'85 व्या वर्षी कशाला निवडणूक लढायची? आता पायजमा…'; अजित पवारांचा BJP नेत्याला टोला

'85 व्या वर्षी कशाला निवडणूक लढायची? आता पायजमा…'; अजित पवारांचा BJP नेत्याला टोला


Ajit Pawar Malegaon Speech: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत. सोमवारी अजित पवारांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांनी नीरावागज येथील एका सभेत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यावर वयावरुन निशाणा साधला. आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करतानाच अजित पवारांनी विरोधात उभ्या असलेल्या भाजपाचा नेता आणि माजी चेअरमनवर निशाणा साधला. 

संविधानाने अधिकार दिलाय मला: अजित पवार

“माझी चेअरमन कारकीर्द बारामतीकर यांना दाखवायची आहे. माझ्यावर मुख्यमंत्री व्हायला निघाला असा आरोप होतोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने उभा राहण्याचा अधिकार दिलाय मला,” असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या उमेदवारीची पाठराखण केली. पुढे बोलताना अजित पवारांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच भाजपा नेते चंद्रराव तावरेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु असून या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि चंद्रराव तावरेंच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे.

85 वय झाल्याची करुन दिली आठवण

“85 वर्ष वय झालंय आता. विसमरण होतंय,” असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. “इथेनॉल 5 रुपये कमी दराने विकण्याचा प्रयत्न झाला. तब्बल अडीच कोटी रुपये वाचले,” असं म्हणत रंजन तावरे यांच्यावर अजित पवार यांनी भाषणातून गंभीर आरोप केला. “महाराष्ट्र राज्यात चांगल्या खरेदी विक्री संघ चालले आहेत त्यात बारामती खरेदी विक्री संघाचे नाव आहे,” असं म्हणत अजित पवारांनी काम करुन दाखवण्याची इच्छा असल्याचं सूचित केलं. “माझ्या शब्दाला राज्यात किंमत आहे. बारामती एसटी स्टँड सारखे देशात एसटी स्टँड नाही,” असं म्हणत अजित पवारांनी आपल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. 

नक्की वाचा >> ‘माझी बायको म्हणते कुठून याची इतकी…’; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर पिकला एकच हशा, पाहा Video

पायजमा सोडला आणि लुंगी घातली

“(निवडणुकीला) उभं राहण्याचे अधिकार सर्वांना आहे. मात्र 85 वयात कशाला? विसमरण होतंय तब्येत साथ देत नाही. आता पायजमा सोडला आणि लुंगी घातली,” अशी शा‍ब्दिक टोलवा टोलवी अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता केली. 

अजित पवारांकडून संस्थाचा गैरवापर होत असल्याचा आरोप 

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना तावरेंनी अजित पवारांवर टीका केलेली. शरद पवारांनी सांगितल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही मदत केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात आले. मात्र आता ते निवडणुकीच्या काळात सहकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या घरात अनेक कारखान्यांचे आणि विविध प्रशासकीय कर्मचारी आहेत. त्यांचा ते गैरवापर करतात, असा आरोप तावरेंनी केलेला. त्यालाच वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी जाहीर भाषणातून उत्तर दिलं आहे.





Source link

तुळजाभवानी देवीच्या शिल्पावरून वाद; अष्टभुजा भारतमातेच्या रुपात

तुळजाभवानी देवीच्या शिल्पावरून वाद; अष्टभुजा भारतमातेच्या रुपात


ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं भव्यदिव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे. 108 फूट उंच या भव्य शिल्पाच्या रुपावरून तुळजापुरात वाद निर्माण झाला आहे. हे शिल्प नेमकं कसं असावं यावर मतमतांतरं का आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

तुळजाभवानी मंदिर परिसरात 108 फुटी भव्यदिव्य ऐतिहासिक शिल्प उभारण्यात येणार आहे. या शिल्पाचं संकल्पचित्र प्रकाशित झालं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. तुळजा भवानी देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केला आहे. मंदिर संस्थानने जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी दोन भुजांमध्ये तलवार देताना आहे..  आता हाच मुद्दा वादाचा मुद्दा ठरला आहे. 

या वादात आणखीन पेट आणणारा मुद्दा ठरला तो मंदिर संस्थानने पुजारी मंडळांना पाठवलेलं पत्र. या पत्रात आई तुळजाभवानीला भारतमाता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हटलं आहे. मात्र इतिहासात देवी तुळजाभवानीला भारतमाता म्हणून कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्र देखील वादग्रस्त ठरलं आहे

तुळजापूरमध्ये साकार होत असलेल्या या भव्यदिव्य शिल्पाबाबत काही मुद्द्यांवर वाद निर्माण झाला आहे. तुळजाभवानीच्या भारतमाता या रुपाचा वाद आता मुंबईपर्यंत गेला आहे. १७ जूनला यासंदर्भात मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. तर खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही तुळजाभवानीच्या होऊ घातलेल्या शिल्पाच्या अष्टभुजा रूपावरून नाराजी व्यक्त केली आहे. 

तुळजाभवानीचं शिल्प मूळ ऐतिहासिक स्वरूपातच असलं पाहिजे. देविच्या अष्टभुजा रूपाला  विरोध असल्याचं शिल्पाला विरोध असणा-यांचं म्हणणं आहे. इतिहासाशी छेडछाड नको… भवानी तलवार देतानाच मूळ शिल्प तयार करा, आम्ही यासाठी लढा देणार…”  तर तुळजाभवानीच्या रुपाबाबात निर्माण झालेल्या वादावर मंदिर संस्थानचे विश्वस्त व भाजपा आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. कला संचालनालयाचं म्हणणं अंतिम असेल , आणि हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल, आणि यासाठी बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनीच्या भारतमाता रुपाबाबत आता मुंबईतल्या बैठकीत चर्चा होणार आहे. संकल्पचित्रात प्रकाशित झाल्याप्रमाणे तुळजाभवानीचं शिल्प साकारणार असेल तर “तुळजाभवानी शिल्पाचा वाद चिघळण्याची चिन्हं दिसतातय. त्यामुळे या शिल्पचित्रातील तुळजाभवानीच्या शिल्पाबाबतचं भवितव्य या बैठकीतच स्पष्ट होणार आहे. 





Source link

MSRTC चा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात मोठा दिलासा; आता शाळा-कॉलेजातच…

MSRTC चा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात मोठा दिलासा; आता शाळा-कॉलेजातच…



New Scheme For Students: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.



Source link

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये मोठी दुर्घटना; शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये मोठी दुर्घटना; शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले



माथेरानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.   शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले आहेत. 



Source link

Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी…'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं …'

Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी…'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं …'



Bharat Gogavale on Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. 



Source link

सेना-मनसेचं एकत्र सेलिब्रेशन! फडणवीस राज यांना मोजक्या शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, 'महाराष्ट्र…'

सेना-मनसेचं एकत्र सेलिब्रेशन! फडणवीस राज यांना मोजक्या शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, 'महाराष्ट्र…'


Raj Thackeray Birthday Devendra Fadnavis Message: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाबरोबर बाहेर गेले असून ते आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. एकीकडे राज यांचा वाढदिवस असतानाच दुसरीकडे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आहे. आदित्य ठाकरेंचा आज 35 वा वाढदिवस आहे. मागील काही आठवड्यांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा असतानाच अनेक ठिकाणी या काका-पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून बाजूबाजूला फोटो छापून मनसे आणि सेनेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचं दिसून येत आहे. मात्र या साऱ्या चर्चा आणि सेलिब्रेशनदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छाही चर्चेचा विषय ठरत आहेत. 

मनसेच्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या नेत्या

मुंबईत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित मनसे आणि ठाकरे गटाची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरतोय. मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. या रक्तदान शिबिरात मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित आहेत. एकीकडे मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना स्थानिक पाटील नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.

अचानक राज-फडणवीस भेट

मात्र वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच राज यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे बंधु पुन्हा एकत्र येणार की युती फिस्कटणार अशी चर्चा असताना आज फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

फडणवीसांचा खास मेसेज आणि ग्रिटींग

फडणवीस यांनी सकाळी पावणेअकरा वाजता राज ठाकरेंसाठी एक खास मेसेज आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. फडणवीस यांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंचा फोटो असलेलं खास शुभेच्छापत्र शेअर करण्यात आलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये राज यांना फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत नाहीत राज ठाकरे

11 जून रोजीच राज ठाकरेंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन आपण वाढदिसवाच्या दिवशी मुंबईत नसू असं सांगितलं होतं. येत्या 14 जून 2025 रोजी म्हणजेच वाढदिवसाला आपली भेट होणं शक्य नाही. कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मी वाढदिवस साजरा करणार नाहीय का? काही विशेष कारण आहे का? तर असं कोणतचं  कारण नाहीय. याचे कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहनही त्यांनी केलं होतं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp