by Hansraj Agrawal | Jul 8, 2025 | Trending News
MNS Mira Bhayandar Morcha : मीरारोडमध्ये आज मराठी माणसाची ताकद दिसून आली..मराठी माणसांसाठी मनसेने हा मोर्चा काढण्याची घोषणा केली. सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मनसैनिकांची धरपकड करण्यात आली. मात्र मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. आमच्यावर अन्याय का? आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली ? असे प्रश्न उपस्थित केले. अखेर मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर मनसेने मीरारोडमध्ये मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्ते, आंदोलक. मराठी माणूस ,सहभागी झाला. बघता बघता मीरारोडमध्ये रस्ता दिसेनासा झाला.. सगळीकडे मनसे आणि शिवसेना UBT पक्षाच्या कार्यकर्त्यांनी , मराठी प्रेमींनी मोर्चात सहभाग घेतला. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे लोकलने प्रवास करत या मोर्चात सहभागी झाले.
मीरा भाईंदरमधील मोर्चातून भाजप नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधलाय.. मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचं षढयंत्र रचल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय.. त्यामुळे नरेंद्र मेहतांना मराठी माणूस जागा दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी कितीही दडपशाही केली अगदी दीड हजार लोकांना नोटीस पाठवली. तरीही हा मोर्चा इतका यशस्वी झाला. जर पोलिसांनी यामध्ये कारवाई केली नसती तर हा आकडा पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचला असता. मीरारोडचा एक आमदार सांगतो की, येथे 12 ते 14 टक्केच मराठी माणूस आहे. पण हा एवढाच मराठी माणूस पुरेसा आहे. हा मोर्चा जर ठाण्यात झाला असता तर काय झालं असतं? असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला.
महाराष्ट्रात मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर कानाखालीच बसेल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मला असं वाटतं, जो संदेश आपल्याला द्यायचा होता. इथे 2000 मैलावरुन येऊन दादागिरी नाही करायची. हा महाराष्ट्र इथे काय होणार? आणि काय होणार हे आम्ही मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना गपचुप धंदा करा. उगाच कावकाव करु नका. नरेश, सुरेश पडेल… कानाखालीच पडेल. मराठी असल्याचा फक्त गर्व नाही तर माज आहे असं संदीप देशपांडे यांनी मीरारोड येथील मोर्चात म्हटलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती यांचे राजन विचारे यांनी आभार मानले आहेत. हिंदी सक्तीचा जीआर रद्द करुन सरकारला नमावं लागलं. आणि हाच मराठी एकजुटीचा परिणाम आहे. मीरारोड येथे व्यापाऱ्यांचा मोर्चा निघू शकतो पण मराठी भाषेसाठी मोर्चा निघू शकत नाही. मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असते का? नोटीस देऊन अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने तुम्ही मनमर्जीपणा करत असाल तर हा महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांच राज्य आहे. तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत. व्यवसाय महाराष्ट्रातून काढून बाहेर जात आहेत, या सगळ्यावर UBT चे नेते राजन विचारे यांनी आपलं मत मांडल आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 7, 2025 | Trending News
Nothing Phone 3: नथिंगने भारतीय बाजारात त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केलाय. हा स्मार्टफोन फोन 1 आणि फोन 2 पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आलीय. या फोनच्या मागील बाजूस Glyph Matrix जोडण्यात आलाय. जो iPhone च्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे काम करेल. असे असले तरी नथिंग फोनच्या फिचर्समध्ये फारसा बदल झालेला नाही. यात फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी आहे. याचे आणखी फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये फोन 2 पेक्षा वेगळे काय?
कंपनीने नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. ग्लिफ मॅट्रिक्स डिझाइन सर्वात खास आहे. वेगवेगळ्या टूल्स म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ग्लिफ मिरर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला मागील डिस्प्लेद्वारे परिपूर्ण सेल्फी काढता येतो. यात डिजिटल घड्याळ, बॅटरी इंडिकेटर, स्टॉपवॉच आणि इतर अनेक गोष्टी मिळतात. नव्या फोनमध्ये कॅमेऱ्याचे प्लेसमेंट पूर्णपणे बदलण्यात आले आहे.
नथिंग फोन 3 चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.67-इंचाचा फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे आणि रिझोल्यूशन 1260 x 2800 पिक्सेल आहे. नथिंगचा हा फोन स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने त्यात 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनी फोनसोबत 5 वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपडेट आणि 7 वर्षांपर्यंत सिक्युरिटी पॅच अपडेट देत आहे.
नथिंग फोन 3 चे कॅमेरा फीचर्स
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5500 एमएएच आहे, ज्यामध्ये तुम्हाला 65 वॅट फास्ट चार्जिंग मिळते. यात 15 वॅट वायरलेस चार्जिंग आणि 7.5 वॅट रिव्हर्स वायर्ड चार्जिंग आणि 5 वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला आयपी 68 रेटिंग मिळते. सुरक्षेसाठी त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
नथिंग फोन 3 ची किंमत आणि ऑफर
कंपनीने नथिंग फोन 3 लाख 79 हजार 999 रुपयांना लाँच केलाय. ही किंमत त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी त्याच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. त्याची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. प्री-बुकिंग सुरू झाले आहे आणि त्यावर 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 7, 2025 | Trending News
Maha Vikas Aghadi On Raj Thackeray: हिंदीच्या मुद्द्यावरुन तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर दिसून आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने विरोधकांना आणि महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता राज ठाकरेंसोबत जाण्यात काँग्रेस तयार नसल्याचं चित्र दिसत आहे. उलट राज यांच्यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसचा एकही नेता मेळाव्याला नव्हता
मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला आहे. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड असे नेतेही हजर होते.
…म्हणून काँग्रेसचा राज ठाकरेंना नकार?
राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’
शरद पवार गटाबरोबर आघाडी?
काही महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसची समविचारी पक्ष असलेल्या शरद पवार गटाबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करूनच घेतला जाणार आहे.
काँग्रेस नेत्यांचं म्हणणं काय?
निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने लढवायच्या याची पक्षात चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, “त्यांची मविआबरोबर लढण्याची तयारी असेल तर लढायचे की नाही हे ठरवू, ठाकरे बंधूंचे काय ठरते त्यानंतरच आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल,” असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’
सत्तेत असूनही कॉमन मॅन सारखाच वागणारा नेता एकच, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हीच सामान्यांची भावना आहे. आपल्या कामातून खऱ्या अर्थाने “मराठी माणसाचे हृदयसम्राट” बनले आहात, अशी भावना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 6, 2025 | Trending News
Maharashtra School : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जुलै संपावर जाणार आहे. अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत असल्याने हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुरकारला आहे. त्यामुळे राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद असणार की नाही याबद्दल पालक संभ्रमात होते. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने एक आदेश काढून त्याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे.
राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार?
येत्या 8 आणि 9 जुलैला राज्यातील शिक्षक समन्वय संघाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्यातील शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की, 8 जुलै मंगळवार आणि 9 जुलै बुधवारी राज्यातील शाळा बंद राहणार नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, 8 आणि 9 जुलैला शाळा असणार आहे.
आझाद मैदानावर आंदोलन
राज्यातील विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येत सरकारचे लक्ष वेधणार आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने मुंबईत येऊन सरकारला आपली नाराजी शिक्षण व्यक्त करणार आहेत.
गेल्या वर्षी, अनुदानित शाळांसाठी वाढीव आर्थिक अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून 75 दिवस राज्यव्यापी निदर्शने केली. सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या अधिकृत सरकारी ठरावात (जीआर) निधी वाटप करण्यात त्यांनी अपयशी ठरले, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, एक वर्षानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार हाती घेतलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 6, 2025 | Trending News
Raj Thackeray Vs Sushil Kedia: शनिवारी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान देणारे गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याच प्रकरणात आता एक नवीन घडामोड समोर आली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याला तासभर शिल्लक असतानाच शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र ही तोडफोड करणं या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडलं आहे.
राज ठाकरेंना अनेकदा डिवचलं
केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना शनिवारी ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर केडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी मुंबईत 30 वर्षे राहूनही मी मराठी बोलू शकत नाही. राज ठाकरे तुम्हाला काय करायचं ते करुन घ्या, अशा आशयाची पोस्ट करत मनसेला खुली आव्हान दिलं होते. त्यानंतरही अन्य पोस्टमध्ये एकही जागा न निवडून आलेला पक्ष वगैरे असे संदर्भ देत केडिया यांनी मनसेला लक्ष्य केलेलं. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर केडिया यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले.
कार्यालयावर हल्ला, व्हिडीओ अन् ताब्यात घेतले कार्यकर्ते
शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास वरळीमधील मेळाव्याला सुरुवात होण्याच्या काही काळ आधीच मनसे कार्यकर्त्यांनी वरळीमधीलच सेन्च्युरी बाजार येथील व्ही वर्क येथील केडीया यांच्या कार्यालयातील काचेच्या दरावर नारळ फेकले. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फरसं यश आलं नाही. कार्यकर्ते ‘मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा घोषणा देत होते आणि राज ठाकरे यांचा जयजयकार करत होते. या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच संशयितांना केडियांच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या अटकेमुळे माफीनंतरही हे प्रकरण चिघळणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
केडियांचा माफीनामा
दरम्यान, मेळावा संपल्यानंतर अर्ध्या तासात केडिया यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत माफीनामा जाहीर केला. “माझं ट्विट चुकीच्या मनस्थितीत, दबावाखाली आणि तणावाखाली करण्यात आलेलं. त्यानंतर ह् ट्विट लोकांनी चुकीच्या पद्धतीने हाताळं आणि त्यातूनच वाद निर्माण झाला. मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्याने मी ओव्हररिऍक्ट केलं. त्यामुळे मी माझं हे ओव्हररिऍक्टिंग मागे घेण्याचे ठरवले,” असं म्हणत केडिया यांनी माफी मागितली. “30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यत आणि स्पष्टता मिळवायला हवी होती तितकं आपल्याला जमलं नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते माफीनाम्यात म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 5, 2025 | Trending News
NPS: केंद्र सरकारने देशातील 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिलीय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या एकात्मिक पेन्शन योजनेला (यूपीएस) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) सारखे कर लाभ देखील मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. पारदर्शक, लवचिक आणि कर-कार्यक्षम पर्यायांद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्र सरकारने निवेदनात म्हटलंय. एनपीएस अंतर्गत उपलब्ध असलेले कर लाभ यूपीएसला देखील लागू होतील. कारण ते एनपीएस अंतर्गत एक पर्याय आहे. या तरतुदी विद्यमान एनपीएस रचनेसारख्या असतील.
NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS
अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS सादर केले. 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ते लागू होईल. UPS लागू करण्यासाठी, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 19 मार्च रोजी एक नियमावली जारी केली होती. NPS मध्ये सहभागी असलेल्या आणि हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना UPS लागू होईल. सुमारे 23 लाख सरकारी कर्मचारी UPS निवडू शकतात. अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांना UPS निवडण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर केली आहे.
NPS सारखे फायदे मिळणार
या तरतुदी विद्यमान एनपीएसप्रमाणे असून UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी कर सवलत मिळेल. अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या नोटिफिकेशनुसार, 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून यूपीएस लागू करण्यात आला आहे. या नोटिफिकेशननंतर, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील यूपीएस अंतर्गत सामील होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
पीएफआरडीए करेल व्यवस्थापन
या चौकटीची अंमलबजावणी करण्यासाठी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने 19 मार्च 2025 रोजी पीएफआरडीए (एनपीएस अंतर्गत एकात्मिक पेन्शन योजनेचे ऑपरेशन) नोटिफिकेशन काढले. एनपीएसच्या कक्षेत येणाऱ्या आणि एनपीएस अंतर्गत हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस लागू होते. सध्या 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी त्याच्या कक्षेत येतात.
गेल्या वर्षी UPS लागू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट 2024 रोजी UPS च्या पर्यायाला मान्यता दिली होती. जानेवारी 2004 पासून जुनी पेन्शन योजना (OPS) बंद केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS सुरू करण्यात आला. पण ही प्रणाली बाजार जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच या योजनेत हमी पेन्शन उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आणि त्यांची ही कोंडी दूर करण्यासाठी, हमी पेन्शन यूपीएस लागू करण्यात आली आहे.
Source link