शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं
Source link
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं
Source link
Crime News Husband Killed Wife: नाशिक आणि बार्शीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जोडीदारानेच आपल्या पत्नीला संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनाचा सविस्तर तपशील समोर आला असून नाशिकमधील मयत दांपत्य निवृत्त शिक्षक आहेत. तर बार्शीमधील पतीने घरासमोरील बदामाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं घडलं काय आणि सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात…
बार्शीमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शेलगाव आरमध्ये घडली आहे. मयत पतीचं नाव वसंत पवार असं असून त्याच्या पत्नीचं नाव आयनाबाई उर्फ सोनाबाई पवार असं आहे. वसंत पवारला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नीसोबत किरकोळ भांडण विकोपाला जायचे.
मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंतने पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर वसंतचे वडील अंबादास यांचा हात या मारहाणीमध्ये फॅक्चर झाला. वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेतला. पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव मुरलीधर जोशी असं असून ते 78 वर्षांचे होते. तर मयत पत्नीचं नाव लता जोशी असं आहे. हे दोघेही निवृत्त शिक्षक होते. दोन्ही मुले मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या अपार्टमेंटमध्ये मुरलीधर आणि लता हे दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. त्या एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या. दीर्घ आजारपणाला हे दांपत्य कंटाळले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे,” असं लिहिलेलं आढळून आलं. “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही”, असंही चिठ्ठीत लिहिल्याचं आढळून आलं.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालांमध्ये डॉ. घैसास दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. तनिषा भिसे मृत्यू मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर करण्यात आलेत. या दोन्ही अहवालात डॉ. घैसास हे दोषी आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये. त्यामुळे येत्या दोन दिवसांत डॉ. घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संबंधीत डॉक्टर आणि व्यवस्थापन तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे.. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आणदार अणित गोरखे यांनी केलीय.
तर तनिशा भिसेंचा मृत्यू नाही तर ती हत्याच असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी सुळे यांनी केलीय.
या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आधीच राजीनामा दिलाय. मात्र त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागलीय. आता चौकशी अहवालातही ते दोषी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. रुग्ण तब्बल साडेपाच तास रुग्णालयात होती. यावेळी रक्तस्त्राव सुरु असतानाही उपचार करण्यात आले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय. याप्रकरणी शासकीय अहवालानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत. या तिन्ही अहवालानंतर कारवाई करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचंही चाकणकरांनी नमूद केलंय.
Maharashtra Fort Fire Updates: छत्रपती संभाजी नगरमधील दौलताबाद येथे देवगिरी किल्ला परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. उन्हामुळे गडाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेलं गवत असल्याने आग झपाट्याने पसरली आणि आगीने या गडाला विळखाच घातल्याचं दिसून आलं. किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे मोठे मोठे लोट उठलेले दिसून आले. आग पसरत गेल्यानंतर चिंतेत भर पडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिगारेटची ठिणगी गवतावर पडल्याने ही आग लागली. मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत 100 पेक्षा जास्त झाड जळाली, तर 50 वर घोरपडी होरपळल्या आहेत. तसेच 25 हून अधिक मोर जखमी झाले आहेत. त्याप्रमाणे 25 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. 12 तासांच्या परिश्रमानंतर रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आलं. या आग्नीकांडानंतर आग विझवण्यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या ठिकाणी सातत्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
देवगिरी किल्ला दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी असलेला किल्ला आहे . हा किल्ला 9 व्या शतकापासून 14 व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होता. तसेच काही काळासाठी म्हणजेच 1327 ते 1334 दरम्यान हा किल्ला दिल्ली सल्तनतची राजधानी होता. नंतर इसवी सन 1966 ते 1636 दरम्यान हा किल्ला अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी होता. सहाव्या शतकाच्या सुमारास, देवगिरी हे सध्याच्या संभाजीनगरजवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले, जे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवां मार्गांवर होते. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी आकाराचा किल्ला सुरुवातीला 1187 सालाच्या आसापास पहिला यादव राजा भिल्लाम पाचवा याने बांधला होता.
सन 1308 मध्ये, उत्तर भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या दिल्ली सल्तनतच्या अलाउद्दीन खिलजीने हे शहर ताब्यात घेतले . 1327 मध्ये, दिल्ली सल्तनतच्या मुहम्मद बिन तुघलकने शहराला दौलताबाद असे नाव ठेवले. त्याने आपली शाही राजधानी दिल्लीहून या शहरात हलवली. ज्यामुळे दिल्लीतील लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात आताच्या दौलताबाद येथे स्थलांतर झाले. तथापि, मुहम्मद बिन तुघलकने 1334 मध्ये आपला निर्णय उलटवला आणि दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीला परत हलवण्यात आली. 1499 मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा भाग बनले, ज्यांनी ते त्यांची दुय्यम राजधानी म्हणून वापरले. 1610 मध्ये, दौलताबाद किल्ल्याजवळ, संभाजीनगर हे नवीन शहर, ज्याचे नाव तेव्हा खडकी होते
हा किल्ला सुमारे 200 मीटर उंच असलेल्या शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभा आहे. यादव राजवंशाच्या शासकांनी टेकडीचा बराचसा खालचा उतार कापून टाकला आहे. शिखरावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक अरुंद पूल, ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाहीत आणि खडकात खोदलेली एक लांब गॅलरी आहे. या गॅलरीच्या मध्यभागी प्रवेश गॅलरीला उंच पायऱ्या आहेत. शिखरावर आणि उतारावर अंतराने, आजूबाजूच्या ग्रामीण भागात तोंड करून मोठ्या जुन्या तोफांचे नमुने आहेत. तसेच मध्यभागी, शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी एक गुहेचे प्रवेशद्वार आहे.
Bhagwati Hospital : बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या भगवती हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही भगवती रुग्णालयाच्या खासगिकरणाला तीव्र विरोध केला आहे. तर मनसे खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरली होती.
मुंबई महानगर पालिकेचं बोरिवलीमध्ये असलेलं भगवती रुग्णालय हे सर्वसामान्य मुंबईकर रुग्णांचा आधार आहे. मात्र, भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध होतो आहे. भगवती हॉस्पिटल खासगीकरणा विरोधात मनसे आता मैदानात उतरली आहे. भगवती हॉस्पिटलचे खाजगीकरण होऊ नये याबाबत मनसेच्या वतीने आज रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रुग्णालयाबाहेर सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जर भगवती रुग्णालयाचे खासगीकरण झाले तर पैसे काही लोकांच्या खिश्यात जाणार आहेत. मग याचा आपल्या लोकांना काही फायदा होणार नाही. महानगर पालिका हे बरोबर काम करत नाही. त्यामुळे आम्ही भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करत आहोत. हा निर्णय रद्द करावा. जो पर्यंत आम्ही येथे आहोत तो पर्यंत भगवती रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही. आम्ही प्राण देऊ पण खासगीकरण होऊ देणार नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
भगवती हॉस्पिटलच्या खाजगीकरणाला मनसेचा विरोध
भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील विरोध केला आहे. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण करू नये अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तर याच मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी मुंबई पालिका आय़ुक्तांची भेट घेत खासगीकरणाला विरोध केला आहे.
मुंबईतल्या सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेलं भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट का घातला जातोय हे न उलगडलेलं कोडं आहे. मात्र, या खासगीकरणाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला आहे. आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra St Mahamandal: उन्हाळी सुट्टीत गावाला जायचा प्लान आखताय तर एसटी महामंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्टीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबई आणि उपनगरामधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळं महामंडळाने मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारातून जादा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आगारातून दररोज 239 फेऱ्या सोडण्यात येणार असून आता याची संख्या 255 इतकी झाली आहे. परळ आणि कुर्ला एसटी स्थानकातून सर्वाधिक गाड्या सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करताना त्यात बिघाड झाल्यास एसटीच्या एसी बसनेदेखील त्याच तिकीटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळं एसटीने प्रवास करताना बसमध्ये बिघाड झाल्यास प्रवाशांना दुसऱ्या बसची वाट बघत तासनतास रस्त्यावर उभे राहावे लागणार नाही.
महामंडळाच्या राज्यभरातील आगारांतून सुटणाऱ्या जादा फेऱ्यांद्वारे एसटी बस दररोज 521 मार्गावर धावणार आहे. या गाड्यांचे बुकिंग महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे करता येणार आहे. याशिवाय, राज्यभरातील बसस्थानकावरील आरक्षण केंद्रावरही बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांना अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकीटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे हेदेखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसंच, एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.