by Hansraj Agrawal | Dec 12, 2024 | Trending News
Success Story Of Marathi Brand: दरवर्षी साधारण दिवाळी होऊन गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते नव्या कॅलेंडरचे म्हणजेच दिनदर्शिकेचे. त्यातही आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे जणू समीकरणच झालं आहे. मराठी माणूस उद्योग धंदा करु शकत नाही हा भ्रम मोडू काढणाऱ्या काही सर्वात यशस्वी कंपन्यांमध्येही कालनिर्णयचा आवर्जून उल्लेख केला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ हे तीन शब्द कधी ना कधी, कुठे ना कुठे ऐकायला मिळतातच. भारतीय संस्कृतीशी जोडणारा एक प्रमुख धागा म्हणून आजच्या टेक्नोलॉजिकच्या जगात अगदी अॅपच्या माध्यमातून मोबाईलवरील स्क्रीनपर्यंत पोहोचलेल्या कालनिर्णयचा प्रवास थक्क करणारा आहे. चला याचबद्दल जाणून घेऊयात…
कधी आणि कशी झाली सुरुवात?
कालनिर्णयची स्थापना 1976 साली ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांनी केली. अवघ्या 2600 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरु केला. आज आपण आवर्जून कालनिर्णय घेत असलो तरी तो काळ असा होता की त्यावेळेस मोफत मिळणारं पंचांग अशा नव्या फॉरमॅटमध्ये विकण्याची कल्पनाच मोठी धाडसी होती. मात्र साळगावकरांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी केवळ पंचांग आणि कालगणनेसाठीचं माध्यम न ठेवता ते अधिक रंजक करण्यासाठी त्यामध्ये अनेक नवे प्रयोग केले.
युएसपी ठरलं मागचं पान
साळगावकरांनी कालनिर्णयमध्ये प्रत्येक महिन्याच्या मागील पान हे विशेष लेखांसाठी वापरण्याचा अनोखा प्रयोग केला आणि तो सुपर हीट ठरला. आरोग्य, सौंदर्य, स्वादिष्ट, भविष्य, ग्रहाणाविषयीची माहिती, संगोपन, किचन टीप्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश साळगावकरांनी या मागच्या पानावर केला. या मागच्या पानाचीही लोक आतुरतेने वाट पाहू लागले. त्यामुळे अर्थातच कालनिर्णयवरील जबाबदारी वाढली आणि ते सुद्धा अधिक सकस कंटेट देऊ लागले.
एकूण किती प्रती विकल्या जातात? किती भाषांमध्ये होतं प्रकाशित?
आजच्या घडीला कालनिर्णय हे सर्वाधिक खपाचं प्रकाशन आहे. दरवर्षी कालनिर्णयच्या दिड कोटींहून अधिक प्रती विकल्या जातात. कालनिर्णय हे मराठी, इंग्रजी, हिंदीसहीत एकूण 9 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काळाची पावलं ओळखत कालनिर्णयने वेबसाईट, अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन जनरेशनमध्येही आपली ओळख कायम ठेवली आहे. 2600 रुपयांपासून सुरु झालेल्या या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल ही 55 कोटी रुपयांहून अधिकची आहे.
कालनिर्णयनंतर 40 ब्रॅण्ड आले पण…
ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशननुसार कालनिर्णय हे जगातील सर्वात जास्त विकले जाणारे प्रकाशन आहे. कालनिर्णयनंतर भारतामध्ये एक दोन नव्हते तर तब्बल 40 ब्रॅण्डने दिनदर्शिका सुरु केल्या. मात्र यापैकी कोणत्याही दिनदर्शिकेला कालनिर्णय इतकं यश मिळवता आलेलं नाही. यावरुनच साळगावकर कुटुंबाचं या श्रेत्रातील काम आणि मत्तेदारी अधोरेखित होते. कालनिर्णयच्या माध्यमातून एक मराठमोळा ब्रॅण्ड आज जगभरात पोहचल्याचं पाहायला मिळत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 11, 2024 | Trending News
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 30 पाझर तलावात बचत गटातील महिला करणार मत्स्यशेती.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 11, 2024 | Trending News
Shivshahi Bus Accident: गोंदिया येथे झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 जण ठार झाले आहेत. गोंदियातील अपघाताची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल परिवहन आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2024 | Trending News
संपू्र्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. अशातच मारकडवाडीतून शरद पवार यांच्या EVMबाबतच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी आता उत्तर दिल आहे. EVM मध्ये घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवार यांचा विरोध असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तुमच्या EVM ला विरोध असेल तर आधी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी मारकवाडीतील सभेतून शरद पवार यांना केला आहे.
त्यावर आम्ही राजीनामा देयाला तयार आहे. तुम्हाला एका मतदार संघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेयची आहे. माझी झाली तर आम्ही देखील राजीनामा देऊ. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी अडचण नाही. लोकसभेला EVM मिशन व्यवस्थित होत्या पण विधानसभेत त्यामध्ये फेरफार करण्यात आली म्हणून आम्ही राजीनामा देतोय असं म्हणत गोपीचंड पडळकर यांच्या आरोपांना उत्तम जानकर यांनी उत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आलाय. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
तर EVMमध्ये घोटाळा करता येत नाही. म्हणून विरोधक विरोध करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.
मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येवढचं नाही तर त्यांनी गावात बैलगाडीतून एन्ट्री केली. तसेच विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी आसूडही ओढलेत. त्यामुळे पुढील काही दिवस मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अधीक तीव्र होत जाणार यात शंका नाही.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळं सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात घट झाली असून, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं या शीतलहरी अधिक वेगानं वाहत येत असल्यामुळं गारठा अधिक जाणवू लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता जवळपास नाहीसं झालं असून, मुंबईतही थंडीनं पकड मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 9 वर्षांमध्ये मुंबईतील थंडीनं न मोडलेले सर्व विक्रम सोमवार 9 डिसेंबर रोजी मोडीस निघाले. कारण, शहरातील किमान तापमानाचा आकडा 13.7 अंशांवर पोहोचला होता. ‘फेंगल’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये थंडीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत असून, पुढील 48 तासांसाठी हीच स्थिती कायम असणार आहे.
उत्तर महाराष्ट्रामध्येही तापमान 10 अंशांहून कमी झालं असून, या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढतच असून, त्याचा परिणाम उर्वरित देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात निफाड इथं पुन्हा एकदा पारा 6 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं ही थंडी आता मोठ्या मुक्कामाला आल्याचीच जाणीव होत आहे.
देशातील हवामानाचा आढावा…
राजस्थान, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि झारखंडसह पंजाब, मध्य प्रदेश आणि पूर्वोत्तर भारतामध्येही तापमानात घट नोंदरवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पारा 3 ते 4 अंशांपर्यंत खाली आला असून, मंगळवारी तापमानात आणखी घट होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाल्यामुळं अटारी-लेह राष्ट्रीय महामार्गासहित राज्यातील 87 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमानाचा आकडा उणे 1 अंशांहूनही कमी झाल्यामुळं इथं हाडं गोठवणारी थंडी पडल्याचं स्पष्ट होत आहे. देशातील पूर्वोत्तर भागात हलक्या पावसाच्या सरी वगळता उर्वरित देशात थंडीचाच परिणाम कायम असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 9, 2024 | Trending News
Narhari Zirwal Dance: तुम्ही सोशल मीडियावर अपडेट असाल तर तुमच्यापर्यंत नरहरी झिरवाळ यांचा एक डान्स व्हिडीओ पोहोचला असेल. यात ते इंदुरीकर महाराजांसोबत ठेका धरताना दिसत आहेत.
Source link