EPFO Rules: '…तर तुमच्या कंपनी मालकाला होईल तुरुंगवास, EPFO ने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय

EPFO Rules: '…तर तुमच्या कंपनी मालकाला होईल तुरुंगवास, EPFO ने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय


EPFOs Big Action: नोकरदार वर्गाच्या भविष्याची पुंजी असलेल्या पीएफ (PF) रकमेबाबत केंद्र सरकारने आता अधिक कडक भूमिका घेतलीय. अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापून घेतात, मात्र ते वेळेवर EPFO कडे जमा करत नाहीत. अशा प्रकरणांत आता केवळ दंड आकारला जाणार नाही, तर संबंधित मालकाला तुरुंगवासाची हवाही खावी लागू शकते. मार्च 2026 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘ईपीएफओ’ने अशा डिफॉल्टर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कर्मचारी आणि नियोक्त्यांना हा नियम माहिती असायला हवा. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

तर ‘क्रिमिनल’ गुन्हा

जर एखाद्या नियोक्त्याने कर्मचाऱ्याच्या हिश्श्याचा पीएफमधील एम्पॉली कॉन्ट्रीब्युशन पगारातून वळता केला आणि तो 15 दिवसांच्या आत EPFO कडे जमा केला नाही, तर तो ‘विश्वासघात’ मानला जातो. भारतीय दंड संहितेच्या आताच्या नवीन कायद्यानुसार कलम 405 आणि 409 अंतर्गत हा फौजदारी गुन्हा ठरतो. यासाठी मालकावर थेट एफआयआर दाखल केली जाऊ शकते.

वसुलीसाठी मालमत्तेवर जप्तीची टांगती तलवार

केवळ तुरुंगवासच नाही, तर थकबाकी वसूल करण्यासाठी ईपीएफओकडे विशेष अधिकार आहेत. जर कंपनीने दंड भरण्यास टाळाटाळ केली, तर ‘रिकव्हरी ऑफिसर’ कंपनीची बँक खाती गोठवू शकतो, कंपनीची जंगम किंवा स्थावर मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करू शकतो आणि त्यातून कर्मचाऱ्यांचे पैसे वसूल करू शकतो.

दंड किती भरावा लागेल?

पीएफ जमा करण्यास उशीर झाल्यास ‘डॅमेज चार्जेस’ (Damages) भरावे लागतात. विलंबाच्या कालावधीनुसार हे शुल्क 5% ते 25% पर्यंत असू शकते. याशिवाय, कलम 7-क्यू नुसार दरसाल 12% दराने व्याजही भरावे लागते. हा भुर्दंड कंपनीच्या मूळ थकबाकीपेक्षाही कित्येक पटीने जास्त असू शकतो.

ऑडिटचा बडगा

EPFO आता ‘इन्स्पेक्शन’ प्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करत आहे. ज्या कंपन्यांचे योगदान अचानक कमी झाले आहे किंवा जे नियमित पैसे भरत नाहीत, अशा कंपन्यांची निवड ‘एआय’ (AI) द्वारे तपासणीसाठी केली जात आहे. एकदा तपासणीत दोषी आढळल्यास, मागील अनेक वर्षांचा हिशोब तपासून मोठी पेनल्टी लावली जाते.

कर्मचाऱ्यांनी काय करावे?

कर्मचाऱ्यांनी दरमहा त्यांच्या ‘UAN’ पोर्टलवर जाऊन ‘पासबुक’ तपासणे आवश्यक आहे. जर तुमच्या पगारातून पैसे कापले गेल्याचा मेसेज आला असेल, पण पासबुकमध्ये ते दिसत नसतील, तर तुम्ही त्वरित EPFO च्या ‘Grievance Portal’ वर तक्रार नोंदवू शकता. तुमची ओळख गुप्त ठेवूनही ही तक्रार करता येते.

कारावासाची नेमकी तरतूद काय?

नियम सांगतो की, पीएफ चोरी किंवा विलंब प्रकरणात परिस्थितीनुसार ६ महिने ते 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. गंभीर प्रकरणांत, जिथे रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे, तिथे जामीन मिळणेही कठीण होते. हे नियम खासगी कंपन्या, सोसायट्या आणि ट्रस्ट अशा सर्वांना समान लागू आहेत.

कंपनी बंद झाली तरी जबाबदारी संपत नाही

अनेकांना वाटते की कंपनी बंद पडली किंवा दिवाळखोरीत (Insolvency) निघाली तर पीएफ देण्याची गरज नाही. मात्र, कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचा पीएफ हा ‘प्राधान्य देय’ (Priority Debt) असतो. कंपनी विकल्यानंतर मिळणाऱ्या रकमेतून सर्वात आधी पीएफचे पैसे चुकते करावे लागतात, त्यानंतरच इतर देणी दिली जातात.





Source link

पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! 8,212 हाउसिंग प्रकल्पांना महारेराची नोटीस; रजिस्ट्रेशन रद्द होणार?

पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! 8,212 हाउसिंग प्रकल्पांना महारेराची नोटीस; रजिस्ट्रेशन रद्द होणार?


Maharera Notice 8212 Project Maharashtra : पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात घर खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे.  महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाने अर्थात महारेराने जानेवारी-मार्च 2026 चा त्रैमासिक प्रगती अहवाल (QPR) सादर न करणाऱ्या महाराष्ट्रातील 8,212 हाउसिंग प्रकल्पांना नोटीस बजावली आहे. यात सर्वाधिक म्हणजे 4,644 प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आहेत.  प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यासाठी प्रकल्पांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विकासकांना प्रोग्रेस रिपोर्ट अपडेट करण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 60 दिवसात रोपर्ट न दिल्यास कल्पाची नोंदणी रद्द होऊ शकते.  महारेराच्या या सूचनेमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. महारेराच्या नियमानुसार  विकल्या गेलेल्या फ्लॅट्सची संख्या, झालेला खर्च आणि बांधकाम योजनांमधील कोणतेही बदल यांसारखे महत्त्वाचे तपशील सादर करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना घर खरेदी करताना ही सर्व माहिती दिली गेली पाहिजे. 

हे ही वाचा

महारेराने विकासकांना प्रलंबित अहवाल सादर करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली असून, अहवान सादर न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. या सूचनेत प्रकल्पांची बँक खाती गोठवणे, नोंदणी रद्द करणे आणि जाहिरात व विपणनावर बंदी घालणे यांचा समावेश आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर विक्री करारांची नोंदणी करण्यावर बंदी येऊ शकते. 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. विकासकांनी माहिती उघड करण्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे त्यात म्हटले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही त्रैमासिक अहवाल अद्ययावत न केल्यास, महारेरा नोंदणी रद्द करण्यास किंवा निलंबित करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिला आहे. प्रकल्पांमधील त्रुटींची सर्वाधिक संख्या मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि कोकण प्रदेशात असून, येथे 4,644 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ठाण्यात सर्वाधिक 1,475 प्रकल्प आहेत.

एमएमआर आणि कोकण प्रदेशात डिफॉल्टची संख्या सर्वाधिक आहे. ठाण्यानंतर मुंबई उपनगर (1,263), रायगड (842), पालघर (612) आणि मुंबई शहर (267) यांचा क्रमांक लागतो. पुणे शहरात अशा 2,311 प्रकल्पांची नोंद झाली, ज्यात पुणे जिल्ह्यातील 1,957 प्रकल्पांचा समावेश आहे. इतर विभागांमध्ये खानदेश (511 प्रकल्प), विदर्भ (483) आणि मराठवाडा (238) प्रकल्पांचा समावेश आहे.

 





Source link

मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा, आता यापुढे…; फडणवीसांंचे कॅबिनेट बैठकीत निर्देश

मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा, आता यापुढे…; फडणवीसांंचे कॅबिनेट बैठकीत निर्देश



Maharashtra Government Making New Law: राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नव्या कायद्यासंदर्भात थेट निर्देश दिले आहेत.



Source link

कोकणात निसर्गाचा चमत्कार! दोन नव्हे चक्क चार पाय असलेल्या कोंबडीच्या पिलाचा जन्म

कोकणात निसर्गाचा चमत्कार! दोन नव्हे चक्क चार पाय असलेल्या कोंबडीच्या पिलाचा जन्म


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

Sanjay Raut on Pune Rape: मुलीच्या वडिलांचा आक्रोश पाहा, आरोपीला फासावर लटकवा; संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut on Pune Rape: मुलीच्या वडिलांचा आक्रोश पाहा, आरोपीला फासावर लटकवा; संजय राऊतांचा संताप



देशात, महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार, महागाई, नोकऱ्या नाहीत त्यासंदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणूक आलं की, मोदी शाहांचं सरकार तळ ठोकून बसतं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 
 



Source link

मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अशोक खरातचा पाय खोलात, PMLA कोर्टात काय घडलं?

मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अशोक खरातचा पाय खोलात, PMLA कोर्टात काय घडलं?


Ashok Kharat : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. ईडीनं मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात खरातची कोट्यवधींच्या अवैध संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. तसंच या प्रकरणात ईडीनं PMLA कोर्टात खरातचा ताबा घेण्यासाठी अर्ज देखील केलाय. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे.

Add Zee News as a Preferred Source

श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सामान्यांची लूट करणारा अशोक खरात ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. ईडीच्या तपासात खरातच्या एका नव्या कारनाम्याची माहिती समोर आली आहे, रिअल इस्टेट प्रकल्पांचा वापर अशोक खरात काळा पैसा पांढरा करण्यासाठी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. या संपूर्ण व्यवहाराचा मास्टरमाइंड हा ओझरमधील एक बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे, दरम्यान हा व्यावसायिक खरातचा विश्वासू साथिदार असल्याचीही माहिती आहे. हा खरातच्या ‘महालक्ष्मी डेव्हलपर्समध्ये खरातच्या मुलीचा आणि पत्नीचा भागीदार आहे.

नाशिकच्या ओझर येथील मोठ्या टाऊनशिप प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात जमिनीच्या व्यवहारांची धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत. यामध्ये 90 लाख रुपयांचे संशयास्पद हस्तांतरण आणि 60 लाख रुपयांची गोठवलेली रक्कम, ही केवळ हिमनगाचे टोक आहे.तपासात असे दिसून आले आहे की, आरटीओ अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे असलेली जमीन या प्रकल्पासाठी वापरण्यात आली होती. आर टी ओ आणि खरात यांच्यात मोठ्या प्रमाणात बायकांची नावे वापरून जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या हे ही समोर आले आहे.

खरातच्या या सर्व कारनाम्यानंतर  ईडीने खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईच्या विशेष PMLA कोर्टात प्रॉडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला आहे. मात्र कोर्ट खरातचा ताबा ईडीच्या ताब्यात देणार का? कारण खरातवर दाखल गुन्ह्यात एसआयटी चौकशी करतेय, प्रत्येक गुन्ह्यात एसआयटी देखील खरातल कोठडी देण्याची मागणी करतेय, त्यामुळे खरातचा ताबा ईडीला मिळणार का? याकडे आता लक्ष लागलंय.अशोक खरातच्या या आर्थिक जाळ्याने नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. आता ईडीच्या चौकशीत या बाबाचे आणखी किती चेहरे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आरोपीला फाशी देण्याची मागणी 

पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. आरोपी भीमराव कांबळे याचा एन्काऊंटर करण्याची मागणी आता जोर धरू लागलीय. सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, कलाकार सगळ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत कुटुंबाला धीर दिला.आणि आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी केली.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp