मोठी बातमी! पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी, अनेक अर्जदार अपात्र ठरणार!
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
Source link
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
Source link
Washim Crime: रुग्णांसाठी डॉक्टर देवदुताप्रमाणे असतो. पण कधीकधी डॉक्टरांच्या चुकीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. वाशिममध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय.
वाशिम च्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये 10 मे 2024 रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नव्हता. त्यानंतर महिलेला थोडा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने सोनोग्राफीद्वारे तपासणी केली. मात्र त्यातही काहीही आढळले नव्हते.
तब्बल 1 वर्षाच्या कालावधीनंतर त्या महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागला. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेला संभाजी नगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या पोटातून एक मॉब काढण्यात आला.
मात्र हा मॉब आम्ही जेव्हा सिझेरियन केलं त्या वेळी पोटात नव्हता.दरम्यान च्या काळात कुठे तरी त्यांनी शस्त्रक्रिया केली असता त्या वेळी तो रहाला असेल.यासाठी आमची कोणती ही चूक नसल्याचं डॉक्टर नरवाडे यांनी सांगितलं.
याप्रकरणी रिसोड येथील खासगी रुग्णल्याचे डॉक्टर अमोल नरवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पीडित महिलेचे पती गणेश काबरा यांनी डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीय. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 26 मे रोजी दाखल झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मान्सून यंदा काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पण आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी चार दिवस पावसाची ओढ कमी झाली आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे प्रवाह सध्या कमकुवत होत असल्यामुळे राज्यभरात पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. खास करुन कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडणार असून, मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
In this pre-monsoon season (March-may), Bharat recorded 42% above average rain. Most of the subdivisions recorded excess rain (blue color). Source: IMD pic.twitter.com/auhKIRm5Vz
— Dr. Vineet Kumar (@vineet_mausam) May 31, 2025
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमन केलं. पावसाने रचलेल्या विक्रमामुळे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र आता प्रवाह मंदावल्याने पुढील चाल धिमी झाली आहे. 12 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस दडी मारणार असल्याच हवामान विभागाने सांगितलं आहे.
पावसाची तीव्रता कमी झाली असून काही जिल्ह्यांना मात्र यलो अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांना काही भागात पेरणी थांबवण्याचा सल्ला दिला आहे. कारण विदर्भात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी असल्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतू 12 जूननंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि इतर काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Sushmita Kaneri Success Story: उद्योग करण्याचा ध्यास घेतलेले अनेकजण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करतात. पुण्यातील सुष्मिता कानेरीची कहाणीदेखील अशीच आहे. तिचं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालं. पण तिला काहीतरी वेगळ करायचं होतं. सुष्मिताच्या कुटुंबातील सदस्य खूपच साधे आहेत. तिच्या पालकांनी नेहमीच कठोर परिश्रम आणि स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी सुष्मिताला शहाणपणाचे निर्णय घेण्यास आणि दयाळू राहण्यास शिकवले. सुष्मिताने 2020 मध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती नोकरी करण्यास तयार झाली. पण शालेय जिवनापासून सामाजिक उद्योजक बनण्याची कल्पना तिच्या मनात होती.
‘मी शाळेत क्लास मॉनिटर होते. मी एकदा निधी संकलन मोहीम चालवत असताना माझ्या मित्रांकडून पैसे गोळा करून ते एका अनाथाश्रमाला दान करण्याचा विचार केला. आम्ही 500 रुपये गोळा केले आणि अनाथाश्रमातील मुलांसाठी स्टेशनरी खरेदी केली. अनेक लोक अडचणींना तोंड देत असल्याचे मला जाणावले. तेव्हापासून मला समाजासाठी काहीतरी करण्याची आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाल्याचे’, सुष्मिता सांगते. या अनुभवामुळे तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्याद्वारे बदल घडवून आणण्याचा विचार मनात आला. मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. तिच्याकडे नोकरीची ऑफर होती पण तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्य एकत्र करून काहीतरी करायचे होते.
2021 मध्ये नोकरी करण्याऐवजी सुष्मिताने ‘ गुलकारी’ नावाचा क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. त्यांचा उद्देश देणग्यांचा मागोवा घेणे आणि देणग्यांचा काय परिणाम होतो हे हे पाहणे हा होता. या उपक्रमामुळे लोकांना देणगी देण्याची संधी मिळाली पण फक्त देणगी देणे पुरेसे नाही, हे सुष्मिताच्या लक्षात आले. फक्त पैसे दान केल्याने काहीही होणार नाही. आपल्याला असे मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे लोक स्वावलंबी बनू शकतील आणि आयुष्यभर कमाई करू शकतील, हे माझ्या लक्षात आल्याचे सुष्मिका सांगते. यानंतर सुष्मिताने उपजीविकेवर आधारित क्राउडफंडिंगकडे लक्ष वळवले. गरजू लोकांना कायमस्वरूपी कमाईची संधी मिळू शकेल अशा मार्गांचा शोध तिने सुरू केला. भारतातील लुप्त होत चाललेल्या कलेकडे तिने लक्ष दिले.
2021 मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. ती तेलंगणाला गेली आणि तिथल्या निर्मल कलेच्या कलाकारांना भेटली. ही कला लाकडावर बनवली जाते आणि चित्रकलेच्या माध्यमातून कथा सांगितल्या जातात. ‘कलाकार अनेक पिढ्यांपासून ही कला साकारत आहेत. पण कोणालाही त्यांची कला आवडत नव्हती. त्यामुळे कलाकार निराश झाले. आपल्या कष्टांना योग्य किंमत मिळत नाही, असे त्यांना वाटल्याचे सुष्मिता सांगते.
माझ्या मुलाला ही कला शिकवशील का? असे मी त्यातील एकाला विचारले तेव्हा तो रागावला. तुमच्या मुलाला नोकरी शोधण्यास सांगा, असा सल्ला त्याने दिला. आपल्याला या पारंपारिक कला जतन करायच्या आहेत आणि कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची संधी द्यायच्या आहेत, याची त्या क्षणी जाणिव झाल्याचे सुष्मिताने सांगितले.
निर्मल कलाच्या कलाकारांच्या अडचणी पाहून सुष्मिता खूप दुःखी झाली. तिने आणखी एक वर्ष देशभर प्रवास केला आणि इतर कलाकारांना भेटली. त्यानंतर तिने एप्रिल 2023 मध्ये “गुलकारी” सुरू केली. हे एक असे व्यासपीठ आहे जे कलाकारांना ग्राहकांशी जोडते. एकत्र कला निर्माण करते आणि लुप्त होत चाललेल्या कलेबद्दल जागरूकता पसरवते. तसेच त्या माध्यमातून कलाकारांना शाश्वत कमाई करण्यास मदत होते. पारंपारिक कलेला आदर आणि मान्यता देणे हा गुलकारीचा उद्देश असल्याचे सुष्मिता सांगते.
गुलकारी पर्यावरणपूरक पॅकेजिंग वापरते. नाजूक उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी ते बबल रॅपऐवजी भुसासारख्या गोष्टी ते वापरतात. याशिवाय हस्तकलांची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी कंपनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखतेय. यामुळे ग्राहकांना ते खरे उत्पादने खरेदी करत असल्याचा आत्मविश्वास मिळेल. सुष्मिता भविष्यात गुलकारी आणखी मोठी करण्याचे स्वप्न पाहतेय. तिला समाजावर सकारात्मक परिणाम करायचाय.’आम्हाला कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची, लुप्त होत चाललेली कलाकृती वाचवण्याची आणि जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी द्यायचीय. कलाकृती भारतीय संस्कृतीचा एक भाग राहील, याची आम्हाला खात्री करायची असल्याचे सुष्मिता सांगते.
2024 मध्ये गुलकारीने 4 हजारहून अधिक हस्तकला वस्तू विकल्या. फक्त 2 वर्षांतच त्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. ‘आम्ही 15 कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी केलीय. आम्ही त्यांना उत्पादनेच विकण्यासोबतच त्यांच्यासाठी कार्यशाळादेखील आयोजित करतो. या कार्यशाळांमध्ये कलाकार त्यांची कला समजावून सांगतात आणि त्यासाठी मोफत प्रशिक्षण घेतात, अशी माहिती सुष्मिताने दिली.
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकाराणात पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर गेलेले महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार आहेत. इंडिया आघाडीसोबत जानकर जाणार असल्याची माहिती आहे. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केले. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याचं वारंवार पाहायला मिळाले.आतातर ते नवा घरोबा करण्याच्या तयारीत दिसत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे.
या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादवांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असं जानकर म्हणाले.
दरम्यान आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकार यांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच येतील, ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाही, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत.आता मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात आहे. आता जानकर महायुतीला रामराम करत आहेत. सध्या महायुतीत इतर पक्षांची गर्दी पाहता, युतीला फारसा फरक पडणार नाही. मात्र, आघाडीसोबत गेल्याने महादेव जानकर यांच्या पदरी काय पडेल हे पाहावं लागेल.
Pune Crime News : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर मानले जाते. हजारो तरुण तरुणी शिक्षणानिमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात. होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन पुण्यात राडा झाला आहे. एका महिलेने या संशयिताच्या कानाला चावा घेतला आहे.
पुण्यातील होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने एका व्यक्तीला मारहाण केली. या सुनेने त्याच्या कानाचा चावा घेतला. यात त्याच्या कानाला पाच टाके बसलेत. संबंधित व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात होस्टेलचालकासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेल मधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले.
याबाबत मिलिंद वसंत कोठारी (वय ४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) व त्यांची सुन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करुन घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालविणारे सुरेश विठ्ठल कांबळे आणि त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले.
तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी तपास करीत आहेत.