Hindi Compulsory: मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली आहे. दादरच्या IES शाळेच्या बाहेर हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. आम्ही सरळ मार्गाने आंदोलन करत आहोत तोपर्यत सरकारने तोपर्यंत दखल Iघ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे आव्हान यावेळी संदीप देशपांडे यांनी काढले.
सह्यांच्या या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. महाराष्ट्रात 2 भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. सध्या सकारात्मक तसा जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याचा रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरण सरकारला कठीण होत असेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे. त्यांनी ते केला पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याचेही देशपांडे म्हणाले.
आमदार संग्राम जगताप डोक्यावर पडलेत का? महाराष्ट्रात उर्दू चालते असा मी कधी म्हणालो? डोक्यावर पडलाय का संग्राम? कुठे उर्दू शिकवली जाते विचारात शाळांमध्ये शिकवली जाते का? त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये ती शिकवली जात असेल कदाचित, असा टोला त्यांनी लगावला.
हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेय. सर्व मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त नऊ वाजता बोलबच्चगिरी करून काही होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा असे आवाहन त्यांनी केले.
अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली
सर्व षंढ लोक सरकारमध्ये बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? असा प्रश्न यावेळी संदीप देशपांडे यांनी विचारला. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचादेखील समाचार घेतला. त्यांना पडलेली कानाखाली ते विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्राचं दुर्दैव
सरकारला अजूनही हिंदी बद्दल का प्रेम आहे ? कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे. हेच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
Thackeray Brothers Alliance : मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये द्वंद सुरू झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले होते, तसंच युतीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळल्याची चित्र होतं. मात्र, याच युतीच्या चर्चांवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरून संदीप देशपांडेंनी राऊतांवर टीकास्त्र डागलंय. ताटातल्या चमच्यांनी चमच्याचं काम करावं असा खोचक टोला देशपांडेंनी राऊतांना लगावला. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी देखील संदीप देशपांडेंना खडसावलंय. (Thackeray Brothers Alliance shivsena MNS Raj Thackera UddhavThackeray Maharashtra political drama)
युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून कोमणताही प्रस्ताव आला नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तसंच राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला होता. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी संदीप देशपांडेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केलीय.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच मी करणार असं मोठं विधान त्यांनी केलं . मात्र, त्यांच्या या विधावरूनही संदीप देशपांडेंनी टीका केलीय. 2014 विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे भाजपसोबत का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कमालीची सकारात्मक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसंदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे मनसेकडून दुरावा निर्माण करणारी विधान सुरू असल्याची चर्चा आहे. याचं कारण आहे दोन दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेले सवाल.
युतीसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतलीय. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे नेतेही सकारात्मक दिसताय. मात्र, दुसरीकडे मनसे नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
Bhaskar Jadhav on Shivsena Is Becaming Congress : शिवसेनेची काँग्रेस झाली असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केलं होतं. त्यांनी 14 जानेवारी 2025 मध्ये चिपळूनमध्ये हे वक्तव्य केलं होतं त्यावरच हा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी त्यांनी केलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली हे वक्तव्य करण्याचं कारण सांगितलं.
भास्कर जाधव त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, ‘ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं. पण हे विधान अर्धवट दाखवण्यात आलं. पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती? त्याचं स्ट्रकचर काय होतं? आणि आताचं शिवसेनेचं स्ट्रकरच बनत चाललंय हा फरक सांगत असताना मी हे विधान केलं. ही गोष्ट खरी आहे.’
शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय?
पुढे शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय? असा सवाल करताच भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं स्ट्रकचर सांगत म्हणाले, ‘पूर्वी शिवसेनेचं स्ट्रकचर होतं. शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची कार्यप्रणाली होती. आज आपण जर पाहिलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं तालुका समन्वय, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन. एका पदात्या भोवती आपण किती पद निर्माण करणार आहोत, जी कॉंग्रेसची पद्धत होती. कॉंग्रेसची पद्धत अशीच आहे. कोणी रुसला-रागवला की हा सरचिटणीस, तो उप-सरचिटणीस, तो उपाध्यक्ष. शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेचा एक प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटा प्रमुखाप्रमाणे असायचा. एक उपविभाग प्रमुख पंचायतसमिती गणाप्रमाणे असायचा. जेणे करून त्याचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं असतं. काहीही झालं तरी ते त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपल्या कार्यक्षेत्रात रिझल्ट आणणं त्याच्यावर बंधन कारक असतं. आता एकाच कार्यक्षेत्रात 10 पदाधिकारी नेमले तर कोणाची जबाबदारी कोणावर द्यायची. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ज्या प्रमाणे फक्त खूश करण्यासाठी पद दिलं जातं होतं, तसं शिवसेनेत दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भांडणात होता आणि आजही आहे.’
शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट?
शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट? यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की ‘प्रत्येक पक्षाची विचारधारणा ही वेगळी आहे. प्रत्येक पक्षाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. कॉंग्रेसची वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आहे. आघाडी, युती हा विषय सोडून द्या, पण शिवसेनेची कार्यप्रणाली ही शिवसेनेप्रमाणेच राहिले पाहिजे. हे माझं मत आहे.’
नितेश महाजन, झी २४ तास, जालना : जालन्यातील अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात आतापर्यंत तब्बल 40 कोटी रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशीतून समोर आलाय.या घोटाळ्यात तलाठी,मंडळाधिकारी,कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अतिवृष्टी बाधित लाखो शेतकऱ्यांचं पीक नुकसान अनुदान बोगस खात्यात वळवून हडपलंय.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 63 हजार शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2024 मधील पीक नुकसानीचं अनुदान रखडल्याची चर्चा आहे
– 63 हजार शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडलं – घोटाळ्यामुळे अनुदान वाटप रखडलं? – अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झालाय. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 2022 ते 2024 या दोन वर्षात तलाठी,कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी तब्बल 40 कोटींचा प्रशासन आणि राज्य सरकारला चुना लावलाय. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदानापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळवून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय. या समितीनं आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातील चौकशी केलीय. अजून 6 तालुक्यातील चौकशी बाकी असल्यानं प्रशासनानं शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी देण्यात येणारं अनुदान थांबवलंय. यामुळे शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येताहेत. अनुदान वाटपातील या घोटाळ्यामुळे अनेक शेतक-यांचं नाहक नुकसान झालंय.
– सप्टेंबर 2024 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानापोटी राज्य सरकारकडून 412 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं – 2 लाख 57 हजार 297 शेतकऱ्यांना जे अनुदान वाटप करायचं होतं – मात्र यापैकी केवळ 1 लाख 94 हजार 113 शेतकऱ्यांनाच अनुदान वाटप झालं – 63 हजार 184 शेतकऱ्यांना पीक नुकसान अनुदान मिळालंच नाही – अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी 15 हजार 31 शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे.
आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 17 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लार्कना पीक नुकसान अनुदानात घोटाळा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. अतिवृष्टी होऊन आता 10 महिने उलटलेत…पण 63 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही पीक नुकसानीचं अनुदान नाही. त्यामुळे प्रशासनाबरोबरच राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं अनुदान शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना वाटप करावं एवढीच या शेतकऱ्यांची मागणी आहे.
HSRP Number Plate : 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी राज्य सरकारने 30 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना हे टेंडर दिले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी कार आणि बाईक चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, वाहनांची संख्या आणि वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्य सरकारने या पाट्या बसविण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ आता 15 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
जर आपण नवीन दिलेल्या मुदतवाढीचा विचार केला तर दररोज 3 लाख 16 हजार 71 वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे. काही ठिकाणी तर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलेल्या मुदतीमध्ये या पाट्या लावता येणार नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे. मात्र, मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वाहनधारकांनी अजूनही पाट्या लावल्याचं दिसून येत नाही. शासनाने या आधी देखील दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु अजूनही काही वाहनधारक नंबर प्लेट बसवत नसल्याचं दिसून येत आहे.
HSRP म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही खास प्रकारची नंबर प्लेट आहे. जी बनावट नंबर प्लेट्स व वाहन चोरी रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पूर्वी विकली गेलेली सर्व वाहने ज्यामध्ये दुचाकी, चारचाकीसह इतर सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.
सरकारने दिलेल्या मुदतीनंतर जर वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवावी असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यात किती दर?
यामध्ये दुचाकीसाठी इतर राज्यामध्ये जीएसटी वगळून 420 ते 480 रुपये इतका दर आहे. तर राज्यात हाच दर 450 रुपये इतका आहे. तीनचाकी वाहनांसाठी इतर राज्यात 450 ते 550 इतका दर आहे तर महाराष्ट्रात हाच दर 500 रुपये इतका आहे. चारचाकी वाहनासाठी इतर राज्यांमध्ये 690 ते 800 रुपये इतका दर आहे. हाच दर महाराष्ट्रात जीएटसी वगळून 745 रुपये इतका आहे.
उमेश परब, झी मीडिया, देवगड : सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. देवगडमधील नारिंगरे येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे येथे आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटून त्याची धडक एसटी बसला बसली. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात रिक्षाचा चकाचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगरे इथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. देवगड तालुक्यातील नारिंगरे मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने एसटी महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे इथं आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा हा थेट एसटी बसवर धडकला.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात रिक्षाचा चकाच्चूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात घटनास्थळावर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप बचावला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.