कियारा अडवाणी राजकारणात, शिंदे गट की भाजपमधील प्रवेशाबाबत केलं मोठं वक्तव्य

कियारा अडवाणी राजकारणात, शिंदे गट की भाजपमधील प्रवेशाबाबत केलं मोठं वक्तव्य


मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीला लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यामध्ये ‘शेरशाह’ चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी कियाराने आभार व्यक्त करताना मराठीमध्ये संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कियाराचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे लोकमत समूहाचे संचालक विजय दर्डा यांनी राजकारणात येण्याबाबत कियाराला एक प्रश्न केला. (Kiara Advani of Bollywood made a big statement about Shinde group joining BJP latest marathi news)

तुला जर राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायला सांगितलं तर तू कोणत्या पार्टीमध्ये प्रवेश करशील?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या?, असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला. भर मंचावर असा काही प्रश्न विचारला जाईल असा विचारही कियाराने केला नसेल.  

सर्व प्रेक्षकांच्या नजरा कियाराकडे खिळल्या होत्या, ती काय उत्तर देते याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र तितक्यात अभिनेता रणवीर सिंग तिच्यासाठी धावून आलेला दिसला. तो तिला खाली बोलावून घेत होता. माईक चालत नाही, बंद असल्याचं रणवीर म्हणाला. अखेर, मी अभिनेत्री म्हणून ठिक असल्याचं कियारा म्हणाली. यादरम्यान मंचावर एकच हशा पिकला.

दरम्यान, मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी असल्याचं कियारा मराठीमध्ये म्हणाली. कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सोहळ्यामध्ये प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत.  

नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं तो तुमचा आणि मतदारांचा आदर आहे.  2019 ला हा आदर व्हायला पाहिजे होता. आम्ही सेना-भाजप युती म्हणून लढलो होतो आणि आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपचे 100 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मतदारांना वाटलं बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही तेच तीन महिन्यापूर्वी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर नानांनी आणखी एक कोंडीत पकडणारा प्रश्न केला. 

मुलाखतीमध्ये, 2019 वेळी जी चूक केली ती आम्ही तीन महिन्यांपूर्वी सुधारल्याचंं शिंदे म्हणाले. त्यानंतर नानांनी ही चूक सुधारायला अडीच वर्षे का लागलीत, असा सवाल नानांनी केला. यावर, नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं तो तुमचा आणि मतदारांचा आदर आहे.  2019 ला हा आदर व्हायला पाहिजे होता. आम्ही सेना-भाजप युती म्हणून लढलो होतो आणि आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपचे 100 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मतदारांना वाटलं  बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही तेच तीन महिन्यापूर्वी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. 





Source link

Maharashtra Rain : ‘या’ जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी ..

Maharashtra Rain : ‘या’ जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी ..


Maharashtra Rain : राज्यात यावर्षी मुसळधार पाऊस (Heavy rains) पडला आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याआधी म्हणजे मागील आठवड्यात कोकणसह मुंबईला ऑरेज अलर्ट (Orange Alert) हवामान खात्याने (weather department) दिली होता. त्यानंतर आता कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह (Ratnagiri, Raigad and Sindhudurga) पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. 

दरम्यान, हवामान विभागानं (Department of Meteorology) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

वाचा : घराबाहेर पडण्याआधी ही बातमी जरूर वाचा, पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर   

तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळं बोर्डी गावाला नदीचं स्वरुप आलं आहे.  तर बीड (Beed) जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. 

यंदा महाराष्ट्रात एका जिल्ह्यात तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. 18 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस आहे. 17 जिल्हे सरासरीच्या श्रेणीत असून एकाही जिल्ह्यात पावसाची मोठी तूट नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सदर जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.





Source link

छत्रपतींची ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

छत्रपतींची ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया


पुढील
बातमी

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता… थरारक घटना





Source link

CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणाले…

CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणाले…


ShivSena Symbol : शिवसेना आणि धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्ह सादर करण्यास सांगितल्यानंतर आता दोन्ही गटाला नवी ओळख मिळाली आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (BalasahebThackeray)यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाला. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचबरोबर ‘#बाळासाहेबांची_शिवसेना’ हा हॅशटॅग देखील एकनाथ शिंदे यांनी वापरलाय.

ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या 3 चिन्हांची मागणी केली गेली होती. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं असणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा केला जातोय.

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालंय. मात्र शिंदे गटाला कोणतंही निवडणूक चिन्ह अद्याप मिळालं नाही. अशातच आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.





Source link

Raj Thackeray : ‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो…’, ठाकरे-शिंदे वादात राज ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना आदेश!

Raj Thackeray : ‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो…’, ठाकरे-शिंदे वादात राज ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना आदेश!


Raj Thackeray On Shivsena : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena Symbol) अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याचबरोबर आता शिवसेना नाव देखील वापरता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संकटात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता मनसेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर ट्विट केलं आहे.

ठाकरे-शिंदे वादात मनसेने सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणातील व्हिडीओ व्हायरल करण्यात येत होता. वारसा हा कोणता असतो?, वारसा हा वास्तूचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो, असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. अशातच आता राज ठाकरे (Raj Thackeray Tweet यांनी मनसैनिकांसाठी मनाई आदेश दिलाय.

काय म्हणाले Raj Thackeray ?

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूमिका उंचावल्या आहेत.

पाहा ट्विट- 

 

संदीप देशपांडे यांचं ट्विट –

उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर केली होती.

दरम्यान, शिवसेनेतील या बंडाचा सर्वात मोठा फायदा हा मनसेला होण्याची शक्यता आहे. अनेक शिवसैनिकांनी राज ठाकरे यांना यांच्याशी हातमिळवणी केली होती. तर दुसरीकडे भाजपसोबत युतीसाठी मनसेने मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे आता राज ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर काय बोलणार?, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp