भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निवळ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडणार?

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निवळ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडणार?


Maharashtra Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतावदी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’  सुरु केले आहे. भारत पाक यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निवळ्यानंतर महाराष्ट्रात राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडणार आहे. 

युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे.  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे जाणवते. आता शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी ही माहिती दिली. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे. ते एकत्र यावेत यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनीही तोच सूर आळवला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ओझरती चर्चा झाली आहे. तसेच उप मुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या मतदारसंघातील कामा बाबत सकारात्मक आहेत. त्यांच्याकडून कोणतीही आड काठी होत नाही. ते सकारात्मक संकेत देत आहेत. तर आपणही तशी भूमिका घ्यावी असे आमच्या वरिष्ठांना सांगितले आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर कदाचित याबाबत आमदारांची बैठक होऊन याबाबत निर्णय होईल अशी माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. 

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ?…राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात.. याला निमित्त ठरलंय शरद पवारांचं मोठं वक्तव्य… आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय… इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय.. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय… पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात.





Source link

कर्जत येथे सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर समोर, उच्चशिक्षित तरुण अन् मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेस….

कर्जत येथे सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर समोर, उच्चशिक्षित तरुण अन् मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेस….


Karjat Crime News: कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ 16 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वे ट्रॅकजवळ आढळलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत अवघड असतानाही केवळ सुटकेसच्या आधारावर नेरळ आणि कर्जत पोलिसांनी तपास सुरू ठेवत अखेर खूनाच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू (वय 34) रापताडू, आंध्रप्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून आरोपी हे उच्चशिक्षित असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या तपासामध्ये रायगड पोलिसांच्या विशेष तुकड्या तपास करीत असताना नेरळ पोलिसांना एक धागा सापडला. नेरळ पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून बेंगळुरू येथून दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या मेल गाड्यांचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासले. या तपासात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेल्या मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये (ता.१५) एक संशयित जोडपं गुलाबी बॅग घेऊन जाताना दिसले. त्यांनी कोणत्या डब्यात प्रवास केला याची शहानिशा करत बेंगळुरू स्थानकावर बॅग नसलेल्या अवस्थेतील त्याच जोडप्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले होते. 

बुकिंग तिकीटावरील फोन नंबर आणि लोकेशनच्या आधारे नेरळ पोलिसांनी बेंगळुरूयेथील एका लॉजवर धाड टाकून आरोपी व्हि. विजयकुमार व्यंकटेश (26) चित्तूर, आंध्रप्रदेश आणि टी यशस्विनी राजा वय 24 तिरुपती, आंध्रप्रदेश या दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींना 16 मेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुटकेसमधील मृतदेह कोणाचा हे प्रकरण उलगडलं आहे.

दोघा आरोपींनीच धनलक्ष्मी ऊर्फ बिंदू या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून रेल्वे ट्रॅकजवळ टाकल्याचे उघड झाले. हे तिघंही मूळचे आंध्रप्रदेशातील असून, सध्या मुंबई आणि बेंगळुरू येथे नोकरीच्या शोधात होते. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश होता, खून पूर्वनियोजित होता का, हे पोलिस तपासातून पुढे येणार आहे.





Source link

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट


उन्हाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पावासाने हजेरी लावली असून राज्यभरात गारठा पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी दुपारी 3 ते 4.30 पर्यंत पावसाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावले. शहराचा पारा 32 अंशापर्यंत खाली उतरला असून अनेक ठिकाणी गारठा पडला आहे. 

मनमाड शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढलेला असताना रात्री 8 वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशीरा पर्यंत भाजी विक्रेत्यांचे आणि नागरिकांचे हाल झाले आहेत. 

अचानक जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. हवेत गारवा निर्मान झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जोरदार वारा पाऊस यामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. 

तसेच नाशिक शहरात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून तेथेही अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पाऊस आल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे होणार नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस यल्लो अलर्ट दिला आहे. 

देशभरात पाच चक्रीवादळे निर्माण झाल्यानंतर, भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळांचा इशारा जारी केला आहे. ११ मे पर्यंत मध्य आणि वायव्य भारतात पाऊस, वादळ आणि विजांचा अंदाज आहे.

पुढील काही दिवसांत राज्य अस्थिर हवामानासाठी सज्ज होत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत मुंबईत पाऊस आणि गडगडाटी वादळे होतील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

दिल्लीमध्ये गुरुवारी होणाऱ्या पावसासाठी आयएमडीने पिवळा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये वीज आणि गडगडाटी वादळे येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत, देशाच्या मध्य आणि वायव्य भागात पाऊस आणि गडगडाटी वादळे सुरू राहतील, तर पूर्व भारतात गुरुवारी नवीन उष्णतेची लाट सुरू होऊ शकते असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

या आठवड्यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. ११ मे पर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.





Source link

सुट्टी असो वा आणखी काही, समुद्रकिनारी जाणं टाळा; नौदलाकडून नागरिकांसह मच्छिमारांना स्पष्ट इशारा

सुट्टी असो वा आणखी काही, समुद्रकिनारी जाणं टाळा; नौदलाकडून नागरिकांसह मच्छिमारांना स्पष्ट इशारा


India Pakistan War : भारत आणि पाकिस्तामध्ये पेटलेला संघर्ष दर दिवसागणिक आणखी धुमसताना दिसत असतानाच आता या दोन्ही देशांमध्ये पडणारी ठिणगी वण्व्याचं रुप धारण करणार याच भीतीनं अनेकांना धडकी भरली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागातील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कडाडून निषेध करत भारतानं ऑपरेशन सिंधूची हाक देत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले. 

भारताच्या या कारवाईवर आता पाकिस्ताननंही प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला सुरू केला. मात्र पाकिस्तानचे सर्व हल्ले आले त्याच वेगानं भारती. सैन्यदलानं प्रचंड ताकदीनं परतवून लावले. पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं उध्वस्त केले, तर या देशाची एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा नष्ट करण्यात आली. इतकं होऊनही पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसून आता 26/11 प्रमाणं सागरी मार्गानं घुसखोरी करण्याचा डाव साधण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांमार्फत मिळत आहे. 

26/11 प्रमाणे समुद्रातून घुसखोरीचा धोका; मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना

पाककडून घुसखोरीसाठी सागरी मार्गाची निवड केली जाण्याचा धोका असतानाच नुकतीच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक पार पडली. नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं समुद्रकिनाऱ्यांनजीक न जाण्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला असून, लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. शिवाय सध्या पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती. 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी केला आहे. 

कोकणातही सावधगिरी 

फक्त मुंबईच नव्हे, कोकण आणि देशातील इतरही महत्त्वाच्या किनाऱ्यांच्या बाबतीत सध्या सतर्कता बाळगली जात आहे. कोकणात किनारी भागात संरक्षण दलाच्या हालचाली वाढल्या असून इथं कडेकोट बंदोबस्त ठेवम्यात आला आहे. शिवाय कोणत्याही संशयित बोटी किंवा हालचाली दिसल्यास पोलिसांना याची तातडीनं माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 





Source link

राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?

राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?



पाकिस्तानात तिकडे भारताने जोरदार ड्रोन हल्ले सुरू केलेले असतानाच इकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलिनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे या हवा देताहेत दस्तूर खुद्द शरद पवार. विश्वास बसत नाही ना मग. मग बघा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. 



Source link

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस


Maharashtra Weather News : अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दुसरीकडे तामिळनाडूनपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून, त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं. 

हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे. 

एकंदरच ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली असून, हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काही भागात जोरदार सरींची शक्यता अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे. 

कधीपर्यंत टिकून राहणार हे पावसाळी वातावरण? 

राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अधिक वाचा : Operation Sindoor : भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार… 

सह मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp