महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ; मुलं, नातवंड अन् वंशज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ; मुलं, नातवंड अन् वंशज


प्रणव पोळेकर, तुषार तपासे, झी मीडिया :  महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण आहे… यातलंच एक रत्न आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदलितांचा उद्धार केला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्यांनी फक्त एका जातीसमुहाचा उद्धार केला असं नाही. गावगाड्यातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. समाजाचा प्रेरणास्तंभ म्हणून त्यांच्या कार्याकडं पाहिलं जातं. कोट्यवधी लोकांची कुळं उद्धरणा-या या महामानवाचं मूळ गाव कोणतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावातला असला तरी त्यांचं मूळ गाव कोकणात आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे महामानवाचं मूळ गाव. 

बाबासाहेबांचा गाव

आंबडवे गाव, कोकणातल्या कोणत्याही सामान्य गावाप्रमाणं हे गाव आहे. गावात कौलारु साधी घरं पाहायला मिळतात. शेसव्वाशे उंब-याचं गाव बाबासाहेबांचं मूळ सांगतं. आंबडवे गावात आजही बाबासाहेबांची भावकी नांदते. बाबासाहेब जगभरासाठी आंबेडकर म्हणून ओळखले जात असले तरी या गावात त्यांच्या नावामागं वेगळं आडनाव आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनावही वेगळं आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ आहे. बाबासाहेबांचे भावकीतले नातू पणतू आजही इथं बाबासाहेबांचा वारसा अभिमानानं सांगतात. 

बाबासाहेबांचे आजोबा

 बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे आंबडवे गावात राहायचे त्यांची हयात याच गावात गेली.  सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचा जन्म  1848 साली झाला.  रामजीबाबा 1866 साली ब्रिटीशांच्या पलटणीत नोकरीवर रुजू झाले. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनी नोकरीधंद्याच्या निमित्तानं आंबडवे गाव सोडलं… नोकरीनिमित्त ते मध्य प्रदेशातील महू, सातारा असं फिरत राहिले.
रामजीबाबांनी गावची नाळ कधीच तुटू दिली नाही. आंबडवे गावात आज जिथं बाबासाहेबांचं स्मारक आहे तिथं बाबासाहेबांचं कोकणी पद्धतीचं कौलारु घर होतं अशी आठवण स्थानिक सांगतात. मातीच्या भींती, लाकडाचे वासे आणि गवताचं छप्पर असं मूळ घराचं स्वरुप होतं. 

बाबासाहेबांचा जन्म कुठे?

बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. पुढं बाबासाहेबांच्या कुटुंबाचं सातारा आणि मुंबईत वास्तव्य होतं. पण या काळातही मुलांना आंबडवे गावात वर्षातून दोन वेळा तरी न्यायचच असा रामजीबाबांचा प्रयत्न असायचा. त्याकाळी आंबडवे गावी जाणं हे सोपं नव्हतं. आंबडवे गावात येण्यासाठी मुंबई ते दाभोळ बंदर असं होडीनं येत होते. रत्नागिरीपासून दापोली आणि दापोलीतल्या कॅम्पातल्या घरी रामजीबाबा आणि बाबासाहेबांचा मुक्काम असायचा.  दापोलीतही रामजीबाबांनी घर बांधलं होतं. पण तिथं त्यांचं फारसं मन रमत नव्हतं. सुट्ट्यांच्या काळात आंबडवे गावात जाण्याचे वेध लागत होते.

दापोलीतून आंबडवे गावात येण्यासाठी रस्ता नव्हता. त्या काळी एसटी किंवा दुसरं काही साधन नव्हतं. त्यामुळं रामजीबाबांचा कुटुंबकबिला बैलगाडीतून गावी येत असे. दापोली ते आंबडवे हे अंतर तब्बल 61 किलोमीटर होतं. एवढं मोठं अंतर एका दिवसात बैलगाडीत कापणं शक्य नव्हतं. मग ते रस्त्यात पालवणे गावात परिचितांकडं त्यांचा मुक्काम असायचा त्यानंतरच ते आंबडवे गावात पोहचत असंत. 

रामजीबाबांबाबत एक अतिशय महत्वाची गोष्ट माहिती समोर आलीय. सुभेदार रामजीबाबा यांच्या संत कबीरांचा मोठा प्रभाव होता. कबीरांची विचारसरणी त्यांना अतिशय आवडत होती. त्यामुळंच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. कोकणी माणूस मासे मटण खाणार नाही असं होणार नाही. पण कबीर पंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी शाकाहार स्वीकारला होता. 

बाबासाहेबांचे शिक्षण

बाबासाहेब आंबेडकर आंबडवे गावात पाचवी ते नववीत शिकत असतानाच दोन एक वेळा आल्याचं गावकरी सांगतात. चैत्र पौर्णिमेला भवानीदेवीची पूजा असायची त्यासाठी बाबासाहेब लहानपणी गावी यायचेच असं गावकरी सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांचे वडीलबंधू आनंदराज आंबेडकर यांचं लग्नकार्य गावातील भावकीसोबत व्हावं अशी रामजीबाबांची इच्छा होती. त्यानुसार आंबवडे गावाजवळच्या गोमेंडी गावातली मुलगी आनंदराज आंबेडकरांसाठी पाहिली होती. त्या लग्नावेळी बाबासाहेब नववीत शिकत होते. त्या लग्नाला बाबासाहेब भावंडांसह आले होते.

बाबासाहेबांचा छंद 

बाबासाहेबांना लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचा खूप छंद होता याचा एक किस्सा गावात अजूनही सांगितला जातो. मोठे भाऊ आनंदराज यांच्या लग्नासाठी बाबासाहेब आले होते. त्यावेळी ते पुस्तक घेऊन गावाजवळच्या जंगलातील देवीच्या देवळात गेले. लग्नासाठी वरात निघण्याची वेळ आली. पण नवरदेवाचे भाऊ असलेल्या बाबासाहेबांचा पत्ता नव्हता…गावात शोधाशोध झाली. शेवटी बाबासाहेब मंदिरात पुस्तक वाचत असल्याची माहिती मिळाली. बाबासाहेब सापडले तेव्हा वरात नवरीच्या गावाकडं गेली.

बाबासाहेबांचं समाजकारण 

बाबासाहेब समाजकारणात जसे व्यस्त झाले तसं या घराकडं त्यांचं दुर्लक्ष झालं. अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळातही आंबडवे गावातलं त्यांचं कौलारु घर अस्तित्वात होतं अशा आठवणी जुनेजाणते सांगतात. पण पुढं त्या घराच्या देखभालीकडं दुर्लक्ष झाल्यानं ते घर जीर्ण होत गेल्याचं गावकरी सांगतात. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबडवे गावातल्या बाबासाहेबांच्या राहत्या घराचं स्मारक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. सुरुवातीला दोन वास्तू बांधण्यात आल्या होत्या. एका वास्तूत बाबासाहेबांचा अस्थिकलश आणि दुसरी बुद्धविहाराची वास्तू होती. सुरुवातीच्या काळातली स्मारकं अतिशय छोट्या स्वरुपात होती.

बाबासाहेबांच्या आंबडवे गावात आज बाबासाहेबांचं स्मारक आहे. या विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश आपल्याला पाहायला मिळतो… बाबासाहेबांच्या मूळ गावाच्या शोधात हजारो भीमअनुयायी या गावात येतात. बाबासाहेबांचं मूळ ज्या गावात आहे… बालपणी ज्या गावात बाबासाहेबांचे पाय लागले होते ते गाव तीर्थस्थळापेक्षा कमी नाही… बाबासाहेबांच्या मूळ गावात त्यांच्या कार्याला साजेसं स्मारक असावं असं स्थानिकांना वाटतं.

गावाशी आजही नातं 

 बाबासाहेबांच्या कुटुंबानं आजही त्यांच्या आंबडवे गावाशी नाळ तोडलेली नाही. आंबडवे गावातील आपल्या कुटुंबकबिल्याशी आंबेडकर कुटुंब संपर्क साधून आहेत. आंबेडकरांनी आपल्या सहा एकर जमिनीवर आंब्याची बाग फुलवलीये. एक घरही बांधलंय. त्या घराकडं आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर संपर्क साधून असल्याचं गावकरी सांगतात.

 बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जरी आंबडवे असलं तरी त्यांचा जन्म हा काही आंबडवे गावातला नाही. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891रोजी मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला… रामजीबाबा हे लष्करातल्या नोकरीत होते. 1889 ते 1894 या काळात त्यांची नेमणूक महू गावी असताना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेब तीन वर्ष महू गावात राहिले. बाबासाहेबांचा जन्म ज्या लष्करानं दिलेल्या घरात झाला त्याचा शोध 1971 साली घेण्यात आला. भंते धर्मशील यांनी बाबासाहेबांच्या जन्मगावी उचित स्मारक बांधण्याचा संकल्प सोडला. 2008 साली सध्याचं जे स्मारक आहे ते मूर्तस्वरुपात आलं. 

आंबेडकर नाही तर ‘हे’ खरं आडनाव 

 याच घरापासून काही पावलं अंतरावर असलेल्या राजे प्रतापसिंह हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900मध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ असतानाही गावाचं नाव लावावं म्हणून भीमराव आंबवडेकर असं नाव शाळेच्या मस्टरवर लिहिण्यात आलं. पण आंबवडेकर हे आडनाव उच्चारण्यासाठी थोडं आडंनिडं वाटत असल्यानं शाळेतलेच एक शिक्षक कृष्णा आंबेडकरांनी त्यांचं आंबेडकर हे आडनाव लावण्यास सूचवलं… त्या दिवसापासून भीमराव सकपाळ आंबवडेकर, भीमराव आंबेडकर झाले. 1904मध्ये बाबासाहेबांनी चौथीची परीक्षा पास केली. त्यानंतर बाबासाहेब मुंबईला 

मुंबईपर्यंतचा प्रवास 

साता-यातून पुढं बाबासाहेब कुटुंबासह परळमधील बीआयटी चाळीत येऊन राहू लागले. मुंबईतली ती चाळ अजूनही बाबासाहेबांच्या आठवणी स्वतःच्या अंगाखांद्यावर वागवतेय…. चाळीतली खोली क्रमांक 50 आणि 51 या दोन खोल्यांमध्ये बाबासाहेबांचा संसार सुरु होता. बाबासाहेब एका खोलीचा वापर अभ्यासासाठी करत होते. तर दुस-या खोलीचा वापर स्वयंपाकासाठी होत होता. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे अनेक टप्प्यांच्या साक्षीदार या दोन खोल्या होत्या. बाबासाहेब 1934पर्यंत या खोलीत वास्तव्यास होते.

बाबासाहेबांचं शिक्षण 

दरम्यानच्या काळात 1916 मध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. तिथं ते जवळपास दोन वर्ष वास्तव्य करुन होते. ऑक्टोबर 1917पर्यंत ते लंडनमधील 10 किंग हेन्री रोड लंडन या पत्यावर राहत होते. 1917 साली त्यांना भारतात परतावं लागलं. उर्वरित शिक्षण पुढच्या चार वर्षांच्या काळात पूर्ण करण्याची परवानगी घेऊन ते भारतात आले होते. त्यांनी पुन्हा 1920 साली अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन गाठलं.

बाबासाहेब या काळात मुंबईत परळच्याच दोन खोल्यांच्या घरात राहत होते. 1930 साली त्यांनी स्वतः वेगळं घर बांधण्याचा विचार केला. बाबासाहेबांनी चाळीतलं आपलं घर सोडलं ते घर त्यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख असलेल्या कालीदास सखाराम ताडीलकर यांना दिलं. कालिदास ताडीलकर हे चळवळीतले कार्यकर्ते होते. त्यांची चौथी पिढी आता त्या खोलीत वास्तव्यास आहे.

1934 साली बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हा बंगला बांधला. तिथं बाबासाहेबांचं 15 ते 20 वर्ष वास्तव्य होतं. राजगृहमध्ये बाबासाहेबांची खोली आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलंय. आजही देशाच्या कानाकोप-यातून आंबेडकरी अनुयायी या महापुरुषाच्या वास्तव्यानं पावनव झालेली ही वास्तू पाहण्यासाठी येतात. या वास्तूत आल्यावर जणू बाबासाहेबांचा स्पर्श जाणवत असल्याची भावना प्रत्येक भीमसैनिकात असते.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समाजाचा उद्धार घडवून आणला… बाबासाहेबांचं मूळ गाव कुठं आहे. त्यांचं मूळचं आडनाव काय आहे हे अनेकांना माहिती नाही… देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या महामानवाचं गाव सामान्यांना माहिती व्हावं यासाठी हा प्रपंच….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती आहे. त्यांचा  जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा सामना करणाऱ्या भीमराव आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. समाजातील अस्पृश्यता, जातिवाद, भेदभाव यांसारख्या दुष्कृत्यांचा अंत करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळीही केल्या. 

आता कोण कोण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आताची पिढी देखील राजकारणा सक्रीय आहेय  प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांच्याशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी परदेशात शिकते तर एकीचे लग्न झालेले आहे. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत.





Source link

VIDEO: 3 पिढ्या पाहिलेल्या, 300 वर्षे गोडवा देणाऱ्या 'ढेरा आंब्याचा' वाढदिवस; गडगेवाडीच्या ग्रामस्थांचं अनोख सेलिब्रेशन!

VIDEO: 3 पिढ्या पाहिलेल्या, 300 वर्षे गोडवा देणाऱ्या 'ढेरा आंब्याचा' वाढदिवस; गडगेवाडीच्या ग्रामस्थांचं अनोख सेलिब्रेशन!


प्रविण दाभोळकर, झी 24 तास, मुंबई:  उन्हाळा सुरु झाला आणि बाजारात आंबे दिसू लागले. आंब्यांचं माहेरघर असलेल्या कोकणात आंबा नुसता विकलाच जात नाही तर पूजलादेखील जातो. आपल्या पिढ्यानपिढ्या पाहणाऱ्या आंब्याच्या झाडाचा कोकणकरांनी वाढदिवस साजरा केलाय. किती वर्षांचा झालाय हा आंबा? कुठे झाला हा कार्यक्रम? काय होता यामागचा उद्देश? जाणून घेऊया.

कुंभारखाणी खुर्द येथील गडगेवाडी येथील ग्रामस्थांनी मिळून आनंदाने एक वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस आजी-आजोबांचा नव्हता. तर त्यांच्याही आजीआजोबांची पिढी पाहिलेल्या आंब्याच्या झाडाचा होता. कोकणी माणूस आपल्याला मदत करणाऱ्यांवर जीव लावतो. मग शेतात राबणारा बैल असो की उन्हाळ्यात तोंड गोड करणारा आंबा असो. गडेवाडीत ढेरा आंबा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात हा आंबा खूप सारे आंबे देतो आणि वर्षभर गावकऱ्यांना सावली देतो. 300 वर्षे जुन्या या आंब्याने गावकऱ्यांच्या 3 पिढ्या पाहिल्यायत. त्यामुळे आताच्या पिढीला या ढेरा आंब्याने लळा लावलाय. 

कुटुंबे आणि मित्रांमधील बंध

गडेवाडीतील भोजने कुटुंबाच्या जागेत हा ढेरा आंबा आहे. असं असलं तरी प्रत्येक गावकऱ्यांच्या मनाच्या जवळचं हे झाड आहे. हे भव्य आंब्याचे झाड त्याच्या सावलीत शतकानुशतके आठवणी घेऊन उंच उभं आहे. ढेरा आंबा आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे फळ – प्रसिद्ध हापूस आणि पायरी जातींपेक्षाही चांगले चवीचे आहे. पिढ्यानपिढ्या हे झाड बदलत्या काळाचे मूक साक्षीदार राहिले आहे. केवळ गोड आंबेच नाही तर कुटुंबे आणि मित्रांमधील बंध देखील ढेरा आंबा जोपासतोय.

हनुमान जयंचीचा मुहूर्त

यावर्षी गाडगेवाडीतील मुलांच्या आणि तरुणांच्या मनात ढेरा आंब्याचा वाढदिवस साजरा करण्याची एक सुंदर कल्पना सुचली. त्यांनी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण वाडी एकत्र येते. हाच मुहूर्त साधून तरुणांनी ढेरा आंब्याचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. 

डोळ्यांत ढेरा आंब्याबद्दलच्या आठवणी चमकल्या

ज्यांनी त्यांचे बालपण याच झाडाखाली खेळण्यात घालवले अशा गावातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांना ढेरा आंब्याच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या डोळ्यांत ढेरा आंब्याबद्दलच्या आठवणी चमकत होत्या. त्यांच्या तरुणपणातील क्षण पुन्हा जिवंत होत होते. जमलेल्या समुदायाने गाणी म्हणत, जल्लोष करत ढेरा आंब्याचा वाढदिवस साजरा केला.

आधार देणाऱ्या मुळांचा उत्सव

ढेरा आंबा हे केवळ एक झाड नाही तर ते वारसा, लवचिकता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. वेगवान जीवनाच्या या युगात, गाडगेवाडी आपल्याला थांबून निसर्ग, आठवणी आणि आपल्याला आधार देणाऱ्या मुळांचा उत्सव साजरा करण्याची आठवण करून देते.





Source link

बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? रामदास आठवलेंचे एका वाक्यात उत्तर

बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? रामदास आठवलेंचे एका वाक्यात उत्तर



झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ या विशेष मुलाखतीत रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिली. 



Source link

पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले

पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले


Pune Crime News :  पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  एका विकृत व्यक्तीने चक्क कुत्र्यावरच अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या नराधमाचे सर्व भयानक कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी विकृताला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्याच्या हडसपर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हलीमुद्दीन शेख असे आरोपीचे नाव आहे.  मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहतो. तो एका व्यक्तीकडे काम करत होता आणि तिथेच राहत होता. घराचा मालक कामानिमित्ताने बाहेर गेला होता. यावेळी मालकाचा पाळीव कुत्रा आणि   हलीमुद्दीन शेख असे असे दोघेच घरी होते. 

संबंधित कुत्र्याचे मालक घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागला. यामुळे मालकाला शंका आली. त्यानंतर त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याला धक्काच बसला. हलीमुद्दीन शेख हा कुत्रीसह अमानवी कृत्य करत असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. मालकाने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून CCTV फुटेज पाहिले असता पोलिसही हादरले.  CCTV फुटेजमध्ये   हलीमुद्दीन शेख हा कुत्रीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काळेपडळ पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना शस्त्र मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाहीयं… तर  मानवी दातांनी चावणं,  यापुढे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.
व्यवसायाने वकील असणाऱ्या तानाजी सोलनकर आणि माया सोलनकर यांच्यात मालमत्तेचा वाद होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले. माया यांनी आरोप केला की, वकील सोलनकर यांनी माया आणि तिचा भाऊ लक्ष्मण यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली.. या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले…





Source link

5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल?

5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल?


Farmers Compensation: आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आलीय. एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाहीय. मागच्या काही वर्षात पिक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळालनी नाहीय. मा मात्र या पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झालाय. तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात.

आपल्याकडे जनहिताच्या अनेक योजना या जनतेऐवजी धनदांडग्यांना अधिक धनवान करणाऱ्या ठरल्यात. तसाच प्रकार आता पीक विमा योजनेच्या बाबतीत घडलाय. कारण मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत घट झालीय. मात्र त्याचवेळी मागच्या 5 वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल 50 हजार कोटींचा नफा झालाय. एकट्या महाराष्ट्रातून तब्बल साडेदहा हजार कोटींचा नफा पीक विमा कंपन्यांनी कमावलाय.  

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2019 ते 2024 या 5 वर्षांत एकूण 17 पीक विमा कंपन्यांना 1 लाख 54 हजार 543 कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला. या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1 लाख 5 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. म्हणजेच उरलेली 49 हजार 704 कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावलाय.

फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी बेहाल, विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती आहे. राज्यात 2016-17 पासून पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 2016 ते 2024 या 8 वर्षांत विमा कंपन्यांना 43 हजार 201 कोटींचा हप्ता मिळाला. यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं दिलेली एकूण रक्कम आहे.विमा कंपन्यांकडून शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये भरपाई, विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये दिले. म्हणजेच 8 वर्षात विमा कंपन्यांना 10 हजार 591 कोटींचा नफा झाला.

यावरुन आता विरोधकांनी विमा कंपन्या आणि सरकारवर टीकेची झोड उठवलीय. दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करु देणार नाही, मुख्यमंत्री विमा कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत इतकंच सावध उत्तर भाजपकडून देण्यात आलंय.

नैसर्गिक आपत्तीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या काडीचा आधार मिळावा यासाठी पिकविमा योजना सुरु झाली. मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्यांची काडीकाडी जमा करुन नफ्याची मोळी आपल्याच पाठीवर टाकून पीक विमा कंपन्या गलेलठ्ठ झाल्यात. तेव्हा अशा पीकविमा कंपन्यांच्या पारदर्शक कारभारासाठी आणि पिचलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.





Source link

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनांची कत्तल; नुकसानभरपाईसाठी थेट चंद्रपुरात वृक्ष लागवड

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनांची कत्तल; नुकसानभरपाईसाठी थेट चंद्रपुरात वृक्ष लागवड


Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा दक्षिण मुंबईत सुरु झाला आणि शहराच्या रस्ते मार्गानं सुरू असणाऱ्या प्रवासामध्ये एक नवा टप्पा सर करण्यात आला. मात्र आहा याच कोस्टल रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील एका वृत्तानं सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे. 

मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनातील 9 हजार झाडं तोडली जाणार आहेत. त्याच्या बदल्यात पर्यावरणाची झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसानभरपाई म्हणून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरात वृक्षारोपण करण्याचा प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळं या निर्णयानं सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून पर्यावरणस्नेही संस्थांनी या निर्णयाचा विरोध केल्याचं पाहायाला मिळत आहे. 

विकासाच्या नावावर सध्याच्या घडीला समुद्रकिनारी भागात असणाऱ्या कांदळवनांची होणारी आणि झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आल्यानं सध्या हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. 

दरम्यान या कांदळवनांच्या अभावी होणारी हानी आणि त्यांचे दुष्परिणाम चंद्रपूरमध्ये झाडे लावून भरून कशी निघणार असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या विस्तारासाठी वर्सोवा ते भाईंदर या भागात असणाऱ्या कांदळवनतोडीवर पर्यायी मार्ग शोधत चंद्रपूरातील या प्रस्तावित वृक्षलागवडीला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी देत भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली. पण, इथं भौगोलिक क्षेत्रानुसार आणि हवामानानुसार वनांची रचना, वनस्पतीची विविधता आणि त्यांचे गुणधर्म या गोष्टी मात्र विचाराता न घेतल्या गेल्याचंच स्पष्ट होत आहे. 

सदर निर्णयानंतर कांदळवनाच्या तोडीमुळं त्याचा पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणार असून, प्रत्यक्षात त्याची भरपाई कांदळवनं नसलेल्या ठिकाणी करून काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp