उमेश परब, झी मीडिया, देवगड : सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. देवगडमधील नारिंगरे येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे येथे आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटून त्याची धडक एसटी बसला बसली. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात रिक्षाचा चकाचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगरे इथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. देवगड तालुक्यातील नारिंगरे मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने एसटी महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे इथं आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा हा थेट एसटी बसवर धडकला.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात रिक्षाचा चकाच्चूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात घटनास्थळावर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप बचावला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray alliance Shivsena Foundation Day : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या रंगली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबात सकारात्मक चर्चा देखील सुरु आहेत.अशातच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत मेळाव्यता बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे शिवसेना युतीबाबत एक सूचक वक्तव्य केले. काय होणार की नाही ते कळेल… जे राज्याच्या मनात आहे ते मी करेन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक विधान केले आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होऊ नये यासाठी मालकाचे नोकर गाठीभेटी घेतायत. मुंबईचा ताबा आम्ही घेणारच आहोत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक आहे. जनतेच्या मनात आहे तेच करणार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात एक मोठं विधान केलंय. मराठी माणसांची शक्ती एकत्र येत असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. तसंच ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माजी नगरसेवकांना विचारला. यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईत युतीसंदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली.
युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.
दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटाच्या काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 100 टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे. विशेषतः यांत भाजप आक्रमक दिसून येत आहे.
Kolhapur Crime News : पुरोगामी, प्रगत कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार घडला. रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली. .या अघोरी प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र, अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला होता. यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं. मात्र, पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम आलेचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत.त्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून पिडीत महिलेला झपाटलेला भूत काढण्याचा विधी केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Nitesh Rane On Shivsena UBT Vasant More Aghori Pooja Claims : भरत गोगावलेंनी निवडणूक जिंकण्यासाठी बगलामुखी यज्ञ केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. वसंत मोरेंनी या संदर्भात एक व्हिडिओच समोर आणला होता. मात्र या आरोपाचं ठाकरेंच्या शिवसेनेवर बुमरँग होताना दिसतंय. कारण अघोरी पूजेवरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवरच आरोप केलेत.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर आरोप केला होता. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं भरत गोगावलेंवर पलटवार करत अघोरी पूजेचा एक व्हिडीओ समोर आणला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी हा गोगावलेंचा हा व्हिडिओ समोर आणला होता. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या अघोरी पूजेच्या आरोपाचं बुमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय. या वादात मंत्री नितेश राणेंनी उडी घेतलीय. अघोरी पूजा काय असते हे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर विचारा असं म्हणत नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलीय. तर अघोरीपूजेत उद्धव ठाकरे तज्ज्ञ असल्याचं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.
काय म्हणाले नितेश राणे?
मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर किती अघोरी पुजा सुरू होत्या हे मी तारखेसह सांगू शकतो. कॅलेंडर सुद्धा देऊ शकतो कधी कधी काय काय कापलं जात आणि मीठ कुठ ठेवलं जात. कर्जतच्या फार्महाऊसमधे जमिनीखाली काय काय पुरलं आहे हे सुद्धा सांगू शकतो.
दरम्यान अघोरी विद्येचा प्रयोग फक्त कलानगरमध्येच केला जातो असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडीओ समोर आणला होता. या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केला होता. राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजा-यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता.
वसंत मोर नेमकं काय म्हणाले?
वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. हे आरोप करताना मोरे यांनी काही व्हिडीओदेखील समोर आणले आहेत. भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. त्यासाठी गोगावले यांनी गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणले होते. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही अघोरी पूजा केली होती, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय. हा आरोप करताना भरत गोगावले यांनी काही व्हिडीओही समोर आणले आहेत.
मंत्री भरत गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप करून ठाकरेंच्या शिवसेनेनं खळबळ उडवून दिली होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेवरच त्या आरोपाचं बुंमरँग झालंय. आणि अघोरी पूजेचे आरोप थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला काय प्रत्यूत्तर दिलं जातंय तो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.