'2-3 लोकांना कानाखाली…'महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी!

'2-3 लोकांना कानाखाली…'महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी!


Renuka Shahane: महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वाद हा अलीकडील काळात चर्चेचा विषय ठरलाय. हा वाद प्रामुख्याने भाषिक अस्मिता, स्थानिक संस्कृती आणि राजकीय हितसंबंधांभोवती केंद्रित आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रीभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयापासून सुरू झाला. ज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रस्ताव होता. याला स्थानिक मराठी भाषिकांनी विरोध केला. यातून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आणि वाद निर्माण झाले. दरम्यान आता या वादत अभिनेत्री रेणूका शहाणेनी उडी घेतलीय. काय म्हणाल्या रेणूका शहाणे? सविस्तर जाणून घेऊया. 

हिंदी-मराठी भाषेच्या वादावर मत

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिंदी आणि मराठी भाषेचा वाद आता अधिकच तीव्र होत चाललाय. याच मुद्द्यावरुन जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि 2 ठाकरे बंधुंना एकत्र आणलं असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचेही नाव त्यात समाविष्ट झाले आहे. रेणुका यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झालाय आणि त्यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतही खूप काम केलंय. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची राज्यभरात चर्चा आहे. रेणुका शहाणे यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केलंय. हिंसाचारापेक्षा सुसंवाद असावा असे रेणूका शहाणे म्हणाल्या. अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आणि सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही हिंदी-मराठी भाषेच्या वादावर आपले मत मांडले होते.

‘अशी लोक मला आवडत नाहीत’

हिंदी-मराठी भाषेतील वादावर रेणुका शहाणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. पूजा चौधरीच्या पॉडकास्टमध्ये त्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलत होत्या. ‘जर तुम्ही खूप काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृती समजून घेणे आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिचा आदर करणे ही चांगली गोष्ट आहे. ते फक्त बोलण्याबद्दल नाही तर तिचा आदर करणे अपेक्षित आहे. ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीबद्दल सहानुभूती नाही, अशी लोक मला आवडत नसल्याचे रेणूका शहाणे म्हणाल्या. 

 ‘यामुळे भाषेचा फायदा होणार नाही’

‘दोन किंवा तीन जणांना कानाखाली मारल्याने कोणाचाही फायदा होत नाही’, असे यावेळी रेणुका म्हणाल्या. ‘मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोक त्याबद्दल असंस्कृत होतात हे मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही अशा ठिकाणी जाऊन फक्त 2-3 लोकांना कानाखाली मारणे… यामुळे भाषेचा फायदा होणार नाही’, असेही त्या पुढे म्हणाल्या. 

हिंदी-मराठी भाषेच्या वादावर आशुतोष राणा काय म्हणाले?

रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनीही अलीकडेच हिंदी-मराठी भाषेच्या वादावर भाष्य केले होते. ‘भाषा हा संवादाचा विषय आहे असे मला वाटते. तो कधीही वादाचा विषय नसतो. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे त्याने सर्वकाही स्वीकारले आहे आणि संवादावर विश्वास ठेवला आहे. भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही’, असे आशुतोष राणा एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसातच रेणूका शहाणेंची प्रतिक्रिया आलीय.





Source link

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?


मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बेरोजगार मुस्लिम तरुणांना कर्ज देते. व्यवसायासाठी त्यांना आर्थिक मदत करतं. मात्र शासनाच्या या महामंडळाच्या माध्यमातून अनेक युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचं पुढं आलंय.   

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक 
कर्ज मंजूर झालं, पैसे मात्र मिळालेच नाहीत  
सातबारावर बोजा चढवल्याने जमीनही विकता येईना

राज्य सरकार पुरस्कृत मौलाना आझाद कर्ज योजनेतील अर्जदारांची फसवणूक झालीय. संभाजीनगरच्या  सिल्लोडमधील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची भावना आहे. कर्जाचा अर्ज मंजूर होऊन 8 महिने झाले तरी त्यांना अद्याप कर्ज मिळाले नाहीत. मात्र कर्ज मंजूर होताच संबंधित अर्जदारांच्या सातबारावर बोजाही चढवला गेलाय. त्यामुळे या तरुणांना मालमत्ताही विकता येत नाही.

मौलाना आझाद कर्ज योजना काय? 
मौलाना आजाद कर्ज योजना ही सरकार पुरस्कृत 
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची योजना 
शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं 
अर्जदारांना 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा 
कर्जाची परतफेड 5 वर्षांच्या कालवधीत 20 हप्त्यामध्ये करण्याची सोय
6 टक्के व्याजदाराने कर्ज
आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेककडून कर्ज 

सिल्लोडमधील अलीम शेख आणि अकबर शेख यांनी मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्ज केला होता. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने कागदपत्रांची पडताळणी करत तो मंजूरही केला. मात्र आता या प्रक्रियेला 8 महिने झाले तरी तरुणांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे कर्जासाठी तारण ठेवलेल्या जमिनीच्या सातबारावर बोजाही चढवण्यात आला. त्यामुळे तरुणाची कर्जही मिळेना अन् दुसरीकडूनही कर्ज घेता येईना अशी अवस्था झालीय. 

दरम्यान सिल्लोडमधील ही उदाहरणं प्रातिनिधीक स्वरुपाची आहेत. राज्यात अशी आणखी काही प्रकरणं असण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी असलेलं महामंडळच आपल्या होतकरू तरुणांची अशी हेळसांड करणार असेल तर त्यांनी कुठं जायचं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. 





Source link

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा का ठरतोय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न; शर्यतीत नेमकी कोणाची नावं?

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा का ठरतोय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न; शर्यतीत नेमकी कोणाची नावं?


-चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे

पुणे शहराच्या राजकारणात ‘कारभारी’ हा शब्द तसा शरद पवारांनी 2009 साली रूढ केलेला. तोही कलमाडींना हटवण्यासाठी! पण सध्या याच कारभारी शब्दाची सर्वाधिक रंगलीय ते पुणे भाजपात…!!! कारण गिरीष बापट गेल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये पुणे भाजपचा कारभारी होण्यासाठी चांगलीच स्पर्धा लागलीये. पाहुयात पुणे भाजपचा कारभारी आहे तरी कोण? या विषयावर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट..

पुणे मनपाच्या निवडणुका होणार असल्याचं जाहिर झाल्यापासून भाजपचे दुसऱ्या फळीतले सगळे नेते, मंञी या अशा स्वतंत्र आढावा बैठका लावताहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी नेमकी कोणत्या नेत्याकडे फिल्डिंग लावायची हेच इच्छुक मेंबर्संना कळना झालंय. बरं हे कमी काय? म्हणून दस्तुरखुद्द सीएमसाहेबांचे आठवड्यातून एक दोन पुणे दौरे हे ठरलेलेच असतात म्हणूनच बापटाच्या पश्चात पुणे भाजपचा कारभारी कोण हा भाबडा प्रश्न अनेकांना सतावतोय. अगदी पञकारही त्याचं उत्तर ठामपणे देऊ शकत नाहीत कारण पालिकेच्या तिकिट वाटपाचे अधिकार हे आपल्याकडेच असावेत यासाठी चंद्रकांत पाटील, मुरली मोहोळ, माधुरी मिसाळ असे सगळेच आपआपल्या परीने मोर्चेबांधणी करताना दिसतात अशातच खासदार मुरली मोहोळ यांनी कोथरूड सोडून थेट मध्यवर्ती शहरात आपलं जनसंपर्क कार्यालय थाटल्याने पुणे भाजपचा कारभारी कोण? या चर्चेला जरा अधिकच जोर चढलाय…

कॅमेऱ्यावर बोलणं टाळलं

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा प्रश्न आम्ही सर्व इच्छूक नेत्यांना विचारण्याच प्रयत्न केला पण सगळ्यांनी उगीच नसता वाद नको म्हणून कॅमेऱ्यावर बोलणं टाळलं म्हणूनच मग आम्ही थेट तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता कम पदाधिकारी पुनीत जोशीला बोलतं केलं असता त्यांनी भारतीय जनता पार्टी हीच पुण्याची कारभारी असं मार्मिक उत्तर दिलं.

स्पर्धा आणखी थोडी तीव्र

खरंतर स्वर्गीय खासदार गिरीष बापट हयात असतानाच तत्कालीन पालकमंञी चंद्रकांत पाटलांनी पुणे भाजपचा कारभार हाती घेतला होता पण लोकसभेत निवडून येताच मुरली मोहोळ थेट केंद्रात राज्य मंञी बनल्याने त्यांना पुणे भाजपचा कारभारी बनण्याची भाजपातली स्पर्धा आणखी थोडी तीव्र बनल्याचं बघायला मिळतंय. त्यातूनच शहरातील छोट्या मोठ्या प्रोग्राम साठीही थेट मुख्यमंञ्यांना पाचारण केलं जातं आणि ते देखील आवर्जून येतात बरं. यातच सर्वकाही आलं.

कौतुक मिश्रित जुगलबंदी

मुरली मोहोळ महापौरचे थेट केंद्रीय मंञी बनल्याने पुणे शहराचं कारभारीपद ही आता आपल्यालाच मिळावं, यासाठी ते विशेष प्रयत्न करताना दिसतात पण चंद्रकांत दादा आणि माधुरी मिसाळ हे दोन राज्यातले मंञी आपणही इथे सिनिअर आहोत बरं. हे सातत्याने दाखवून देत असतात. त्यातूनच मग गेल्या शनिवारच्या पक्ष मेळाव्यातच अण्णा दादात रंगलेली कौतुक मिश्रित जुगलबंदी अगदी सीएमसमोरच रंगल्याचं बघायला मिळालं.

…मग ते फडणवीस कसले?

2017 साली पुणे मनपात भाजपची एकहाती सत्ता आली होती आणि यंदाही तसेच निकाल लागतील, अशी आशा भाजप नेत्यांना हे कदाचीत म्हणूनच ही पुणे भाजपातली ही कारभारी पदाची स्पर्धा तीव्र झाली असावी, पण फडणवीस तळ लागून देतील मग ते फडणवीस कसले? बघुयात पुणे मनपात भाजपची तिकीटं वाटताना नेमका कोणाला अप्पर हँड मिळतोय ते.





Source link

सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार

सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार


Fourth Mumbai In Maharashtra : महाराष्ट्र हे प्रचंड वेगाने विकसीत होत आहे. महाराष्ट्रात नवीन शहर देखील विकसीत केली जात आहेत.  मुंबई आणि नवी मुंबई या शहरावर येणार ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी मुंबई (Third Mumbai)  उभारली जात आहे. तर, दुसरीकडे चौथ्या मुंबईचे देखील प्लानिंग सुरु आहे. चौथी मुंबई हे सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार आहे. देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट चौथ्या मुंबईला कनेक्ट होणार आहेत. 

महाराष्ट्रात चौथी मुंबई निर्माण करण्याचा प्लान तयार केला जात आहे. चौथी मुंबई हे  मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे. पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जात आहे. या परिसरात चौथी मुंबई उभारण्याची योजना आहे.  महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा मोदी सरकारचा ड्कीम प्रोजेक्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल.या बंदरातून कोळसा, सिमेंट, केमिकल आणि तेल यांची वाहतूक करता येईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झालेल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार. वाढवण बंदर हा प्रकल्प जवळपास 76 हजार कोटी रुपयांचा आहे. 

वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरणार आहे.  या वाढवण बंदराचे काम पूर्ण होई पर्यंत पालघरमध्ये मुंबईजवळील तिसरे विमानतळ तसेत रस्ते उभारले जाणार आहेत. वाढवण बंदराजवळच चौथी मुंबई उभारण्याचा प्लान आहे.   वसई, विरारपासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेला जाणार आहे.  देशातील 8 मोठे प्रोजेक्ट चौथ्या मुंबईला डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत.  दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन, विरार बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण खोल सागरी बंदर, वाढवण विमानतळ, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, उत्तन-विरार-पालघर सी लिंक, इगतपुरी-वाळवण द्रुतगती मार्ग आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हे चौथ्या मुंबईला जोडले जाणार आहेत.  देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत. 

 





Source link

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय; 5 लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ होणार, कसा? पाहा सविस्तर वृत्त

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय; 5 लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ होणार, कसा? पाहा सविस्तर वृत्त


No match is being played.

Jul 13, 2025 | Final

Quadrangular T20I Series in Malawi, 2025

Jul 13, 2025 | 3rd Place Play-off

Quadrangular T20I Series in Malawi, 2025

Jul 13, 2025 | 3rd Test

The Frank Worrell Trophy, 2025

AUS

(70.3 ov) 225

(37 ov) 121

VS

WI

143(52.1 ov)

27(14.3 ov)

Australia beat West Indies by 176 runs
Full Scorecard →





Source link

'तुम्ही काय पत्र पत्र खेळता', सभागृहात वरुण सरदेसाईं आणि शंभूराज देसाई भिडले, म्हणाले 'तुम्ही काय केलं?'

'तुम्ही काय पत्र पत्र खेळता', सभागृहात वरुण सरदेसाईं आणि शंभूराज देसाई भिडले, म्हणाले 'तुम्ही काय केलं?'



ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार वरूण सरदेसाईंनी पुनर्विकासाचा मुद्दा रखडल्याची लक्षवेधी सभागृहात मांडली होती. दरम्यान यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी दिलेल्या उत्तरावरून वरूण सरदेसाई चांगलेच आक्रमक झालेत
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp