Aditya Thackeray यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित; नक्की काय घडलं?
आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार होती.
Source link
आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार होती.
Source link
TET Scam : शिक्षक भरती घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. टीईटी परीक्षेच्या अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. उजमा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत. तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे.
या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय. ‘पण, माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही मग अपात्र यादीच नावच आलं कसं?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सत्तारांनी म्हटलंय.
मात्र आता टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याचा सुद्धा धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून पगार सुरु आहे.
याबाबत शाळेने वेतन बिल सादर केलं असून त्यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख पूर्णतः पात्र असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्यांना पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभाग सांगितले आहे.
अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण
हे प्रकरण समोर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं’ अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. ‘आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी’ असंही सत्तारांनी म्हटलं आहे
नेमकं प्रकरण काय?
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या घोटाळ्यातील 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली.
उजमा आणि हिना यांनी यासाठी कुठल्या व्यक्तीला पैसे दिले हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुंबई : स्वप्नांची नगरी मुंबई कोणाला पाहावीसी वाटणार नाही. अशाच मुंबईच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुंबई प्रेमींसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता गारेगार प्रवासात मुंबईचे दर्शन (mumbai Tourist) घेता येणार आहे.हा प्रवास इतका स्वस्त आहे की किंमत बघून तुम्ही तिकीट खरेदी कराल. नेमकी ही कोणती बस सेवा आहे व मुंबईचे दर्शन करण्याचे तिकीट किती आहे ते जाणून घेऊयात.
मुंबईला दररोज असंख्य पर्यटक (mumbai Tourist) भेट देत असतात. या पर्यटकांना मुंबईच्या विविध ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असते.मात्र असंख्य ठिकाणे दुर दुर असल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे पर्यटकांना बस, टॅ्क्सी, रेल्वे आणि विविध प्रवासी गाड्यांचा लाभ घेऊन पर्यटनस्थळी पोहोचावे लागते. या प्रवासात अर्धा दिवस निघून जातो. त्यामुळे वेळेची बचत आणि प्रवास सुखकर व पर्यटकांना मुंबईचे दर्शन अधिक सुलभ होण्यासाठी आता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने एक हॉप-ऑन-हॉप-ऑफ (hop on-hop off) (हो-हो) (Ho-Ho AC bus) एसी बस सुविधा सुरू केली आहे. या एसी बस सेवेने पर्यटकांचे मुंबई दर्शन गारेगार होणार आहे.
बेस्ट (BEST) आपला ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे.या निमित्त व मुंबई शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी सोमवारपासून हो-हो एसी बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बस भाडे किती?
बेस्टचे (BEST) महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले की,मुंबई दर्शन घडवणाऱ्या या बसच्या तिकीटाची किंमत 150 रूपये आहे. हे तिकीट खरेदी करून तुम्ही दिलेल्या थांब्यांवरून मुंबई दर्शन बस पकडून बसचा प्रवास करू शकता. या बससेवेमुळे पर्यटकांचे मुंबई दर्शन होणार आहे. पर्यटकांसाठी हा प्रवास अधिक आनंददायी आणि सोयीस्कर असणार आहे.
‘या’ मार्गावर धावतेय?
सध्या हो-हो बस (Ho-Ho AC bus) गेटवे ऑफ इंडिया ते जुहू चौपाटी या दरम्यानच्या मार्गावर धावत आहे. या बसेस अनेक पर्यटन स्थळांवर थांबतात. तर आता नवीन हो-हो बस (Ho-Ho AC bus) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणार असून तुम्हाला शहरातील अनेक पर्यटन थांब्यांवर घेऊन जाणार आहे.
डबल डेकर बसेस धावणार
लोकेश चंद्र यांनी पुढे सांगितले की, लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस देखील सुरू होणार आहेत. बेस्टच्या 50 टक्के बसेस 2023 च्या अखेरीस इलेक्ट्रिक असतील तर इतर बस 2026 च्या अखेरीस इलेक्ट्रिक असतील. देशातील बहुतांश बस बेस्टच्या अंतर्गत धावतात, भविष्यातही आमच्याकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस असतील,असा मानस त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान बेस्टच्या या हो-हो बस सेवेने (Ho-Ho AC bus) पर्यटकांचे मुंबई दर्शन आणखीण सुखकर होणार आहे. गारेगार प्रवासात मुंबईकरांना मुंबईच संपुर्ण दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या बेस्ट सेवेचा चांगला फायदा होणार आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Updated: Aug 8, 2022, 12:46 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Updated: Aug 8, 2022, 12:42 PM IST
trending video mumbai goa highway accident caught in cctv watch video in maratha
विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
Updated: Aug 8, 2022, 12:32 PM IST