Raj Thackeray Audio Clip Viral: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी उपस्थित केलेला ‘मत चोरी’चा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भ देत कार्यकर्त्यांना मतदारयादीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी आपण यापूर्वीच हा मत चोरीचा मुद्दा मांडला होता असंही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं.
राज ठाकरे त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले? वाचा संपूर्ण भाषण
राज ठाकरेंनी पुण्यातील या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे? या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे वाचा राज ठाकरेंचं हे छोटेखाणी भाषण जसच्या तसं…
“या मतदानामध्ये गडबड आहे हे मी केव्हापासून बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याचवेळेला सांगत होतो लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याची जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधींनी हे सगळं प्रकरण परत बाहेर काढलं. मी तेव्हापासून सांगतोय, आपल्याला मतदान होत नाही असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जातात. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत.
तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजपाने 132, शिंदे 56, अजित पवार 42 जागा जिंकले. एकूण 232 च्या आसापास जागा जिंकल्या. एवढं संपूर्ण बहुमत मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता? याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं. पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. त्या मतांच्या गोंधळामुळे 2014 पासून सत्ता राबवल्या गेल्या आहेत.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली असेल तुम्ही. त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. केंद्रात विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत राहुल गांधी! त्याचवेळी त्या ठाकुरांनी, अनुराग ठाकुरांनी सहा मतदारसंघाचं काढलं. तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे, अरे विरोधी पक्ष पण बोलतोय आणि सत्ताधारी पक्ष पण बोलतोय. मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. मात्र हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे. याचं कारण गेल्या 10-12 वर्षांचा सगळा खेळ उघडा पडेल. यांना जर तुम्हाला निवडणुकीत उघडं पाडायचं असेल जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही.”
राज ठाकरेंच्या या आरोपांवर आता सत्ताधारी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
FAQ
राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत काय मुद्दा उपस्थित केला? राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीत मत चोरी होत असल्याचा आरोप केला. त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या ‘मत चोरी’च्या मुद्द्याला पाठिंबा देत मतदार यादीकडे लक्ष देण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं? राज ठाकरे यांनी सांगितलं की, मतदान प्रक्रियेत गडबड आहे आणि मते चोरली जातात, ज्यामुळे मनसेला पराभव पत्करावा लागतो. त्यांनी 2014 पासून मतांच्या गोंधळामुळे सत्ताधारी सत्ता राबवत असल्याचा दावा केला. तसेच, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी न करता ते दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.
राज ठाकरे यांनी कोणत्या नेत्यांशी यापूर्वी मत चोरीबाबत चर्चा केली होती? राज ठाकरे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्याशी मत चोरीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता, पण विरोधी पक्षांनी आयत्या वेळी माघार घेतली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी काय म्हटलं? राज ठाकरे यांनी सांगितलं की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिंदे गटाने 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या, म्हणजेच एकूण 232 जागा मिळाल्या. तरीही महाराष्ट्रात विजयाचा जल्लोष नव्हता आणि सन्नाटा होता, कारण मतांचा गोंधळ झाला होता.
निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी कोणती टीका केली? राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीच्या आरोपांची चौकशी न केल्याचा आणि प्रकरण दाबण्याचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षाचे अनुराग ठाकुर दोघेही मत चोरीबाबत बोलत असताना आयोगाने कारवाई करायला हवी होती.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
Crime News JCB Connection Revealed Suspense: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नवरा बायकोत होणाऱ्या नेहमीच्या वादामुळे नवऱ्याने चार दिवसांपूर्वी बायकोची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्याचं उघड झालं. पत्नीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात बायको हरवली असल्याची तक्रार देखील या व्यक्तीने दाखल केली होती. हिंगणघाट पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र हादरवून टाकणारा खुलासा झाला. पतीनेच पत्नीची हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे.
नेमका कुठे घडला हा प्रकार?
हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात 20 दिवसापूर्वी रहायला आलेल्या सुभाष लक्ष्मन वैद्य याने 19 ऑगस्ट रोजी बायको हरविली असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून शोध सुरू केला. सर्वत्र तपास करीत असताना पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना वैद्य योग्य उत्तरे देत नसल्याने पोलिसांना संशय आला. तर मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांनी नवऱ्यावर संशय घेतला असल्याने पोलिसांनी तपास केला.
त्या खड्ड्याबद्दल पोलिसांनी संशय
काही दिवसांपूर्वी सुभाषने घराजवळ जेसीबीच्या साहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नेमका इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला? आणि खड्डा बुजला कसा? याची चौकशी सुरू केली. ज्या जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करण्यात आला. त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आले. जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचे सांगितले. पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे सांगितले.
आरोपी फरार
पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉडच्या माध्यमातून खड्ड्याच्या आजूबाजूला शोध घेण्यात आला. खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये प्रेत आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले असून आरोपी सुभाष मात्र पसार झाला आहे.
FAQ
हिंगणघाट येथील हत्या प्रकरणात काय घडले? उत्तर: हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात सुभाष लक्ष्मन वैद्य याने आपल्या पत्नी माधुरीची धारदार शस्त्राने हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरला. यानंतर त्याने पत्नी हरवल्याची खोटी तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस तपासात हत्या आणि मृतदेह पुरल्याचा खुलासा झाला.
ही घटना नेमकी कुठे घडली? उत्तर: ही घटना हिंगणघाट शहरातील इंदिरा वार्ड परिसरात घडली, जिथे सुभाष लक्ष्मन वैद्य आणि त्याची पत्नी माधुरी 20 दिवसांपूर्वी राहायला आले होते.
सुभाषने पत्नीच्या हत्येनंतर काय केले? उत्तर: सुभाषने पत्नी माधुरीची हत्या करून तिचा मृतदेह घराजवळ खोदलेल्या खड्ड्यात पुरला. त्यानंतर त्याने 19 ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली.
पोलिसांना सुभाषवर संशय कसा आला? उत्तर: पोलिसांनी तक्रारीनंतर तपास सुरू केला, पण सुभाषने विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत. तसेच, माधुरीच्या नातेवाईकांनी सुभाषवर संशय व्यक्त केला, ज्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
Viral Video: जर एखादा बिबट्या आणि कुत्रा एकमेकांच्या समोर आले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? नक्कीच तुमचं उत्तर बिबट्या असेल. पण जर तुम्हाला एखाद्याने कुत्रा जिंकेल असं सांगितलं तर नक्कीच त्याला वेड्यात काढाल. पण नाशिकमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला चक्क फरफटत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका भटक्या कुत्र्यामध्ये आणि बिबट्यामध्ये सामना झाला. यावेळी कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला 300 मीटर ओढत नेलं. नाशिकमधील निफाडमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडली जेव्हा बिबट्या परिसरात घुसला होत. कुत्र्याने आक्रमक प्रतिहल्ला केला, बिबट्याला पकडलं आणि बराच अंतरापर्यंत ओढत नेलं.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कुत्र्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याला तोंड न देता बिबट्याने अखेर स्वतःची सुटका करून घेतली आणि पळून गेला. विशेष म्हणजे संघर्ष करणारा कुत्रा यातून वाचला आहे. परिसरातील कोणत्याही नागरिकाला दुखापत झालेली नाही.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी झाल्यानंतर बिबट्या जवळच्या शेतात पळून गेला होता. वन अधिकाऱ्यांनी अद्याप बिबट्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. परंतु घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि पाळीव प्राणी सुरक्षित नसल्याचं नमूद केलं आहे.
नाशिकमधील ही घटना तेव्हा घडली आहे, जेव्हा देशात भटक्या कुत्र्यांसंदर्भात चर्चा रंगली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमध्ये लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडण्यास मनाई करणाऱ्या आपल्या पूर्वीच्या निर्देशात सुधारणा केली आणि या निर्बंधाला “खूप कठोर” म्हटलं आहे.
सर्वत्र गणेशोत्सावाची लगबग सुरु असतानाच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी 27 ऑगस्टला देशात गणेशाचे आगमन होणार आहे. महिन्याचा शेवट असल्याने अनेक लोकांना गणरायाच्या स्वागत करताना आर्थिक अडचण येऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेत राज्य सरकाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवसाआधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्य सरकारकडून शासनकडून सरकारी कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबरला पगार देण्यात येतो. आता या निर्णयानुसार त्यांना येत्या मंगळवारी 26 ऑगस्ट पगार देण्यात येणार आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयामुळे, गणेशोत्सव काळात कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मानला जातोय. आता गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची मोठ्या थाट्यामाट्यात होणार आहे.
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी
आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले.
कोकणवासायींना टोलमाफी!
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.