725 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 2021 मध्ये ही संख्या 662 होती. त्यानंतर औरंगाबादचा आकडा 532 वरून 661 वर पोहोचला. गेल्या वर्षी नाशिकमध्ये 201 मृत्यूच्या तुलनेत यंदा 252 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूरमधील ही संख्या 2021 मध्ये 199 वरून 2022 मध्ये 225 पर्यंत वाढली आहे. मात्र कोकणात गेल्या दोन वर्षांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी 188 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अधिकृत नोंदीवरून दिसून आले. मात्र, शेतकऱ्यांचे नेते किशोर तिवारी यांच्यावर विश्वास ठेवला तर हा आकडा 226 आहे. 2021 मध्ये 2,743 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचे आश्वासन दिले असताना, सरकारी यंत्रणा अद्याप तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या जिल्ह्यांमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आत्महत्या प्रवण जिल्ह्यांमध्ये कोणतीही गंभीर उपाययोजना करण्यात आली नाही, ” असे तिवारी म्हणाले.

दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आत्महत्या केलेल्या 1875 शेतकऱ्यांपैकी 981 शेतकरी शासकीय नियमानुसार आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले होते. तर, 439 अपात्र मानले गेले. त्याचवेळी 455 शेतकऱ्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सध्या विभाग मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये मदत म्हणून देत आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp