पुणेकरांना मोठी भेट! पुण्याला 1000 ई-बस मंजूर

पुणेकरांना मोठी भेट! पुण्याला 1000 ई-बस मंजूर


Pune E Bus : पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस समाविष्ट होतील. परिणामी, पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होऊन, कोंडी कमी होईल तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीसह ‘पीएमआरडी’च्या हद्दीत सेवा देणारी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पीएमपीकडे सध्या २००० बस आहेत. त्यातील सुमारे ७५० स्वमालकीचा तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे. म्हणून पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साथ महत्त्वाची ठरली.

‘या बसेससाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला. त्यानंतर  या १००० ‘ई-बस’ साठीचा प्रस्ताव पीएमपीएमलमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्याला गती मिळावी, यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच मी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली होती. त्यांनीही तातडीने या प्रस्तावाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला १००० ई बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोहोळ म्हणाले. 

‘पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर आहे. सध्या शहरात ३२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावते आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोही लवकरच धावू लागेल. याशिवाय मेट्रोच्या विस्तारित मार्गांनाही मान्यता मिळाली आहे. त्याचजोडीला पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे हा माझा प्रमुख अजेंडा आहे. पीएमपीच्या ताफ्यात अधिकाधिक बस याव्यात, यादृष्टीने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरात लवकर या बस पीएमपीच्या ताफ्यात याव्यात, याला माझे प्राधान्य राहील,’असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड शहरासाठी एक हजार नव्या ‘ई ंबस’ खरेदीसाठी मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी धन्यवाद देतो,’ असे मोहोळ यांनी सांगितले.





Source link

पुणे रिंग रोडबाबत महत्त्वाची माहिती समोर; आता आणखी 74 गावे समाविष्ट होणार?

पुणे रिंग रोडबाबत महत्त्वाची माहिती समोर; आता आणखी 74 गावे समाविष्ट होणार?


Pune Ring Road: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित असलेल्या रिंग रोड प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रिंग रोड प्रकल्पासाठी नगर विकासाने 5 तालुक्यातील 117 गावांचे नियोजन करण्यास मान्यता दिली होती. या 117 गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू असतानाच MSRDC ने आणखी 74 गावांची मागणी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी 18 सप्टेंबर रोजी नगर विकासाला पत्र लिहून मागणी केली आहे. रिंग रोडच्या संपूर्ण पट्ट्याचे नियोजन एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी ही गावे आवश्यक असल्याचे एमएसआरडीसीने म्हटलं आहे.

MSRDC ने हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे (राजगड) या पाच तालुक्यातील 74 गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. नव्याने होऊ घातलेले पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रिंग रोडजवळ असल्याने आणि सोनोरी येथील रिंग रोड चौकातून विमानतळापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे, असं एमएसआरडीसीने म्हटलं आहे. 

कोणत्या 74 गावांची केलीये मागणी?

कोंढाणपूर, सांगरुण, आर्वी, गौडदरा, कल्याण, तानाजीनगर, मोरदारवाडी, अवसरे, रहाटवडे, शिवपूर, खेड शिवापूर, हवेली तालुक्यातील रामनगर; भोर तालुक्यातील किकवी, ससेवाडी, शिंदेवाडी, कासुर्डी, शिवरे, वेळू, हरिश्चंद्री, कापूरहोळ, दिवळे, कामथडी, केळवडे, नसरापूर, नायगाव, वरवे बुद्रुक व वरवे खुर्द; पुरंदर तालुक्यातील दिवे, पवारवाडी, जाधववाडी, केतकवले, चिवेवाडी, देवरी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, काळेवाडी, सोनोरी, सिंगापूर, झेंडेवाडी, गुन्होली व आंबोडी; मुळशी तालुक्यातील अंबडवेत, भरे, कासार आंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भुकूम, पिरंगुट, आंबेगाव व पौड; तसेच कोंडगाव, आंबवणे, चिंचोळे बुद्रुक, करंजवणे, आडवली, आस्करवाडी, केतकवणे, कोलवाडी, लाशीरगाव, मार्गासनी, खांबवाडी, मांगदरी, विंजर, वांगणी, दापोडे, चिंचाळे खुर्द, बोरावळे, निगडे बुद्रुक, माळगाव, रांजणगाव, कातगाव, रांजणगाव.

दरम्यान, पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या पुण्यातील जांभूळवाडीतील रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या संदर्भात जांभूळवाडीतील स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार विजय शिवतारे यांच्या समवेत पीएमआरडीए यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे. याठिकाणी होणाऱ्या जंक्शनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे जास्तीस जास्त क्षेत्र बाधीत होत असून, शेतकरी भूमिहीन होणार आहेत..तसेच शेतकऱ्यांची घरे सुद्धा बाधित होत आहेत..त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांना बेघर होण्यापलीकडे काही शिल्लक राहत नाही. असं स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळं आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मोजणी करू नये अशी ग्रामस्थांकडून अर्जाद्वारे विनंती करण्यात आली आहे..





Source link

मनसे-शिवसेनेचं जागावाटप अखेर ठरलं? असा असेल फॉर्म्युला, ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्तही ठरला?

मनसे-शिवसेनेचं जागावाटप अखेर ठरलं? असा असेल फॉर्म्युला, ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्तही ठरला?



राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं तोरण 11 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारनंतर बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे



Source link

बिबट्यांची दहशत महिलांची शक्कल, बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळ्यात खिळे असलेले पट्टे

बिबट्यांची दहशत महिलांची शक्कल, बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळ्यात खिळे असलेले पट्टे



गेल्या अनेक दिवसांपासून इथले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत 57 हून अधिक जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय.



Source link

भोरमध्ये भीषण अपघात! डंपर घरावर कोसळल्याने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

भोरमध्ये भीषण अपघात! डंपर घरावर कोसळल्याने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी


Pune Crime News:  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथे रविवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. क्रश सॅंड उतरवताना डंपर उलटून शेजारच्या घरावर कोसळल्याने एका पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Add Zee News as a Preferred Source

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात एमएच-12 केपी-2118 क्रमांकाचा डंपर बांधकाम साईटवर क्रश सॅंड खाली करत होता. त्यावेळी चालक अमरजीत राजभर हा निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने डंपर अचानक असंतुलित होऊन बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळला.

या अपघातात घरात असलेल्या आलोक अशोक कचरे (वय 5) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर घरातील आरती अशोक कचरे (वय 35), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय 17) आणि श्लोक अशोक कचरे (वय 6) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात घराचंही मोठं नुकसान झालं असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर धोंडीबा रामभाऊ कचरे (वय 29, रा. कुरुंगवडी) यांनी डंपर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे राजगड पोलीस ठाण्यात चालक अमरजीत राजभर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालकाला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.

गावात शोककळा

भोर तालुक्यातील या घटनेनंतर कुरुंगवडी गावात वातावरण अत्यंत हळहळजनक झाले आहे. छोट्या आलोकच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

FAQ

1 अपघात नेमका कुठे घडला?

हा दुर्दैवी अपघात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात रविवारी दुपारी घडला.

2 अपघाताचे कारण काय होते?

डंपर चालक अमरजीत राजभर हा क्रश सॅंड उतरवताना निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यामुळे डंपर असंतुलित होऊन बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळला.

3 अपघातात किती लोक जखमी झाले?

या अपघातात एक पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील तिघेजण — आरती अशोक कचरे (३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (१७) आणि श्लोक अशोक कचरे (६) हे गंभीर जखमी झाले आहेत.





Source link

राणेंविरोधात शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कणकवलीत नवं समीकरण जुळणार?

राणेंविरोधात शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कणकवलीत नवं समीकरण जुळणार?



नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केलीय.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp