Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन'; वडिलांच्या एका इच्छेखातर…

Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन'; वडिलांच्या एका इच्छेखातर…


Akanksha Gaikwad Success Story: आजही आपल्या समाजात महिलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण तरीही काही महिला आहेत ज्या या अडचणींवर मात करून एक आदर्श निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आकांक्षा गायकवाडची आहे, जी आज सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे तसेच चर्चेचा विषय आहे. तिची कहाणी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ च्या लिंक्डइन पेजवर शेअर करण्यात आली आहे.

“मी एक पोस्टमन आहे – आणि हो…”

आकांक्षा तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “तुम्ही हा कोट, खाकी बॅग आणि पत्र पाहताय का? मी एक पोस्टमन आहे! हो, आम्ही अजूनही अस्तित्वात आहोत आणि हो, मी एक महिला पोस्टमन आहे.” आकांक्षाने गणितात पदवी मिळवली होती. तीन वर्षांपूर्वी तिने इंडिया पोस्टमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने कधीही विचार केला नव्हता की ती पोस्टवुमन होईल. ती म्हणाली, “वडिलांनी मला सरकारी नोकरी करायला सांगितले होते. मला वाटले की ते डेस्क जॉब असेल. पण तिथे सांगण्यात आले – ‘तुम्हाला पत्रे पोहोचवावी लागतील.’ मला आश्चर्य वाटले.”

आकांक्षा सांगते की त्या ऑफिसमध्ये एकूण २६ डिलिव्हरी कर्मचारी होते, त्यापैकी ती एकटी मुलगी होती. सुरुवातीला, तिचे पालक देखील काळजीत होते – “आता मुलगी फिरून पत्रे पोहोचवेल?” आकांक्षा स्वतः देखील विचार करू लागली, “लोक अजूनही पत्रे पाठवतात का?” पण पहिल्या महिन्यातच तिचा दृष्टिकोन बदलला. तासन्तास चालणे आणि घरोघरी जाऊन पत्रे पोहोचवणे सोपे नव्हते, परंतु या काळात तिला खूप चांगले लोक भेटले. एकदा एका म्हाताऱ्या काकूने दार उघडले आणि म्हणाल्या, “मला माहित नव्हते की महिला देखील पत्रे पोहोचवतात!” तिने तिला प्यायला पाणी दिले आणि जेवणही दिले.

आकांक्षाने एक सुंदर क्षण शेअर केला, “एके दिवशी ऑफिसमधून परतताना, जवळच्याच एका लहान मुलीने मला म्हटले- ‘दीदी, मलाही पोस्टवुमन व्हायचे आहे.’ तो क्षण मला भावला.” आतापर्यंत आकांक्षाने १ लाखाहून अधिक पत्रे वाटली आहेत. तिच्या पालकांनाही आता तिचा अभिमान आहे. आकांक्षा म्हणते, “पत्रे मिळाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य हा माझा आनंद आहे. मला वाटते की मी लोकांना जोडण्याचे काम करते.” संपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा-

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 

आकांक्षाची ही कहाणी व्हायरल झाली आहे. एका युझरने लिहिले, “तू फक्त पत्रे वाटत नाहीस, तर लोकांच्या हृदयात जागा निर्माण करतेस” दुसऱ्याने म्हटले, “तुझं हास्य सगळं काही सांगून जातं.”





Source link

रेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र

रेलमंत्री की रिलमंत्री?, आदित्य ठाकरेंचं रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र


मुंबई : लोकल दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. तर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतल्या दिव्या आणि मुंब्रादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. या लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 9 प्रवासी हे जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. देशाचे रेलमंत्री नव्हे तर रिलमंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलं. तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. 

तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील रेल्वे प्रशानावर खापर फोडलं आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणारे लोंढ्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  दरम्यान या घटनेची रेल्वे मंत्रालयांकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

दिवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिव्यापासून काही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच कल्याण, डोंबिवलीमध्येच लोकल फुल होतात त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्र्यात प्रवाशांसाठी जागाच शिल्लक राहतात नाही. त्यामुळे लोक जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.

लोकल दुर्घटनेची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. कसारा, खोपली, पालघर, विरारवरून मुंबईत येण्यासाठी एकमेव पर्याय हा लोकलच आहे. या परिसरात देखील गर्दी वाढतेय. मात्र, लोकल मर्यादितच आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासन कसं नियंत्रण मिळवणार? असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना रेल्वे प्रशासनानं कराव्यात जेणेकरून वारंवार अशा घटना होणार नाहीत.





Source link

पुण्यातील कुख्यात गुंड शिवम आंदेकरला अटक; नाना पेठेत आंदेकर टोळीची दहशत

पुण्यातील कुख्यात गुंड शिवम आंदेकरला अटक; नाना पेठेत आंदेकर टोळीची दहशत


No match is being played.

Jun 08, 2025 | 2nd T20

West Indies in England, 3 T20I Series, 2025

WI

(20 ov) 196/6

VS

ENG

199/6(18.3 ov)

England beat West Indies by 4 wickets
Full Scorecard →

Jun 08, 2025 | Match 77

ICC CWC League 2, 2023-27

Jun 07, 2025 | 3rd T20

Inter-Insular T20I Series, 2025





Source link

'ही' व्यक्ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असलेली घडामोड

'ही' व्यक्ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असलेली घडामोड


Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. त्यातच याविषयी एक महत्त्वाची अपडेट  समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.

राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवसेना UBT आणि मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती. त्यातच दोन दिवसांपासूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केले. उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जातंय.

राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्युनिअर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचा पाहायला मिळालं. मात्र पुढलं पाऊल कोण टाकणार असी चर्चा असताना ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. आता या मनोमिलनामध्ये त्यांना कितपत यश येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बंधूंकडून युतीसाठी  सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ठाकरेंची मामा चंदूकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळताहेत. गेली अनेक वर्ष  राज आणि उध्दव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलंय. 

 





Source link

'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला

'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला


Nilesh Rane And Nitesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारण सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेते आक्रमक होताना दिसत आहेत. ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील नेत्यांमध्ये बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळत आहेत. 

दरम्यान, अशातच सतत आपल्या हटके आणि आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असणारे राणे कुटुंब हे देखील चर्चेत आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या बंधू भाजप नेते आणि मंत्री निलेश राणेंना एक सल्ला दिला आहे. 

नितेश राणे यांचं वक्तव्य

आगामी निवडणुकांमुळे अनेक नेते भाषणांमध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राज्यात बसला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं मोठे बंधू निलेश राणे यांनी बंधू नितेश राणेंना एक्सवर ट्विट करत एक सल्ला दिला आहे. 

‘नितेशने जपून बोलावे, बोलताना भान ठेवायला हवे’

नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे. तर यावर नितेश राणे यांनी निलेशजी तुम्ही tax free आहात असं मिश्किल उत्तर निलेश राणेंना एक्सवर ट्विट करत दिलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp