Monsoon Update : सरी पुन्हा बरसणार, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; 14 जूनपासून सक्रिय

Monsoon Update : सरी पुन्हा बरसणार, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; 14 जूनपासून सक्रिय


मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर उद्या रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवार 14 जूनपासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना ऑरेंज, रेलड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहणे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहतील.

विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहणे आणि दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्याला झोडपलं 

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे येथे काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने गडगडाटी वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे. आज शुक्रवारीच पावसाने पुण्यात हजेरी लावली. पुण्यातील आयबी रेस्ट हाऊसमधे पावसाचं पाणी घुसलं होतं. पावसांच्या पाण्याची ड्रेनेज लाईन बंद झाल्याने आय बी गेस्टहाउस ला तळ्याचं स्वरूप आलं होतं. अनेक खोल्यांमधे ही पाणी घुसल होतं. 





Source link

पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट

पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट


No match is being played.

Jun 12, 2025 | Match 79

ICC CWC League 2, 2023-27

SCO

(50 ov) 369/6

VS

NED

374/6(49.2 ov)

Netherlands beat Scotland by 4 wickets
Full Scorecard →

Jun 10, 2025 | 3rd T20

West Indies in England, 3 T20I Series, 2025

ENG

(20 ov) 248/3

VS

WI

211/8(20 ov)

England beat West Indies by 37 runs
Full Scorecard →

Jun 10, 2025 | Match 78

ICC CWC League 2, 2023-27





Source link

अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू; वाचा संपूर्ण यादी आणि सविस्तर माहिती

अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू; वाचा संपूर्ण यादी आणि सविस्तर माहिती


Ahmedabad Plane Crash Maharashtra Victim: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी जीव गमावला आहे. हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे. त्यांची नावं दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), रोशनी सोनघरे (डोबिंवली) आणि मैथिली पाटील (नवी मुंबई) अशी आहेत.

1) दीपक पाठक 

दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होता. त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. आज सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केलं होतं. 

2) अपर्णा महाडीक

चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (35) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे. 

अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. 

3) सुमित सभरवाल

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को-पायलट सुमित सबरवाल याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल याचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमितच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. 

4) महादेव पवार आणि आशा पवार 

मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचा विमान अपघातात समावेश आहे. महादेव पवार ( वय ६७) आशा पवार ( वय ५५) यांनी त्यांचा जीव गमावला आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे.

5) रोशनी सोनघरे

अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. 

रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोषणाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय..

6) क्लाईव्ह कुंदर 

क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता.





Source link

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?



Maharashtra Political News: राज्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असताना आज मुंबईमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं.



Source link

नाशकात पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे कडक कधी होणार?

नाशकात पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे कडक कधी होणार?



Nashik Crime: नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागाच थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आलाय.



Source link

आणखी किती दिवस उन्हाचा चटका सहन करावा लागणार? मान्सून 'या' दिवशी जोर धरणार, आज यलो अलर्ट जारी

आणखी किती दिवस उन्हाचा चटका सहन करावा लागणार? मान्सून 'या' दिवशी जोर धरणार, आज यलो अलर्ट जारी


Maharashtra Weather Update: जून महिन्यातच पावसाने ब्रेक घेतल्यामुळं उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. अनेक जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीशीपार पोहोचले आहे. विदर्भात उन्हामुळं काहिली होत आहे. असे असतानाच आज 11 जानेवारी रोजी मात्र सातारा, सांगली सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 

विदर्भात काही जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत चालला आहे. नागपूर येथे राज्यातील उच्चांकी 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम,नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान विभागाने आज दक्षतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसासाठी आणखी तीन ते चार दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत असल्याने 14 जूनपर्यंत मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची चाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 14 जूनपर्यंत मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13-16 June दरम्यान कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात, ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, कदाचित स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.

विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा

विदर्भात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा सुरू असून नागपुरात तर 43 अंश सेल्सिअस पर्यंत पारा पोहचला होता.  त्यामुळे विदर्भात मान्सूनच्या प्रतीक्षेत अजून ही उन्हाचे चटके बसत बसत आहे. दरम्यान -बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भात घेऊन येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp