पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत सुरू होता भलताच प्रकार; बाप-लेकच होते सूत्रधार…
Pune Crime News: पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Source link
Pune Crime News: पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Source link
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झी 24 तास’च्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यादरम्यान त्यांनी आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागील रहस्यही उलगडलं.
Source link
Maharashtra Government New Policy on Fuel: तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलात आणि तुमच्याकडे कागदपत्रं मागण्यात आली तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. वाहनांसंदर्भातील नियमांचं कठोरतेनं पालन केलं जाणार आहे. वाहनचालकांना आता काही ठराविक कागदपत्रांशिवय पेट्रोल मिळणार नाही. हा नियम नेमका काय आहे पाहूयात…
दिवसोंदिवस देशातील वाहनसंख्येबरोबरच राज्यातील वाहनांच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढताना होताना दिसत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच Pollution Under Control अर्थात पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक असतं. पीयूसी नसेल तर पोलीस दंड देखील आकारतात. मात्र असं असतानाही अनेक वाहनचालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेताना ‘नो पीयूसी सर्टिफिकेट, नो इंधन’ धोरण लागू करण्याचं ठरवलं आहे.
महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या या नव्या नियमामुळे वाहनचालकांचे टेन्शन वाढणार आहे. नव्या नियमानुसार रस्त्यावरुन वाहन चालवताना त्या वाहनाचं पात्र पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहनचालकाकडे पीयूसीची प्रत बंधनकारक करण्यात येणार आहे. पीयूसी नसेल तर वाहनचालकांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच ‘नो पीयूसी, नो इंधन’ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचं बोलले होते. नव्या धोरणानुसार, प्रत्येक चालकाला वाहनाचं पात्र आणि सक्रीय पीयूसी प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर दाखवावे लागणार आहे. पीयूसी सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच वाहनचालकांना पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार आहे.
राज्यातील वाहनांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात तर लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं. केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच नाही तर अनेक मध्यम आकाराच्या शहरांमध्येही दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. अनेक जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात धूर निघतो आणि हवा दुषित करतो. पीयूसी बंधनकारक असलं तरी अनेकजण पीयूसी प्रमाणपत्राबद्दल फारसे गंभीर नसतात. पीयूसी न बनवणाऱ्यांबरोबर बनावट पीयूसी बनवून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. या मुळेच कायदा असला तरी प्रदूषण नियंत्रण धोरण केवळ कागदावर मर्यादित असल्याचं आणि प्रत्यक्ष कृतीत दिसून येत नसल्याचं पाहायला मिळतं. कायद्याला बगल देणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानेच हा नवा नियम लागू केला जाणार आहे.
पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाचं पीयूसी तपासून पाहिल्यानंतरच इंधन देईल. सरकार क्यूआर कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टम तयार करणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे. हा डेटा इंटिग्रेस्टेड ऑनलाइन सिस्टमशी जोडला जाणार आहे. असं केल्याने वाहनांबद्दल सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध होईल. या माध्यमातून बनावट पीयूसीच्या समस्येला आळा बसण्यास मदत होणार आहे.
नवीन धोरण हे केवळ वाहनचालकांना शिक्षा देण्यासाठी नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदुषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे. हा नवा नियम लागू करण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवली जाईल. वाहनचालकांना वाहनांचं पीयूसी बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे. पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशित्रण दिले जाईल. हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केलं जाणार असून जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यामध्ये हे नवं धोरण संपूर्ण राज्यात लागू केलं जाणार आहे.
Ladaki Bahin become Lakhpati Didi: महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणी’ 1500 रुपयाचा हफ्ता 2100 रुपये कधी होणार? याची वाट पाहतायत. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलीय. लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पूर्ण न झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर महत्वाचे विधान केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यात बोलत असताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे भाष्य केले. सुरुवातीला त्यांनी 25 टक्के अपघाताच प्रमाण कमी झाल्याने वर्धावासियांचे आभार मानले. परिवहन मंत्र्याची वर्धा जन्मभूमी आहे. तुम्ही त्यांना 50 बसेस मांगीतल्या. तुम्ही 100 बस मांगीतल्या असत्या तरी त्यांनी दिल्या असत्या. कारण जन्मभूमीपेक्षा काहीच महत्वाचं नसत. तुमच्या आमदारांनी कंजूसी केलीय, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन ठेवायचं नाहीय. तर त्यांना लखपती दीदी बनवायच आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण किंवा विरोधक सांगतात. पण सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय. हे पंधराशे रुपयेदेखील देण्याची यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कमदेखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवळ म्हणाले.
Maharashtra 10th SSC Result 2025: बारावीच्या निकाल लागला असून आता विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत आहे. अशातच महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे.
Source link
Chhatrapati Shivaji Maharaj statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसंच दिपक केसरकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते..
जय शिवाजी जय भवानी
LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन
दु. २.४० वा. | ११-५-२०२५ सिंधुदुर्ग.#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/BfZ7gTfRUl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2025
LIVE मालवण, सिंधुदुर्ग
11-05-2025छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन – पूजन – लाईव्ह
https://t.co/sZxk9j62Ej— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 11, 2025
मालवण राजकोट येथे झालेल्या अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे उपस्थित होते.
विक्रमी वेळेत हा पुतळा तयार झालाय. यासाठी मी सार्वजनिक विभागाचे मी अभिनंदन करतोयस असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुतार यांनी अतिशय उत्तम पुतळा तयार केलाय. त्यांच्यासोबत आयआयटी मुंबई डिझायनर, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते. तौक्ते, फयान सारख्या वादळाच्या तीव्रतेचा अभ्यास करुन त्यापेक्षाही मोठे वादळ आले तरी पुतळ्याला काही होणार नाही, असे डिझाइन तयार करणयात आलाय. देशातील महाराजांचा सर्वात मोठा पुतळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वेळेत आम्ही पुन्हा प्रस्थापित केलाय. आजुबाजूचा परिसरदेखील तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जेवढी जागा प्राप्त होईल, तसे डिझाइन तयार केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.