'नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच सरकार…' नसरापूर अत्याचार प्रकरणावर प्रवीण तरडेंची कठोर भूमिका

'नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच सरकार…' नसरापूर अत्याचार प्रकरणावर प्रवीण तरडेंची कठोर भूमिका



Pravin Tarade on Nasarpur Incident : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आला. या घटनेवर सर्वच स्तरावरुन संताप व्यक्त होत असताना अभिनेता प्रवीण तरडेने सरकारलाच धारेवर धरलं आहे. 



Source link

Pune Accused PHOTO: पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचा फोटो आला समोर, पाहून येईल चीड

Pune Accused PHOTO: पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचा फोटो आला समोर, पाहून येईल चीड


Pune Crime: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षीय नराधमाने अवघ्या साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर गोठ्यात नेऊन अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी जनसामान्यांमधून होत आहे. आता नराधमाचा चेहरा समोर आलाय. जो पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

Add Zee News as a Preferred Source

काय नेमकं प्रकरण?

ही घटना भोर तालुक्यातील एका ग्रामीण भागात घडली. साडेतीन वर्षांची ही चिमुरडी आपल्या घराबाहेर खेळत असताना, आरोपीने तिला फूस लावून एका निर्जन गोठ्यात नेले. तिथे त्याने या बालिकेवर पाशवी अत्याचार केला. केवळ शरीरसुखाच्या हव्यासापोटी एका वयोवृद्ध व्यक्तीने नातवाच्या वयाच्या मुलीसोबत केलेले हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे.

पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी ओरडेल किंवा ही बाब कोणाला सांगेल, या भीतीने आरोपीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने अत्यंत क्रूरपणे तिचा गळा दाबून किंवा मारहाण करून जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता, आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने चिमुरडीचा मृतदेह लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा हा थंड डोक्याने केलेला कट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

कुटुंबीयांकडून शोध 

मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने परिसरात शोध घेत असताना, संशयास्पद हालचालींमुळे गोठ्याजवळ शोध घेतला असता, चिमुरडीचा रक्ताळलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. हे दृश्य पाहून पालकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि स्थानिक गुप्तचरांच्या माहितीवरून पोलिसांनी 65 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी

पीडितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत. वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याची पुष्टी होण्याची शक्यता असून, हा अहवाल न्यायालयात आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे.

सामाजातून संताप 

या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. “वृद्ध व्यक्तीकडून अशा कृत्याची अपेक्षा कशी करता येईल?” असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

पालकांसाठी सतर्कतेचा इशारा

अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ओळखीचे असो वा अनोळखी, मुलांवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांना ‘गुड टच-बॅड टच’ बद्दल माहिती देणे काळाची गरज बनली आहे. समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या लोकांपासून सावध राहणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.





Source link

बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार लढत होणार नाही, काय घडलंय नेमकं?

बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार लढत होणार नाही, काय घडलंय नेमकं?


Pawar vs Pawar In Baramati: आता बारामतीमध्ये पुन्हा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार नाही, पवार विरूद्ध पवार सामना होत असेल तर बारामती निवडणुकीत माघार घेणार आणि दुसरा मतदारसंघ शोधणार अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतलीय. तर त्यांच्या या भूमिकेचं सत्ताधा-यांनी स्वागत
केलंय.

Add Zee News as a Preferred Source

बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार लढत होणार नसल्याचे थेट संकेत खासदार सुप्रिया सुळेंनी दिले आहेत.  2024च्या लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा थेट सामना झाला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय तर सुनेत्रा पवारांना पराभवास सामोरे जावं लागलं होतं, मात्र 2029मध्ये आता पवार कुटुंबात सामना होणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. तर कुटुंब आणि राजकारण वेगळंच आहे, सुप्रियाताई योग्यच बोलल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय.

सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सहमती दर्शवली आहे, सुप्रिया सुळेंनी विचारपूर्वक भूमिका मांडल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय.

सुप्रिया सुळेंनी रोड मॅप आखून दिल्याचं म्हणत छनग भुजबळांनीही सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय, तर देर आये दुरूस्त आये असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळेंना मात्र टोला लगावला आहे.

2024च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमनेसामने आले होते, तर दुसरीकडे विधानसभेतही युगेंद्र पवार आणि अजित पवार मैदानात होते, मात्र आता पवार विरूद्ध पवार सामना होणार नसल्याचं सुळेंनी सांगितलं, बारामतीमधून सुप्रिया मागील अनेक वर्षांपासून निवडून येतायत त्यामुळे 2029मध्ये कोण माघार घेणार आणि कोण दुसरा मतदारसंघ शोधणार याकडे आता लक्ष लागलंय.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांचा टोला 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.मुंबई-पुणे प्रवासादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत सुळेंना 2 तास अडकून राहावं लागलं.या वाहतूक कोंडीचा व्हीडिओ सुळेंनी पोस्ट केला.यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनीही सुळेंना टोला लगावला. सुप्रियाताईंनी पोस्ट केलेला वाहतूक कोंडीचा व्हीडिओ बघितला. मात्र यापुढे त्या वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत.त्यांच्या सरकारनं थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला.दरम्यान, माधुरी मिसाळ यांनीही यावरून सुळेंना टोला लगावला…टिप्पणी करा पण चांगल्या कामाचं कौतुकही करा, असा सल्ला माधुरी मिसाळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलाय. तर हे सरकार केवळ इव्हेंट सरकार आहे.अटलसेतू आणि मिसिंग लिंक वरून तुम्ही लवकर याल पण पुढे काय, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी विचारलाय.





Source link

HSC Result 2026 : 12 वीचा निकाल काही तासात होणार जाहीर! मोबाईलवरून कसा तपासाल, जाणून घ्या सविस्तर

HSC Result 2026 : 12 वीचा निकाल काही तासात होणार जाहीर! मोबाईलवरून कसा तपासाल, जाणून घ्या सविस्तर


When and where can the HSC result be checked : 12 वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक नक्कीच वाढली असेल. निकाल जाहीर व्हायला काही तास शिल्लक असताना कोणाला किती टक्के पडणार या बाबत विद्यार्थ्यांना तर चिंता असतेच त्यापेक्षा जास्त पालकांच्या चेहऱ्यावर निकालाची चिंता दिसून येते. मागील काही दिवसांपासून 12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा होती. काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एचएससी निकालाची तारिख आणि वेळ जाहीर केली आहे. पण हा निकाल कोणत्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार आहे, या 2 तारखेला 1:00 वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

12 वीचा निकाल या वेबसाइटवर पाहता येणार

2 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे, हा निकाल विद्यार्थी results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या वेबसाइटवर पाहू शकणार आहेत. मंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे, याबद्दल मंडळाने सांगितले की या परिक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी हे या पोर्टल्सवरून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याचबरोबर असेही सांगितले आहे की डिजीलॅाकर ॲप्लिकेशनद्वारे निकालपत्र विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील लॉगिनद्वारे मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहेत. 

हे ही वाचा 

‘आधी ‘अमृतांजन बाम’ लावावा लागत होता, आता ‘टायगर बाम’ उपाय केलाय;’ एकनाथ शिंदेंचं ‘कनेक्टिंग लिंक’ उद्घाटनादरम्यान विधान

मंडळाची पत्रकार परिषद आणि घोषणा प्रक्रिया

मंडळ 2 मे रोजी निकाल जाहीर करणार आहे, त्याआधी 2 मे ला 11 वाजता पुणे कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये दुपारी 1 वाजता निकालाची लिंक सक्रिय करण्याआधी त्याचबरोबर परिक्षा आणि विद्यार्थीच्या कामगिरीशी संबंधित महत्वाचा तपशील दिला जाणार आहे. 2026 मध्ये बारावीची परीक्षा ही यंदा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये मंडळांमार्फत घेण्यात आली होती. 

पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध

निकाल लागल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका किंवा निकालामध्ये शंका असल्यास त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 3 मे ते 17 मे ही वेळ देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट देखील सादर केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्याच्या विभागामधील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. 





Source link

जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टची स्थापना

जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टची स्थापना


Mumbai News :  अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. अशा या जेष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांसारख्या कलाकारांनी एकत्र येऊन जेष्ठ कलाकारांचे दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचे आजारपण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी CAWT सारखा एक मंच तयार केला असून या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत केले.

Add Zee News as a Preferred Source

सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT)आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने CAWT च्या स्थापनेत आणि CINTAA – CAWT टॉवरच्या उभारणीत ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस ते बोलत होते. 

रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला कि सरत्या काळात त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही. त्यांची कुणी चौकशी करत नाहीत. असे जवळपास ९ ते १० हजार कलाकार सध्या अभिनय क्षेत्रात आहेत. अशा कलाकारांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे असते. यामध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारे इतर कामगार यांची संख्या देखील मोठी आहे. याना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती मला CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी मला आज दिली. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.  तसेच CAWT ला जेष्ठ कलाकारांकरिता मी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रविंद्र चव्हाण यांच्या सोबत जेष्ठ अभिनेत्री व CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. 





Source link

'…म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वत: निवडणूक लढवली नाही!' भाजपाने सांगितलं कारण; पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण?

'…म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वत: निवडणूक लढवली नाही!' भाजपाने सांगितलं कारण; पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण?


Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा बळी दिल्याचा आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या…

Add Zee News as a Preferred Source

स्वाभिमान गमावून ‘गुलामी’चे राजकारण

काँग्रेससमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची लाचारी सुरु असल्याचा आरोप बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर काँग्रेससमोर लाचारी पत्करल्याचा आरोप करण्यात आला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर झुकत राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी काँग्रेसने साथ दिली नाही, तरीही त्यांची लाचारी केली जाते, हे दुर्दैवी असल्याची टीका बन यांच्याकडून करण्यात आली.

देशात मोदींचे नेतृत्व ठाम, विरोधक स्वप्नात

राऊत आणि काँग्रेसवर टीका करताना, विरोधक फक्त स्वप्नरंजन करत असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाचा ठाम विश्वास असल्याचे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेली ‘कॉमेडी सर्कस’ असल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला.

स्थानिक नेतृत्वाला डावलण्याचे राऊतांचे धोरण

काँग्रेस नेत्यांचा अपमान सुरूच असल्याचा टोला लगावत बन यांनी राऊतांना लक्ष्य केलं. संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना डावलण्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना योग्य मान न दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच राऊत यांना धडा शिकवेल, असा इशारा बन यांच्याकडून देण्यात आला आहे.

महायुतीचं ‘सरप्राईज’ शक्य

दानवे फक्त उबाठा गटाचे उमेदवार असल्याचंही बन यांनी म्हटलं आहे. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे नव्हे, तर केवळ उबाठा गटाचे उमेदवार आहेत. काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्यास समीकरणे बदलतील. महायुतीकडून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी होऊ शकतात, असं सूचक विधान बन यांनी केलं आहे.

सुषमा अंधारे नाराज

सुषमा अंधारे यांच्या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर बन यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पक्षासाठी काम करूनही त्यांना संधी न देणे, आणि दानवे यांना पुन्हा संधी देणे, यावरून पक्षातील अंतर्गत राजकारण स्पष्ट होत असल्याची टीका बन यांनी केली आहे. राऊत यांनीदेखील अंधारे यांची खिल्ली उडवल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. पक्षातील दुय्यम वागणुकीवरून नाराजी असल्याचं बन म्हणालेत.

जनतेतून निवडून येण्याचे राऊतांना आव्हान

राऊत यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर बन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राऊत यांनी कधीही थेट निवडणूक लढवली नाही, असा आरोप करत त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आव्हान देण्यात आले. जनतेच्या मतांचा आधार नसताना टीका करण्याचा अधिकार नाही, असे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंचा राजकीय बळी टळला

दानवे यांना पुढे करून अंतर्गत संघर्ष झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, असा गंभीर आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जिंकले असते, पण त्यामुळे राऊत यांच्या राज्यसभा महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे अंतर्गत दबाव टाकून अंबादास दानवे यांना पुढे करण्यात आले. काँग्रेस उमेदवार दिल्यास या संघर्षाचा परिणाम अधिक तीव्र होईल आणि आघाडीचे अंतर्गत मतभेद उघड होतील, असं बन यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की…

पराभव दिसला की शंका उपस्थित करण्याचा आरोप बन यांनी विरोधकांवर केला आहे. निवडणूक जिंकली तर ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की त्याच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्याची विरोधकांची भूमिका असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातही राऊत यांनी केवळ वक्तव्ये केली, पण प्रत्यक्ष प्रचारासाठी गेले नाहीत, अशी टीका बन यांच्याकडून करण्यात आली.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp